Saturday, 1 August 2020

मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 February, 2011 - 05:04

खास मासेखाउंसाठी हा धागा आहे 

पण मासे न खाणार्‍यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.

ह्या माझ्या रेसिपीज.

ओले मासे :

१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्‍या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476
८) कालवं - http://www.maayboli.com/node/17608
९) बोईट - http://www.maayboli.com/node/17668
१०) मोदकं - http://www.maayboli.com/node/17789
११) बांगडा - http://www.maayboli.com/node/18075
१२) जवळा - http://www.maayboli.com/node/18208
१३) वाकट्या - http://www.maayboli.com/node/18382
१४) जिताडा - http://www.maayboli.com/node/20560
१५) बला - http://www.maayboli.com/node/20877
१६) मांदेली - http://www.maayboli.com/node/21084
१७) रावस - http://www.maayboli.com/node/21417
१८) खुबड्या - http://www.maayboli.com/node/22050
१९) खुबे - http://www.maayboli.com/node/22575
२०) निवटे - http://www.maayboli.com/node/22776
२१) कोलिम - http://www.maayboli.com/node/23828#new
२२) काटी/करलई - http://www.maayboli.com/node/24374
२३) चिंबोरे/खेकडे - http://www.maayboli.com/node/24606
२४) पालकं - http://www.maayboli.com/node/24872
२५) हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139
२६) कडकड्या - http://www.maayboli.com/node/25353
२७) वडा - http://www.maayboli.com/node/25511
२८) करंदी - http://www.maayboli.com/node/25559
२९) नळ माखली - http://www.maayboli.com/node/25838
३०) शिंगाळ्याची अंडी - http://www.maayboli.com/node/26257
३१) कोलंबी - http://www.maayboli.com/node/26378
३२) पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
33) कालेटं - http://www.maayboli.com/node/26762
३४) टोळ - http://www.maayboli.com/node/29033
३५) सुरमई - http://www.maayboli.com/node/29247
३६) घोये - http://www.maayboli.com/node/30559
३७) घोळ - http://www.maayboli.com/node/31057
३८) भाकस - http://www.maayboli.com/node/31547
३९) इंग्लिश मासे - http://www.maayboli.com/node/31741
४०) कान्टा - http://www.maayboli.com/node/39244
४१) पिळसा - http://www.maayboli.com/node/40182
४२) ढोमा - http://www.maayboli.com/node/41698
४३) खेंगट - http://www.maayboli.com/node/43809
४४) हेकरू - http://www.maayboli.com/node/43900
४५) खवली - http://www.maayboli.com/node/45612
४६) नारबा - http://www.maayboli.com/node/46074
४७) राणी मासे - http://www.maayboli.com/node/48437
४८) घोलू - http://www.maayboli.com/node/49147
४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल - http://www.maayboli.com/node/53700
५०) शेवंड http://www.maayboli.com/node/53940

सुके मासे :

(फोटो सकट रेसिपीज)
१) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289

सुकट मेथी घालून - http://www.maayboli.com/node/9332
बोंबिल बटाटा कालवण - http://www.maayboli.com/node/8910
बोंबिल बटाटा सुके - http://www.maayboli.com/node/8909
जवळा वांग - http://www.maayboli.com/node/8617
कुरकुरीत बोंबिल - http://www.maayboli.com/node/8119
सागरी सुका मेवा http://www.maayboli.com/node/52789

चिकन/मटण
१) तंदुर चिकन - http://www.maayboli.com/node/22424
२) पोपटी - http://www.maayboli.com/node/21397
३) पारंपारीक चिकन्/मटण रस्सा - http://www.maayboli.com/node/18422
४) ग्रिन चिकन - http://www.maayboli.com/node/18406
५) पाया सुप - http://www.maayboli.com/node/44407

अंडी
१) अंडा मसाला - http://www.maayboli.com/node/18273
२) अंडी पालक - http://www.maayboli.com/node/48744

माशांचे इतर प्रकार.
भरले खेकडे http://www.maayboli.com/node/47358

मांसाहारी स्टार्टर्स १) माखलीच्या रिंग्ज http://www.maayboli.com/node/46763

डोसे प्रकार


डोसे प्रकार


Submitted by आरती. on 17 April, 2015 - 04:42
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रत्येक डोश्याच्या जिन्नसमध्ये जो तांदूळ दिला आहे तोच वापरून वेगवेगळ्या चवीचे डोसे चाखा. Happy प्रत्येक प्रकारच्या डोश्याची एक वेगळी चव आहे.

