Wednesday, 16 May 2012

महाबली दशानन रावणाचे प्रोब्लेम्स

       
1    .    कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं

2    .    मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती

3    .    रावण कपडे विकत घेताना सर्वात जास्त खर्च टोप्यावर करायचा.

4    .    रावण एकटाच ग्रुप डिस्कशन करत असे

5    .    रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा महाविजेता व्हायचा

6    .    रावण एकटाच समूह गीत म्हणायचा

7    .    रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची कारण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती

8    .    रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा नाही

9    .    रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे

10    .    रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे

11    .    रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे

12    .    रावणाचे बहुतेक मास्तर म्हणत असत "एक गोष्ट दहा वेळा सांगावी लागते''

13    .    रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या वडिलांनी 11 हारांची ऑर्डर नोंदवली होती

14    .    रावणाला कधीच टी शर्ट घालता आला नाही

15    .    रावणाला ढेकर आली की त्याला कुठल्या तोंडाने बाहेर काढावी हे समजत नसे

16    .    लहानपणी रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन द्यायची हा प्रश्न असायचा

17    .    एकाच वेळेला तो १० प्रकारच्या मुखशुद्धी पावडरी खायचा

18    .    होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईलने बोंबलायचा.
20   .    तो जाहिरात करत असलेल्या दहाही टूथ पेस्टस वापरायचा.
21  .     मंदोदरी त्याच्याशी कधीच एकांतात बोलत नसे कारण तिला सारखे "कुणीतरी पाहतेय" वाटायचे.
22 .  आणि त्यांना कधीच एकांत मिळत नसे ! 
 





Tuesday, 15 May 2012

आठवणीतली गाणी - राधा ही बावरी....






रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते |

ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते |

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
.............

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll
हिरव्या हिरव्या झाडांची |  पिवळी पाने झुलताना ||

चिंब चिंब देहावरूनि | श्रावणधारा झरताना ||

हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई |

हा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाई |

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई .............

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll


आज इथे या तरुतळी | सूर वेणूचे खुणावती ||

तुज सामोरी जाताना | उगा पाऊले घुटमळति ||

हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई |

हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही |

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई
.............

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी

राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll२ll 



---------------------  राधा ही बावरी



Monday, 14 May 2012

निर्लज्ज व्हा ! सुखी व्हा !!





 जगात जगणं मुश्किल झालंय. अतिताणाचे दुष्परिणाम आपण सर्वत्र बघत असतो. कुणाला तरूणपणी हॄदयविकाराचा झटका, कुणाला उच्चरक्तदाबाचा विकार, कुणी डिप्रेशन मधे जातं, अशा अनेक बातम्या आपण वाचतो, ऐकतो. ह्या स्पर्धात्मक युगात मानसीक ताण हा असणारच. प्रगती हवी तर ताणापासून सुटका नाही. पण मग हे दुष्टचक्र असंच सुरू ठेवायचं का? ह्यावर काही उपाय आहे की नाही?
उपाय आहे. आणि ह्या उपायाचा शोध इतक अनेक शोधांप्रमाणेच आपल्या पूर्वजांनी कैक शतकांपूर्वी लाऊन ठेवलाय. ते वचन आहे "निर्लज्जम् सदा सुखी". खरं म्हणजे हे वाक्य आम्हाला टोमणे मारण्यासाठी फार लहानपणापासून ऐकवण्यात आलंय. पण सकारात्मक दॄष्टीकोन वॄद्धींगत करणारी पुस्तकं वाचून वाचून नुकताच ह्या टोमण्यातल्या गर्भीत सुविचार आम्हाला सापडलाय "सुखी व्हायचं असेल तर निर्लज्ज व्हा".
काय वाट्टेल ते होवो टेंशन घेऊ नका. एखाद्या घटनेचा वाईटातला वाईट परिणाम काय होऊ शकतो ह्याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण घेतलेलं टेंशन खरोखरंच वर्थ होतं का? "टेंशन लेनेका नहीं, देनेका" हे तत्त्व अंगात भिनवा. निर्लज्ज व्हा आणि सुखाने जगा.
बोलायला सोपं वाटत असलं तरी निर्लज्ज होणं काही येर्‍यागबाळ्याचं काम नव्हे. त्यासाठी दगडाचं काळीज आणि राजकारण्यांची कातडी लागते. कर्णाला लाभलेल्या कवचकुंडलांसारखंच निर्लज्जपणाची अभेद्य कवचकुंडलं जन्मतः लाभलेले आमच्यासारखे भाग्यवंत फार थोडे असतात. सकाळी नाश्त्याला दुध-साखर-पोळी अथवा शिकरण-पोळी खाऊन घराबाहेर पडणार्‍या अनेक बाळबोध व्यक्तिमत्वांना निर्लज्ज व्हा म्हणजे काय करा हेच समजणार नाही. त्यामुळे ते सोदाहरण स्पष्ट करणं ही आमचीच नैतीक जबाबदारी आहे. ते स्पष्ट करण्यासाठी ज्या घटनांमधे ताण येण्याची शक्यता असते त्या घटानांकडे आपण दोन वेगवेगळ्या दॄष्टीकोनांतून बघू. 

घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे. 

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - क क क काय झालं सर...
बॉस - काय झालं म्हणून काय विचारतोस? डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही -माझं काही चुकलं का?
बॉस - नाही, तुला नोकरी दिली हेच चुकलं माझं. अरे हे हे असं प्रेझेंटेशन कुणी लिहिलं होतं का?
तुम्ही - मी लिहिलं की सर...
बॉस - अरे गाढवा, ह्यात किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला दाखवायला काय धाड भरली होती?
तुम्ही -(तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते) सर हे तयार करता करता फार उशीर झाला, तुम्ही तोवर निघाला होतात.
बॉस - मग सकाळी दाखवायचं...
तुम्ही -सर ते कालच पाठवायचं होतं म्हणून पाठवलं. आय एम सॉरी...
बॉस - तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू?
(तुम्हाला थोडं भिरभिरल्यासारखं होतं)
बॉस - ही तुझ्या हातून झालेली शेवटची चूक. ह्यापुढे अजून एक जरी चूक झाली तरी तो तुझा ह्या कंपनीतला शेवटचा दिवस असेल.
बॉस असा ताणताणताणताण बोलत असताना इथे तुमच्या डोक्यात भुंगा सुरू होतो. नोकरी जाणार ह्या विचारासोबत डोळ्यासमोर होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते, ट्रिपची तयारी, मुलांच्या फिया, सिगारेटचे सतत वाढणारे दर ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि तुम्हाला अंधारी येते. चक्कर येऊन तुम्ही किबोर्डवर कोसळता.

बॉस - नॉनसेन्स, ह्या किबोर्डचा खर्च तुझ्या पगारातून कापला जाईल.

-----------------------------------------------------------------------------------------------------

घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt + Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी. फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत. बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात... मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं?
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून ८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी?
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८ जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?
तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो तुमच्या किबोर्डवर कोसळतो.

तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय. 

(तुम्ही लगेच मोबाईलवरून फेसबूकचं स्टेटस अपडेट करता "बॉसला झीट आणली". तुम्हाला दुसर्‍या क्षणी कंपनीतल्या लोकांकडून अभिनंदनाचे सतराशे साठ मेसेजेस येतात.)

घटना १ समाप्त
बघितलंत? आपला दॄष्टीकोन थोडासा बदलल्याने आपण कसे सुखात आणि निश्चिंतपणे जगू शकतो. निर्लज्जपणाच्या एक दगडात तुम्ही किती पक्षी मारलेत? बॉसला गप्प केलंत, लवकर निघायची सोय केलीत, पगार वाढवायची सोय केलीत, स्वतःच महत्त्व वाढवलं. म्हणून म्हणतो "निर्लज्ज व्हा. सुखी व्हा".




-------- आदीजोशी

Wednesday, 9 May 2012

आठवणीतली गाणी -- तुझ्या टपो-या डोळ्यात

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव
तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव ।।

तुझ्या मिठीत आकाश..... तुझ्या मुठीत आकाश .....
माझं हवेत आकाश तुझ्या कवेत आकाश ।।

तुझ्या पावलांचे ठसे .....गडे क्षितिजापल्याड .....
तुझी बहरली बाग माझं सुकलेलं झाड ।।

तुझी बहरली बाग .....तुझी चर्चा जागोजाग .....
तुझा श्रावण जोरात माझ्या मनामध्ये आग ।।

सारं जग तुझ्यासाठी .....माझी आग तुझ्यासाठी .....
माझी झोप तुझ्यासाठी माझी जाग तुझ्यासाठी ।।

जीव जागतो उगाच .....साद देशील म्हणून .....
वाट पहातात डोळे तुझी येशील म्हणून ।।

तुझी चाहूल घेऊन आला..... पहाटेचा वारा .....
मला खुणावतो वेडा तुझ्या गावचा किनारा

हाती लागेना किनारा .....माझी चिखलात नाव .....
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव



--------- तुझ्या टपो-या  डोळ्यात


Friday, 4 May 2012

कंबोडियातील वेदिक शिल्पवैभव






कंबोडियाच्या सियाम रीप आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून बसने हॉटेलवर आलो. येथून जवळच असलेल्या अंगकोर येथे ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या हिंदू देवालयांचा शिल्पसमूह तब्बल ७७ चौरस कि. मी. एवढय़ा प्रचंड परिसरात पसरलेला आहे. सॅण्डस्टोन, विटा व लाल-पिवळा कोबा वापरून उभारलेले हे शिल्पांचे महाकाव्य जगातील सर्वात मोठे धार्मिक शिल्पकाम समजले जाते. येथील अद्वितीय शिल्पकलेवर तामिळनाडूतील चोला शैली तसेच ओरिसा शैलीचा प्रभाव जाणवतो. प्राचीन काळापासून इथे खमेर संस्कृती नांदते आहे. आजही येथे ९० टक्के लोक खमेर वंशाचेच आहेत. त्यांची लिपी आणि भाषाही खमेर आहे. अंगकोर ही कंबोडियाची राजधानी होती. सोळाव्या शतकात साहसी युरोपियन प्रवाशांना येथील घनदाट जंगलात भ्रमंती करताना या मंदिरशिल्पांचा अकस्मात शोध लागला. अंगकोर वाट (वाट म्हणजे मंदिर) हे बरेचसे सुस्थितीत असलेले प्रमुख देवालय राजा सूर्यवर्मन (द्वितीय) याच्या कारकीर्दीमध्ये १२ व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधण्यात आले. या अतिशय भव्य, देखण्या मंदिराला पाच गोपुरे आहेत. यातील मधले उंच गोपूर हे मेरू पर्वताचे प्रतीक मानले जाते. ही मेरू पर्वताची पाच शिखरे (गोपुरे) मध्यवर्ती मानून साऱ्या विश्वाची प्रतीकात्मक स्वरूपात उभारणी होईल अशा पद्धतीने पुढील प्रत्येक राजाने इथले बांधकाम केले आहे. मंदिराभोवतालचे तळे हे क्षीरसागराचे प्रतीक मानले जाते. गुलाबी कमळांनी भरलेल्या तळ्यात मंदिराचे देखणे प्रतिबिंब पाहून मंदिर प्रांगणातील उंच दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली. जगातील सर्वात मोठी श्री विष्णूंची आठ हात असलेली भव्य मूर्ती येथे आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या, खांद्यावरून सिल्कचे सोवळे पांघरलेल्या या मूर्तीची आजही पूजा केली जाते; परंतु या मूर्तीचे मस्तक आता भगवान बुद्धाचे आहे. खमेर संस्कृतीमध्ये हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्माचा प्रभाव होता. श्री विष्णूचे मूळ मस्तक आता म्युझियममध्ये आहे.
या मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या लांबलचक ओवऱ्या, त्यावरील सलग, उठावदार, प्रमाणबद्ध कोरीवकामामुळे जगप्रसिद्ध आहेत. सलग ६०० मीटर लांब व दोन मीटर उंच असलेल्या या
पॅनेलवर रामायण व महाभारत यांतील अनेक प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. कुरुक्षेत्रावर लढणारे कौरव-पांडवांचे प्रचंड सैन्य, हत्ती, घोडे, रथ व त्यावरील योद्धे, बाणाच्या शय्येवर झोपलेले भीष्म, बाणाने वेध घेणारे द्रोणाचार्य, भूमीत रुतलेले रथाचे चाक वर काढणारा कर्ण, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण, हत्तीवरून लढणारा भीम व त्याच्या ढालीवरील राहूचे तोंड असे अनेकानेक प्रसंग कोरले आहेत. पायाला बांधलेल्या उखळीसकट रांगणारा कृष्ण, कृष्णाने करंगळीवर उचललेल्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेणारे गुराखी व गायी, आपल्या २० हातांनी कैलास पर्वत हलविणारा रावण, पार्वतीच्या विनंतीवरून शंकराला बाण मारणारा कामदेव, त्याच्या मृत्यूनंतर रडणारी रती, वाली व सुग्रीव युद्ध, वासुकी सापाची दोरी करून समुद्रमंथन करणारे देव-दानव, त्या समुद्रातून वर आलेले मासे, मगरी, कासवे, आकाशातील सूर्य-चंद्र, कुर्मावतारातील विष्णूने तोलून धरलेला मंदार पर्वत अशा अनेक शिल्पाकृती पाहून आपण विस्मयचकित होतो.
