Thursday, 31 May 2012

टोमॅटोच्या रश्यातील मटण


साहित्यः

१ किलो मटण
३ ते ४ टोमॅटो
४ कांदे
लसुण पाकळ्या ५-६
वाटण : आल एक इंच, लसुण पाकळ्या १ गड्डा, मुठभर कोथिंबीर, पुदीना, २ मिरच्या.
हिंग अर्धा चमचा
हळद १ ते दिड चमचा
मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता)
गरम मसाला १ चमचा
मिठ २ चमचे
२ मोठे बटाटे
२ ते ३ पळ्या तेल

पाककृती:
मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा.
तोपर्यंत कांदा चिरुन घ्या, लसूण पाकळ्या ठेचुन घ्या.
बटाट्याच्या मोठ्या फोडी करा.
टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या.
आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसुण पाकळ्यांची फोडणी द्या व लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा.
शिजलेल्या कांद्यावर टोमॅटोचा रस टाकुन परतवा २-३ मिनीटे शिजूद्या.
नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळा.
ह्या मिश्रणावर मटण व बटाट्याच्या फोडी टाका.
परतून त्यावर मिठ टाका व परत एकजीव करा.
रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाका. नंतर मटणाचे थोडे पाणी सुटते.
कुकरचे झाकण लावुन १५ मिनीटे शिजवत ठेवा.
वाफ गेली कि झाकण काढा. (हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:)
ही अशी तयार मटणाची वाटी.




-----------

No comments:

Post a Comment