1 . कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं
2 . मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती
3 . रावण कपडे विकत घेताना सर्वात जास्त खर्च टोप्यावर करायचा.
4 . रावण एकटाच ग्रुप डिस्कशन करत असे
5 . रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा महाविजेता व्हायचा
6 . रावण एकटाच समूह गीत म्हणायचा
7 . रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची कारण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती
8 . रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा नाही
9 . रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे
10 . रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे
11 . रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे
12 . रावणाचे बहुतेक मास्तर म्हणत असत "एक गोष्ट दहा वेळा सांगावी लागते''
13 . रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या वडिलांनी 11 हारांची ऑर्डर नोंदवली होती
14 . रावणाला कधीच टी शर्ट घालता आला नाही
15 . रावणाला ढेकर आली की त्याला कुठल्या तोंडाने बाहेर काढावी हे समजत नसे
16 . लहानपणी रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन द्यायची हा प्रश्न असायचा
17 . एकाच वेळेला तो १० प्रकारच्या मुखशुद्धी पावडरी खायचा
18 . होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईलने बोंबलायचा.
20 . तो जाहिरात करत असलेल्या दहाही टूथ पेस्टस वापरायचा.
21 . मंदोदरी त्याच्याशी कधीच एकांतात बोलत नसे कारण तिला सारखे "कुणीतरी पाहतेय" वाटायचे.
22 . आणि त्यांना कधीच एकांत मिळत नसे !
No comments:
Post a Comment