दुसऱ्या बाजूच्या पॅनेलवर सूर्यवर्मन राजाची शाही मिरवणूक आहे. यात प्रधान, सेनापती, प्रजाजन, हत्ती, घोडे, रथ व बासरी, ढोलकी, गाँग वाजविणारे वादक दाखविले आहेत. त्यापुढील पॅनलवर हिंदू पुराणांतील स्वर्ग, नरक, देवदेवता, रेडय़ावरील यमराज दाखविले आहेत. या सबंध मंदिरात मिळून जवळजवळ १८०० अप्सरांची पूर्णाकृती शिल्पे आहेत.  विविध ठिकाणी शंकर, मारुती, गणपती यांच्या छोटय़ा मूर्ती आहेत. हे गणपती दोन हातांचे, सडपातळ व सोंड पुढे वाकलेली असे आहेत. जिथे गणपतीला चार हात आहेत, तिथे मागील दोन हातांत कमल व चक्र आहे.
वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून वाखाणलेल्या या देवालयाचे एकावर एक तीन मजले आहेत. लांबलचक कॉरिडॉर्स नि उंच जिन्यांनी ते एकमेकांना जोडलेले आहेत. दुसऱ्या मजल्यावर जाताना भगवान बुद्धाचे उभे व बसलेले वेगवेगळ्या मुद्रांमधील अनेक पुतळे आहेत. गॅलरीच्या दोन्ही बाजूंच्या खांबांवर नागाची शिल्पे आहेत. तिसऱ्या मजल्यावर जाण्याकरता पाच मजली उंच शिडी चढून जावे लागते. तेथील गच्चीवरून या मंदिराची रचना व आजूबाजूचा भव्य परिसर न्याहाळता येतो. मंदिराच्या गॅलऱ्यांचे दगडी खांब एखाद्या लेथवर केल्यासारखे सुरेख वळणावळणांचे आहेत.
अंगकोर थोम (शहर) येथील गुलाबी कमळांच्या तळ्यावरील छोटा पूल ओलांडला की रस्त्याच्या एका बाजूला देव, तर दुसऱ्या बाजूला दानव सात फण्यांच्या नागाचे लांबलचक जाड अंग धरून समुद्रमंथन करताना दिसतात. या नगरीचे प्रवेशद्वार २३ मीटर म्हणजे जवळजवळ सात मजले उंच आहे. त्यावर चारी दिशांना चार तोंडे असलेली भव्य मूर्ती आहे. पायथ्याशी दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला सोंडेने कमळे तोडणारा इंद्राचा ऐरावत आहे. त्यांच्या सोंडा प्रवेशद्वाराचे खांब झाल्या आहेत. अशी पाच प्रवेशद्वारे असलेल्या या शहराचा बराचसा भाग आज जंगलांनी व्यापला आहे.
आठ मीटर उंच व प्रत्येक बाजू तीन किलोमीटर लांब अशी भक्कम लाल कोब्याची संरक्षक भिंत या शहराभोवती उभारण्यात आली होती. त्यापैकी फक्त दक्षिणेकडील भाग आज सुस्थितीत आहे. प्रत्येक कोपऱ्यात उंच देवालय तसेच लोकेश्वर बुद्धाची देवळे आहेत. मुख्य बेयॉन देवालय तीन पातळ्यांवर असून त्यावर ५४ उंच मनोरे आहेत. प्रत्येक मनोऱ्यावर राजाशी साम्य असलेले चार हसरे चेहरे आहेत. फणा उभारलेले नाग, गर्जना करणारे सिंह आहेत. सहा दरवाजे असलेल्या लायब्ररीसारख्या इमारती बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यावरील पट्टिकांवर कमळे, देवता कोरल्या आहेत. एक आरोग्यशाळा (हॉस्पिटल) आहे. एके ठिकाणी नागाच्या वेटोळ्यावर बसलेली, चेहऱ्याभोवती नागाचा फणा असलेली १२ फूट उंचीची भगवान बुद्धाची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे. उंच चौथऱ्याच्या खालील बाजूला अप्सरा, चायनीज व खमेर सैनिक, वादक, प्राण्यांची