पांचट जोकस
एका मानसाला पाच मुले असतात
पहिल्याचे नाव "एक"
दुसय्राचे नाव "दोन"
...
...
आणि पाचव्याचे नाव "तीन"
तर तिसय्रा आणि चौथ्या मुलांची नावे काय ?
...
...
...
...
...
...
साडे आणि माडे
------------------------------------------
एक हत्ती विहिरीत पडतो.. तो बाहेर कसा येईल..?
...
...
...
ओला होऊन.
------------------------------------------
दोन मग ( चहा/दूध/कॉफी प्यायचा मग हो..) एकमेकांना भेटतात तर पहिला मग दुसर्या मगाला काय म्हणेल..??
उत्तरः काय मग..??
पुढे..
त्यातील एक मग पुढे एक बशीला भेटला. तिने त्याला काय विचारले?
- काय रे, मगाशी(मघाशी) काय बोलत होता?
------------------------------------------
एका जोडप्याला अकरा मुले
असतात...त्यातल्या पहिल्या दहांची नावे दहा, वीस, तीस, चाळीस, पन्नास,
साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद, आणि शंभर अशी असतात. तर अकराव्या मुली चे नाव काय
असेल?
...
...
...
"रेडीक्का?" !!
"रेडीक्का?" !!
------------------------------------------
संता कचेरीत जाण्यासाठी कपडे करुन निघाला. घराबाहेर पडला तोच वरून एका
कावळ्याने संताच्या कपड्यांवर घाण केली. संता वैतागला.
त्याच्या बायकोने ते
पाहिले आणि ती बिचारी टिश्यू पेपर घेउन धावत बाहेर आली.
संता आणखी
वैतागला.
म्हणाला "आत्ता कुणाची पुसणार? कावळा तर उडून गेला ! !!!"
------------------------------------------
एकदा रबरीदेवी एका बकरीला घेऊन लालू कडे जाते. त्याना येताना पाहून लालू म्हणतो ,
" ई भैसवा कहा से लायी ?"
" ई भैसवा कहा से लायी ?"
रबरी म्हणते," लालू, ई भैसवा नाही है, ई तो गोटवा है."
लालू म्हणतो ," हम जानता हू, ...........हम तो गोटवा से पूछ रहा था."
------------------------------------------
एकदा एका सरदारजीला चित्रपटात काम करावेसे वाटते, तसा तो एका
दिग्दर्शकाच्या भेटिला शूटिंगमधे जातो व त्याला आपली इच्छा बोलून दाखवतो.
"हं नाचता येतं का तुम्हाला?"
"नाही"
"बरं मग साहसदृष्ये देता येतिल?"
"नाही"
"मग चरित्र अभिनय?"
"नाही"
"अहो मग येतं काय तुम्हाला?"
यावर सरदारजी म्हणतो "सर मला उडता येतं!"
सरदारजीच्या या उत्तरावर सगळं युनिट खो-खो हसतं व सगळेजण त्याची टिंगल करू लागतात.
बराचवेळ टवाळी ऐकून सरदारजीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तो चिडून लाल होतो आणि.........
.......
.......
.......
.......
उडून जातो!
------------------------------------------
एकदा एक सरदारजी हातात पोपटाचा पिंजरा घेऊन ट्रेन मधून उतरतो. कुतुहल म्हणून, बाजुचाच एक प्रवासी जवळ येऊन,
"अरे वाह ! कहासे लाये इसको ?" असं विचारतो.
पिंजर्यातून पोपट म्हणतो "दिल्लीसे "
------------------------------------------
एक सरदारजी ट्रनेने दिल्लीला निघाला असतो. त्याच्या बाजुच्या सीटवर एक
न्हावी असतो, जाम खोडकर. रात्र होते, आणि सरदार झोपायला जातो. जाता-जाता,
नाव्ह्याला " मुझे सुबह ५ बजे उठा दे ना" अशी विनंती करतो. "जरूर" म्हाणून
न्हावीसुध्दा झोपेचं सोंग घेतो. सरदार गाढ झोपला आहे, ह्याची खात्री
होताच, न्हावी गुपचुप त्याची दाढी करून टाकतो, केसही कापून टाकतो ! आणि
परत झोपी जातो. पहाटे, ५ वाजता, सरदाजीला उठवतो. सरदार त्याला thank you
म्हाणूनम बाथरुमला जातो. तिथे समोरच्या आरशात स्वतःला पहातो.. आणि एकदम
confuse होऊन म्हणतो...
