रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते |
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते |
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई .............
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी llधृ.ll

हिरव्या हिरव्या झाडांची | पिवळी पाने झुलताना ||
चिंब चिंब देहावरूनि | श्रावणधारा झरताना ||
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई |
हा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाई |
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई .............
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll१ll

आज इथे या तरुतळी | सूर वेणूचे खुणावती ||
तुज सामोरी जाताना | उगा पाऊले घुटमळति ||
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाई |
हा चंद्र-चांदणे ढगाआडुनि प्रेम तयांचे पाही |
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकूनि होई .............
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी ll२ll
--------------------- राधा ही बावरी
No comments:
Post a Comment