शिकार, शिवलिंग, आई व मूल, बाळाचा जन्म, मार्केटमध्ये भाजी-फळे विकणाऱ्या स्त्रिया, माकडे, कोंबडय़ांची झुंज, मोठा मासा, गरुडावरील विष्णू, नौकाविहार करणाऱ्या स्त्रिया अशी शिल्पे आहेत. एका चौथऱ्याखाली हत्तींची रांग, तर एके ठिकाणी मनुष्यधडाला एकदा गरुडाचे व एकदा सिंहाचे तोंड असलेली अनेक शिल्पे आहेत. पोलोसारखा खेळ खेळताना ते दाखविले आहेत. अगदी खालच्या पातळीवर पाताळातील नागदेवता, जलचर आहेत. नाक तुटलेला, हाताचा अंगठा नसलेला व लिंग नसलेला एक राजा कोरलेला आहे. त्याला ‘लेपर किंग’ असे म्हणतात. जयवर्मन सातवा व जयवर्मन आठवा यांच्या कारकीर्दीत हे शहर उभारले गेले आहे.
दा फ्राम येथील शिल्पकाम जयवर्मन सातवा याच्या काळात बाराव्या-तेराव्या शतकात झाले. येथे त्याने आपल्या आईसाठी यज्ञगृह व ध्यानगृह उभारले होते. भगवान बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग इथे कोरलेले आहेत. द्वारपाल, भूमिदेवता, लायब्ररी, नृत्यालय, घोडेस्वारांची मिरवणूक, पुराणातील प्राणी असे सगळे शिल्पकाम गाइडने दाखविल्यावरच आपल्याला दिसते. कारण प्रचंड वृक्षांनी आपल्या मगरमिठीत हे शिल्पकाम जणू गिळून टाकले आहे. सावरीच्या कापसाची झाडे व एक प्रकारच्या अंजिराच्या जातीच्या झाडांनी या बांधकामातील भेगा रुंद करून आपली पाळेमुळे त्यात घुसवून शिल्पांवर कब्जा केला आहे.
बान्ते सरायचा शोध १९३६ साली लागला. गुलाबी सॅण्डस्टोनमधील येथील शिल्पकाम अत्यंत सुबक, शोभिवंत आहे. मूर्तीभोवतीच्या महिरपीवरील नक्षी, कमळे, पाने, फुले, फळे, पक्षी यांनी सुशोभित आहे. नंदीवर बसलेले उमा-महेश्वर, हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह, इंद्राचा ऐरावत, सीताहरण, सुंद-उपसुंद यांची लढाई, भीम-दुर्योधन गदायुद्ध, शिवाचे तांडवनृत्य, सिंहरूपातील दैत्यावर नर्तन करणारी दुर्गा, शिवावर बाण मारणारा कामदेव, खांडववनाला लागलेल्या आगीवर पाऊस पाडणारा इंद्र आणि त्या पावसाला अडविण्यासाठी अर्जुनाने उभारलेले बाणांचे छप्पर, कृष्णाने केलेला कंसवध, कुबेर, हंसावरील देवता अशा अनेक देखण्या शिल्पांनी सजलेले छोटे असे हे मंदिर म्हणजे खमेर कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. माकड, गरुड, सिंह, अप्सरा, शंकराच्या मांडीवर बसलेली पार्वती, सज्जे, दरवाजांवरील छज्जे (लिंटल) असे सारे सुंदर उठावदार नक्षीकाम आणि शिल्पकामाने इंच न् इंच भरलेले आहे.
युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या इथल्या शिल्पांचे संरक्षण व पुनर्बाधणी करण्यासाठी जपान, चीन, फ्रान्स असे अनेक देश मदत करीत आहेत. भारताच्या पुरातत्त्व खात्यातर्फे येथील दोन मंदिरांत पुनर्निर्माणाचे काम करण्यात येत आहे. परंतु येथील अनेक मूर्ती चोरून विकण्यात आल्या आहेत, तसेच पॉल पॉटच्या कारकीर्दीत त्यांचा विद्ध्वंसही करण्यात आला आहे. अनेक शतके पिचत पडलेल्या कंबोडियाच्या राजवटीने गेल्या दहा वर्षांत आपली दारे जगासाठी उघडली आहेत. या दहा वर्षांत पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सोयी-सुधारणाही करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धी असलेल्या कंबोडियाला आपले पूर्ववैभव लवकरच प्राप्त करता येईल अशी आशा करूया.