"साला... ये हजामने तो गलत आदमी को उठा दिया !"
------------------------------------------
एक सरदारजी नोकरीसाठी अर्ज भरत असतो. त्यातल्या सॅलरी एक्स्पेक्टेड या कॉलम समोर तो लिहितो, - येस!!
------------------------------------------
शेवटी सगळ्या सरदार लोकांनी मिळुन ठरवल की आता बास झाले. सिद्ध करुया की सरदार ही हुशार असतात.
ह्या दाव्याची सत्यता पडताळुन बघण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. सरदारांनी सांतासिंगला आपला प्रतिनिधी निवडला.
आणि सुरु झाली परिक्षा ........
समिती - ' ७ + ६ ' किती ?
सांतासिंग - ( खुप विचार करुन... ) १४
समिती - चूक !
सगळे सरदार -(ओऱडून) कृपया त्याला आणखी एक संधी द्या........
समिती - ' ५ + ४ ' किती ?
सांतासिंग - ( खुप खुप विचार करुन... ) ८
समिती - चूक !
सगळे सरदार-(ओरडून) कृपया त्याला आणखी एक संधी द्या........शेवटची
समिती - ' २ + २ ' किती ?
सांतासिंग - ( खुप खुप खुप विचार करुन... ) ४
सगळे सरदार-(ओरडून) कृपया त्याला आणखी एक संधी द्या...............
------------------------------------------
एकदा दोन मुंग्या झाडावर बसलेल्या असतात. तिकडुन एक हत्ती येत असतो.
त्या मुंग्यांची त्याच्याशी जाम खुन्नस असते. तो झाडाखालुन जाताना एक
मुंगी त्याच्या अंगावर पडते , तर दुसरी मुंगी काय म्हणेल
'दबा दे साले को'
------------------------------------------
एकदा शिवबा आणि जिजाऊ पत्ते खेळत असतात.
जिजाबाई म्हणतात, "शिवबा, तो बघ, तो खिडकीतून दिसणारा किल्ला आमच्या मनात घर करून राहिला आहे... तो घेऊन ये!"
आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानून, शिवाजीमहराज लगेच घोड्यावर मांड ठोकून जातात....
१५-२० मिनिटांत परत येऊन म्हणतात,
"आऊसाहेब, तो किल्ला आपलाच होता!!!"
यावर जिजाऊ काय म्हणाल्या????
.
.
.
.
.
.
जिजाबाईः "मला माहित होतं, पण मल तुझे पत्ते बघायचे होते" ;)
------------------------------------------
एका गावात एक माणूस विहीरीत पडून मेला.
चौकशीकरीता पोलिस आले. संशय हा की त्याला मारून विहिरीत टाकण्यात आले.
त्यांनी एका माणसाला विचारले.
पोलिसः हा माणूस विहीरीत पडून मेला. कशावरून?
माणूसः विहीरीच्या कठड्यावरून.
पोलिसः अहो, तसे नाही हो. हा माणूस विहीरीत पडूनच मेला, ह्याला पुरावा काय?
माणूसः अहो, हा माणूस हिंदू आहे. ह्याला पुरावा नाही.. ह्याला जाळावा.
पोलिसः हा माणूस विहीरीत पडून मेला. कशावरून?
माणूसः विहीरीच्या कठड्यावरून.
पोलिसः अहो, तसे नाही हो. हा माणूस विहीरीत पडूनच मेला, ह्याला पुरावा काय?
माणूसः अहो, हा माणूस हिंदू आहे. ह्याला पुरावा नाही.. ह्याला जाळावा.
------------------------------------------
संता आणि बंता दोघांना मोबाईल फोन वापरण्याचा कंटाळा आला आणि त्यांनी संदेशवहनासाठी कबूतर वापरायचे ठरवले.
एकदा बंताकडे आलेल्या कबूतराबरोबर कोणताच संदेश आला नाही. बंताने वैतागून संताला फोन केला आणि विचारले.
त्यावर संता म्हणाला, "ओये! तो मिस्ड कॉल होता!"
------------------------------------------
संता आणि बंता दोघांना ३ जिवंत बॉम्ब सापडले. ते सर्व पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी ते निघाले.
वाटेत,
संता : काय रे? यातला एक आपल्या हातात असताना फुटला तर काय?