१. पेपर डोसा / साधा डोसा
डोसा राईस / कोणताही जाड तांदूळ - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून


20151219_164812.jpgमसाला डोसा ची बटाट्याची भाजी

फोडणीत उभा चिरलेला कांदा, राई, चणाडाळ, उडिद डाळ. हि. मि. कढीपत्ता, घालून डाळींचा रंग लालसर झाला की त्यात थोडी हळद घालायची त्यात २ टे. स्पून पाणी घालून थोड उकळू देऊन मग त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. पाणी आटत आल की त्यात ओल खोबर आणि कोथिंबीर घाला.

२. सेट डोसा / स्पंज डोसा / आंबोळ्या / पोळ्ये

डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून


P26-05-13_06.31[1].jpgP26-05-13_06.32[1].jpg

३. दावणगिरी डोसा
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
साबुदाणा - १/२ वाटी
चणा डाळ - १/४ वाटी
मेथी दाणे - १ टी स्पून


४ - थंडीतील सेट डोसा हा थोडा कडवड लागतो. Happy
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १/४ वाटी
हळद - २ टी. स्पून


kadu dosa.jpg

५ - सेट डोसा (अजून एक प्रकार)
डोसा राईस - २ वाटी
उकडा तांदूळ (लाल, पिवळा किंवा ईडली राईस) - २ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टि. स्पून
चणा डाळ / चटणी डाळ - १/४ वाटी
मुगाची डाळ - १/४ वाटी


६ - नाचणी डोसा
नाचणीच पीठ - ४ वाटी
उडदाची डाळ - १/४ वाटी
मेथी - १/४ टी स्पून
पोहे - १/२ वाटी


७- नीर डोसा

जूना कोणताही तांदूळ - ४ वाटी ( नविन तांदूळाचा थोडा सांभाळून करावा लागतो पण चविष्ट होतात म्हणून ही टीप. Happy
ओल खोबर - २ टे. स्पून
साखर - १ टी. स्पून
मीठ - चवीनुसार


neer dosa.jpg

८. मूग डोसा (पेसाराट्टू)

मूग - २ वाटी

बेडगी मिरची - ४-५

काळी मिरी - ७-८
आल - १/२ इंच
मीठ - चवीनुसार


क्रमवार पाककृती: 

१. सकाळी तांदूळ व मेथी एकत्र भिजत घाला. उडिद डाळ वेगळी भिजत घाला. साबुदाणे थोडे जास्त पाणी घालून भिजत घाला. संध्याकाळी वाटायच्या १५ मि.अगोदर पोहे भिजत घाला. चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ ही तांदूळाबरोबर भिजत घाला.

२. ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये तांदूळ + मेथी दाणे + पोहे + चण्याची डाळ/ चटणी डाळ/ मूगाची डाळ / साबुदाणे एकत्र बारीक वाटून घ्या. उडदाची डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.

३. एका डब्यात मिश्रण ओतून घ्या. त्यात चवीपुरते मीठ घाला. चमच्याने मिश्रण एकाच दिशेने फेटा. १ टे. स्पून कच्चे तेल मिश्रणावर चमच्याने घाला आणि डब्याला झाकण लावून ठेवा.

४. सकाळी मिश्रण फुगून वर येईल. चमच्याने एकाच दिशेने ढवळून घ्या.

५. बीडाचा तवा तेल लावून गरम करून घ्या. चमच्याने मिश्रण तव्यावर घालून डोसे काढा.