-------------- लोकसत्ता 





Tuesday, 1 May 2012

पांचट जोकस ( PJ )

पांचट जोकस 



एका मानसाला पाच मुले असतात
पहिल्याचे नाव "एक"
दुसय्राचे नाव "दोन"
 ...
...
आणि पाचव्याचे नाव "तीन"
तर तिसय्रा आणि चौथ्या मुलांची नावे काय ?
...
...
...
...
...
...
साडे आणि माडे

 ------------------------------------------
 एक हत्ती विहिरीत पडतो.. तो बाहेर कसा येईल..?
...
...
...
ओला होऊन.

 ------------------------------------------
 दोन मग ( चहा/दूध/कॉफी प्यायचा मग हो..) एकमेकांना भेटतात तर पहिला मग दुसर्‍या मगाला काय म्हणेल..??
उत्तरः काय मग..??

पुढे..
त्यातील एक मग पुढे एक बशीला भेटला. तिने त्याला काय विचारले?
- काय रे, मगाशी(मघाशी) काय बोलत होता?


 ------------------------------------------

एका जोडप्याला अकरा मुले असतात...त्यातल्या पहिल्या दहांची नावे दहा, वीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद, आणि शंभर अशी असतात. तर अकराव्या मुली चे नाव काय असेल?
...
...
...
"रेडीक्का?" !!

 ------------------------------------------
 संता कचेरीत जाण्यासाठी कपडे करुन निघाला. घराबाहेर पडला तोच वरून एका कावळ्याने संताच्या कपड्यांवर घाण केली. संता वैतागला.
त्याच्या बायकोने ते पाहिले आणि ती बिचारी टिश्यू पेपर घेउन धावत बाहेर आली.
संता आणखी वैतागला.

म्हणाला "आत्ता कुणाची पुसणार? कावळा तर उडून गेला ! !!!"

 ------------------------------------------

एकदा रबरीदेवी एका बकरीला घेऊन लालू कडे जाते. त्याना येताना पाहून लालू म्हणतो ,

" ई भैसवा कहा से लायी ?"

रबरी म्हणते," लालू, ई भैसवा नाही है, ई तो गोटवा है."


लालू म्हणतो ," हम जानता हू, ...........हम तो गोटवा से पूछ रहा था."

 ------------------------------------------


एकदा एका सरदारजीला चित्रपटात काम करावेसे वाटते, तसा तो एका दिग्दर्शकाच्या भेटिला शूटिंगमधे जातो व त्याला आपली इच्छा बोलून दाखवतो.
"हं नाचता येतं का तुम्हाला?"
"नाही"
"बरं मग साहसदृष्ये देता येतिल?"
"नाही"
"मग चरित्र अभिनय?"
"नाही"
"अहो मग येतं काय तुम्हाला?"
यावर सरदारजी म्हणतो "सर मला उडता येतं!"
सरदारजीच्या या उत्तरावर सगळं युनिट खो-खो हसतं व सगळेजण त्याची टिंगल करू लागतात.
बराचवेळ टवाळी ऐकून सरदारजीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तो चिडून लाल होतो आणि.........
.......
.......
.......
.......

उडून जातो!
 ------------------------------------------
 एकदा एक सरदारजी हातात पोपटाचा पिंजरा घेऊन ट्रेन मधून उतरतो. कुतुहल म्हणून, बाजुचाच एक प्रवासी जवळ येऊन,
"अरे वाह ! कहासे लाये इसको ?" असं विचारतो.
पिंजर्‍यातून पोपट म्हणतो "दिल्लीसे "

 ------------------------------------------
 एक सरदारजी ट्रनेने दिल्लीला निघाला असतो. त्याच्या बाजुच्या सीटवर एक न्हावी असतो, जाम खोडकर. रात्र होते, आणि सरदार झोपायला जातो. जाता-जाता, नाव्ह्याला " मुझे सुबह ५ बजे उठा दे ना" अशी विनंती करतो. "जरूर" म्हाणून न्हावीसुध्दा झोपेचं सोंग घेतो. सरदार गाढ झोपला आहे, ह्याची खात्री होताच, न्हावी गुपचुप त्याची दाढी करून टाकतो, केसही कापून टाकतो ! आणि परत झोपी जातो. पहाटे, ५ वाजता, सरदाजीला उठवतो. सरदार त्याला thank you  म्हाणूनम बाथरुमला जातो. तिथे समोरच्या आरशात स्वतःला पहातो.. आणि एकदम confuse होऊन म्हणतो...

"साला... ये हजामने तो गलत आदमी को उठा दिया !"

 ------------------------------------------

एक सरदारजी नोकरीसाठी अर्ज भरत असतो.  त्यातल्या सॅलरी एक्स्पेक्टेड या कॉलम समोर तो लिहितो, - येस!!