बंता : काही नाही, पोलिसांना सांगू दोनच मिळाले
------------------------------------------
जॅकी चॅनच्या सासुचे नाव काय?
.
.
.
.
.
.
.
डी-कोल्ड (चॅनकी सास डी-कोल्ड)
जॅकी चॅनच्या सुनेचे नाव काय?
.
.
.
.
.
.
.
डी-कोल्ड (क्यूकी सास भी कभी बहू थी)
.
.
.
.
.
.
.
डी-कोल्ड (चॅनकी सास डी-कोल्ड)
जॅकी चॅनच्या सुनेचे नाव काय?
.
.
.
.
.
.
.
डी-कोल्ड (क्यूकी सास भी कभी बहू थी)
------------------------------------------
राहूल द्रविड खेळत असताना ड्रिंक्स आलं. तेवढ्यात त्याने सौरवला पॅवेलिअनमधून बोलावले. असे का?
.
.
.
.
.
.
.
.
कारण सौरव ओपनर होता
.
.
.
.
.
.
.
.
कारण सौरव ओपनर होता
------------------------------------------
एक सरदार्जी त्याच्या गरोदर बायकोला एस एम एस पाठवतो..आणि २ मिनिटानी
त्याच्या मोबाईल वर एक रिपोर्ट येतो...आणि सरदार एकदम नाचायलाच लागतो...
का सान्ग पाहू...??
.
.
.
.
कारण, त्या रिपोर्ट वर " डिलिव्हर्ड" असे लिहिलेले असते.
------------------------------------------
पॉपकॉन गॅसवर ठेवल्यावर का उड्तात....???
.........
.........
.........
.........
.........
.........
स्वःता बसुन बघा ...................... ;)
------------------------------------------
चिनी कुत्र्याचे नाव काय?
हे हुंग ते हुंग
-----------------
भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल?
हिंदुस्तान लिव्हर
-----------------
नेपाळमध्ये चोर्या का होत नाहीत?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
-----------------
रशियन डोअरकिपरचे नाव काय?
उभा का बस की
-----------------
ढिशुम ढिशुम
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेंट चे काम आहे ना....
-----------------
रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी..
रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..
-----------------
पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!
-----------------
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
-----------------
ब्रूस लीच्या आईचे नाव काय?
माऊ ली
-----------------
त्याच्या मो¤ ्या बहिणीचे नाव काय?
थोर ली
-----------------
लहान बहिणीचे नाव काय?
धाक ली
-----------------
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते?
घड्याळ दुरुस्त करण्याची!
-----------------
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
-----------------
संता कंप्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता.
मुलाखत घेणार्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का? ''
संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!! ''
-----------------
पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठय?
मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.
---------------
नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का
कारण...
....
...
शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.
--------------
एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही.
का?
कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
------------------------------------------
------------------------------------------
चिनी डॉक्टरचं नाव काय?
टोचू का सुई?
रशियन वॉचमन चं नाव काय?
वस्कन (वसकन) ओरडलास की !
आणि एक...
एक बदक एका किराण्याच्या दुकानात जातं. दुकानदाराला विचारतं डाळ आहे का डाळ?
दुकानदार : नाही
परत दोन दिवसांनी जातं, विचारतं, डाळ आहे का डाळ?
दुकानदार : नाही
परत दोन दिवसांनी जातं, "डाळ आहे का डाळ?"
दुकानदार : नाही रे बाबा
परत...."डाळ आहे का डाळ?"
दुकानदारः (वैतागून) एकदा संगितलं ना नाहिये म्हणून?
परत..."डाळ आहे का डाळ?"
दुकानदारः आता जर इथे आजूबाजूला जरी दिसलास ना तर सुरीने तुझी मानच कापून टाकीन
खूप दिवस बदक येत नाही..
बरेच दिवसांनी
बदकः सुरी आहे का सुरी?
दुकानदारः नाहिये नाहिये नाहिये....
बदकः मग "डाळ आहे का डाळ?"
------------------------------------------
स्पेशल मराठी जोक्स
त्याला इंग्लिश शिकवायचे म्हणून बिस्किट हातात धरतो आणि ओरडतो "टेक ! टेक !!"
पिल्लू मागे मागे सरकत जाते आणि ......
आणि ......
भिंतिला टेकते .
No comments:
Post a Comment