नाचणीच्या डोश्यासाठी

सकाळी उडीद डाळ आणि मेथी वेगवेगळ भिजत घाला. संध्याकाळी दोन्ही एकत्र बारीक वाटून घ्या.
त्यात नाचणीच पीठ, चवीपुरत मीठ, थोड पाणी घालन एकाच दिशेने ढवळून पीठ आंबवायला ठेवा.
सकाळी पेपर डोसे काढा. ह्याचे सेट डोसे मला नाही आवडत. हा डोसा गरम खायला जास्त चांगला लागतो.

नीर डोसा

रात्री तांदूळ भिजत घाला. सकाळी तांदूळ, ओल खोबर, साखर घालून मिक्सरवर वाटून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण काढून घ्या आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घाला. हे मिश्रण पातळ हव.

बिडाच्या तव्याला तेल लावून तापवून घ्या. गॅसची फ्लेम मोठीच ठेवा. मिश्रण तव्यावर ओता आणि लगेच फ्लेम स्लो करा. मंदाग्नीवर हा डोसा करतात. हव तर दुसर्‍या बाजूने एक सेंकंद भाजा. हे डोसे जाळीदार आणि पांढरे शुभ्र होतात. प्रत्येक वेळी डोसा घालताना फ्लेम मोठी हवी. घालून झाल्यावर फ्लेम स्लो करा.

मूग डाळ डोसा

मूगाची डाळ रात्री भिजत घाला. सकाळी डाळ, बेडगी मिरची, काळी मिरी, आल घालून वाटून घ्या. चवीनुसार मीठ घालून लगेच डोसे करा.

डोश्याच्या पीठाचे अजून काही प्रकार

पेपर डोशाच पीठ तव्यावर पसरवल की लगेच त्यावर थोड जिर आणी उभा बारीक चिरलेला कांदा स्प्रिकंल करा. थोड तेल घालून जिर आणि कांदा दाबून घ्या. डोसा फोल्ड करून खायला घ्या. उन्हाळ्यात हा डोसा बनवला जातो. क्रिस्पी जिर कांद्याचा डोसा यम्मी लागतो. नुसता किंवा चटणीबरोबर. Happy

सेट डोशाच पीठ तव्यावर पसरवून त्यावर कच्च अंड फोडून घालून त्यावर मीठ , काळीमिरी पूड, कोथिंबीर, हि. मि. बारीक कापून स्प्रिकंल करतात आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजतात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढे
अधिक टिपा: 

१. डोसा राईस आणि ईडली राईस मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. केरला स्टोअर्समध्ये फक्त ईडली राईस मिळतो.
२. पीठात कच्चे तेल घातल्यावर पुन्हा ढवळू नये.
३. पीठ आंबल्यावर त्यात पाणी घालू नये त्याने डोसे नीट होत नाहीत. जी काही कंन्सिस्टंसी पीठाची करायची असेल ती डाळ तांदूळ वाटल्यावर लगेच करावी.

मूगाचा डोसा
 उपवासाला चालतो. रोजच्यासाठी बनवायचा असेल तर डोसा तव्यावर पसरवल्यावर त्यावर कांदा बारीक चिरून स्प्रिंकल करा.

क्रिस्पी पेपर डोश्यासाठी टिप्स
तवा व्यवस्थित तापवून घ्या. गॅस मिडीयम फेल्मवर ठेवा. रुमाल मीठाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात बुडवून तापलेला तव्यावर ओला रूमालने पुसून घ्या. त्यावर चमच्याने मधोमध पीठ घालून संपूर्ण तव्यावर पसरवा. एक टिस्पून तेल / बटर / घी डोश्याच्या वरच्या बाजूला सगळीकडे लागेल अस शिंपडा आणि पसरवून घ्या

सेट डोसा, दावणगिरी डोसा बनवताना प्रत्येक वेळेस तव्याला तेल /बटर/ तूप लावून मग त्यावर पीठ घालून तुम्हाला हव्या त्या जाडीचा डोसा पसरवा.


सेट / दावणगिरी डोसे 

प्रवासासाठी उपयुक्त. २-३ दिवस सहज टिकतात. सॉफ्टही राहतात.
प्रवासासाठि नेताना हे डोसे थंड करून डब्यात भरायचे. त्याला अजिबात वाफ सुटायला नको तसेच पाण्याचा हात लावू नका.