 ------------------------------------------

शेवटी सगळ्या सरदार लोकांनी मिळुन ठरवल की आता बास झाले. सिद्ध करुया की सरदार ही हुशार असतात.
   ह्या दाव्याची सत्यता पडताळुन बघण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. सरदारांनी सांतासिंगला आपला प्रतिनिधी निवडला.
 आणि सुरु झाली परिक्षा ........
      समिती - ' ७ + ६ ' किती ?
     सांतासिंग - ( खुप विचार करुन... ) १४
      समिती - चूक !
  सगळे सरदार -(ओऱडून) कृपया त्याला आणखी एक संधी द्या........
     समिती -  ' ५ + ४ ' किती ?
    सांतासिंग - ( खुप खुप विचार करुन... ) ८
       समिती -  चूक !
  सगळे सरदार-(ओरडून)  कृपया त्याला आणखी एक संधी द्या........शेवटची
      समिती -  ' २ + २ ' किती ?
   सांतासिंग - ( खुप खुप खुप विचार करुन... ) ४

 सगळे सरदार-(ओरडून)  कृपया त्याला आणखी एक संधी द्या...............

 ------------------------------------------

एकदा दोन मुंग्या झाडावर बसलेल्या असतात. तिकडुन एक हत्ती येत असतो. त्या मुंग्यांची त्याच्याशी जाम खुन्नस असते. तो झाडाखालुन जाताना एक मुंगी त्याच्या अंगावर पडते , तर दुसरी मुंगी काय म्हणेल


'दबा दे साले को'
 ------------------------------------------

एकदा शिवबा आणि जिजाऊ पत्ते खेळत असतात. 
जिजाबाई म्हणतात, "शिवबा, तो बघ, तो खिडकीतून दिसणारा किल्ला आमच्या मनात घर करून राहिला आहे... तो घेऊन ये!"
आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानून, शिवाजीमहराज लगेच घोड्यावर मांड ठोकून जातात....
१५-२० मिनिटांत परत येऊन म्हणतात,
"आऊसाहेब, तो किल्ला आपलाच होता!!!"
यावर जिजाऊ काय म्हणाल्या????
.
.
.
.
.
.
 जिजाबाईः "मला माहित होतं, पण मल तुझे पत्ते बघायचे होते" ;)
 ------------------------------------------

एका गावात एक माणूस विहीरीत पडून मेला. चौकशीकरीता पोलिस आले. संशय हा की त्याला मारून विहिरीत टाकण्यात आले. त्यांनी एका माणसाला विचारले.


पोलिसः हा माणूस विहीरीत पडून मेला. कशावरून?


माणूसः विहीरीच्या कठड्यावरून.


पोलिसः अहो, तसे नाही हो. हा माणूस विहीरीत पडूनच मेला, ह्याला पुरावा काय?


माणूसः अहो, हा माणूस हिंदू आहे. ह्याला पुरावा नाही.. ह्याला जाळावा.
 ------------------------------------------
 संता आणि बंता दोघांना मोबाईल फोन वापरण्याचा कंटाळा आला आणि त्यांनी संदेशवहनासाठी कबूतर वापरायचे ठरवले.
एकदा बंताकडे आलेल्या कबूतराबरोबर कोणताच संदेश आला नाही. बंताने वैतागून संताला फोन केला आणि विचारले.

 त्यावर संता म्हणाला, "ओये! तो मिस्ड कॉल होता!"
 ------------------------------------------
 संता आणि बंता दोघांना ३ जिवंत बॉम्ब सापडले. ते सर्व पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी ते निघाले.
वाटेत,
संता : काय रे? यातला एक आपल्या हातात असताना फुटला तर काय?

 बंता : काही नाही, पोलिसांना सांगू दोनच मिळाले
 ------------------------------------------

जॅकी चॅनच्या सासुचे नाव काय?
.
.
.
.
.
.
.
डी-कोल्ड (चॅनकी सास डी-कोल्ड)
 जॅकी चॅनच्या सुनेचे नाव काय?
.
.
.
.
.
.
.
डी-कोल्ड (क्यूकी सास भी कभी बहू थी)
 ------------------------------------------

राहूल द्रविड खेळत असताना ड्रिंक्स आलं.  तेवढ्यात त्याने सौरवला पॅवेलिअनमधून बोलावले.  असे का?
.
.
.
.
.
.
.
.
कारण सौरव ओपनर होता
 ------------------------------------------

एक सरदार्जी त्याच्या गरोदर बायकोला एस एम एस पाठवतो..आणि २ मिनिटानी त्याच्या मोबाईल वर एक रिपोर्ट येतो...आणि सरदार एकदम नाचायलाच लागतो... का सान्ग पाहू...??
.
.
.
.
कारण, त्या रिपोर्ट वर " डिलिव्हर्ड" असे लिहिलेले असते.
 ------------------------------------------

पॉपकॉन गॅसवर ठेवल्यावर का उड्तात....???
 .........

 .........

 .........

 .........


 .........


 .........

