Friday, 18 May 2012

आठवणीतली गाणी - मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून










मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून

ओढ लावती अशी जीवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती

गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून
मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून

उद  उद उद उद

दे ग आंबे उदे -६
होऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ
उधे उधे उधे उधे

फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी -३
उदे ग आंबे उदे -४

घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो
भवानी भवानी भवानी बसली ओठिकळी
आम्ही अंबेचे गोंधळी -३
उदे ग आंबे उदे -४

सान थोर नेणतो न आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो
गावली गावली गावली, मूळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी -३
उदे ग आंबे उदे -४

बोला अंबाबाईचा उदो, रेणुका देवीचा उदो 
एकविरा आईचा उदो, या आदिमायेचा उदो
 जगदंबेचा उदो, महालक्ष्मीचा उदो
 सप्तश्रुंगीचा उदो, काळूबाईचा उदो
तुळजा भवानी आईचा उदो
 बोला अंबाबाईचा उदो, रेणुका देवीचा उदो
बोला जगदंबेचा उदो




  ----------------- अगं  बाई अरेच्चा



No comments:

Post a Comment