स्वःता बसुन बघा ...................... ;)

 ------------------------------------------

चिनी कुत्र्याचे नाव काय?
हे हुंग ते हुंग
-----------------
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल?
हिंदुस्तान लिव्हर
-----------------
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
-----------------
रशियन डोअरकिपरचे नाव काय?
उभा का बस की
-----------------
ढिशुम ढिशुम
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेंट चे काम आहे ना....
-----------------
रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी..
रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..
-----------------
पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे रवतात?
दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!
-----------------

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
-----------------
ब्रूस लीच्या आईचे नाव काय?
माऊ ली
-----------------
त्याच्या मो¤ ्या बहिणीचे नाव काय?
थोर ली
-----------------
लहान बहिणीचे नाव काय?
धाक ली
-----------------

जेंव्हा घड्याळात तेरा ोके पडतात ती वेळ कुठली असते?
घड्याळ दुरुस्त करण्याची!
-----------------

कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
-----------------
संता कंप्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता.
मुलाखत घेणार्‍यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का? ''
संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!! ''
----------------- 
पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुय?
मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय. 
---------------

नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का
कारण...
....
...
शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.
--------------
एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी  चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही.
का?
कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.  

------------------------------------------

 चिनी डॉक्टरचं नाव काय?

टोचू का सुई?

रशियन वॉचमन चं नाव काय?

वस्कन (वसकन) ओरडलास की !

आणि एक...

एक बदक एका किराण्याच्या दुकानात जातं. दुकानदाराला विचारतं डाळ आहे का डाळ?

दुकानदार : नाही

परत दोन दिवसांनी जातं, विचारतं, डाळ आहे का डाळ?

दुकानदार : नाही

परत दोन दिवसांनी जातं, "डाळ आहे का डाळ?"

दुकानदार : नाही रे बाबा

परत...."डाळ आहे का डाळ?"

दुकानदारः (वैतागून) एकदा संगितलं ना नाहिये म्हणून?

परत..."डाळ आहे का डाळ?"

दुकानदारः आता जर इथे आजूबाजूला जरी दिसलास ना तर सुरीने तुझी मानच कापून टाकीन

खूप दिवस बदक येत नाही..

बरेच दिवसांनी

बदकः सुरी आहे का सुरी?

दुकानदारः नाहिये नाहिये नाहिये....

बदकः मग "डाळ आहे का डाळ?"
------------------------------------------

स्पेशल मराठी जोक्स 

एक माणुस  कुत्र्याचे पिल्लू विकत आणतो.  

त्याला  इंग्लिश  शिकवायचे म्हणून  बिस्किट हातात धरतो आणि ओरडतो   "टेक ! टेक !!"


पिल्लू  मागे  मागे   सरकत  जाते  आणि ......





आणि ......


 


भिंतिला  टेकते .











Thursday, 26 April 2012

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र




प्रियगुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारेनेतेही.  असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही, 

मला माहित आहे ! सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत....... तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम, आयत्यामिळालेल्याघबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,  

तुमच्यात शक्ती असती तर ....... त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.गुंडांना भीत जावू नको म्हणावं, त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवित चला त्याला , ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव. मात्र त्याबरोबरच , मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,  सृष्टीचं शाश्वत सौंदर्यअनुभवायला , पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............ सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं...... शाळेत त्याला हा धडा मिळू दे , फसवूनमिळालेल्या यशापेक्षा , सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे . आपल्या कल्पना, आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने , बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी , त्याला सांगा भल्याशी भलायीन वागावं, आणि टग्यांना अद्दल घडवावी .माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत, सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी.

पुढे हेही सांगा त्याला , ऐकावं जनाच अगदी सर्वांच .... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून , आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत रहावं उरातल दुख्ख दाबून , आणि म्हणावं त्याला आसवांची लाज वाटू देऊ नको.  

त्याला शिकवा ......... तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला , अन चाटुगिरीपासून सावध रहायला . त्याला हे पुरेपूर समजवा की , करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,  पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.  धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,  कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,  जे सत्य आणि न्याय वाटते,  त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.  त्याला ममतेन वागवा,  पण, लाडावून ठेवू नका.  आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
 लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,  त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,  अन धरला पाहिजे धीर त्याने,  जर गाजवायच असेल शौर्य .  

आणखीही एक सांगत रहा त्याला ....  आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,  तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,   

माफ करा गुरुजी,   मी फार बोललो आहे_  खूप काही मागतो आहे....... पण पहा........   जमेल तेवढ अवश्य कराच, 

 माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.

अब्राहम लिंकन