Tuesday, 31 January 2012
उस्मानाबाद जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे.
जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.
- तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते है्दराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे.
- कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
- परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.
- इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, परांदा किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर.
तसेच तेर (ता. उस्मानाबाद) येथील पुराण वस्तू संग्राहलय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट
राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 - हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 - गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो
उस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड,परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत
उस्मानाबाद जिह्यात एस. टी. ची उत्तम वाहतूक आहे. उस्मानाबाद च्या मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत. उस्मानाबाद बसस्थानका वरून धावणारी तुळजापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस हि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते उस्मानाबाद येथून अन्य राज्यातील मुख्यालये आणि प्रमुख शहरे पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैदराबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत
महत्त्वाची स्थळे : उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावी झालेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून ग्रीक व रोमन संस्कृतींशी या भागाचा संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. सुप्रसिद्ध संत गोरा कुंभार इथलाच रहिवासी. कुंथलगिरीची जैन लेणी तसेच उस्मानाबाद शहरीजवळील चांभारलेणी व धाराशिवलेणी यांमधील शिल्पे येथील प्राचीन कलेची साक्ष देतात. परांडा, नळदुर्ग, औसा व उदगीर येथील किल्ले उल्लेखनीय आहेत. उस्मानाबाद व निलंगा येथील दर्गे, परांडा व औसा येथील मशिदी तसेच निलंगा येथील नीलकंठेश्वर व माणकेश्वर येथील महादेव यांची मनोहर शिल्पकाम असलेली मंदिरे, समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी यांचा डोमगांव येथील मठ आणि महाराष्ट्राचे एक प्रमुख कुलदैवत असलेल्या भवानीमातेचे क्षेत्र तुळजापूर यांसाठी जिल्हा प्रसिद्ध आहे.
Wikipedia वरून साभार
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके
• उस्मानाबाद,
• तुळजापूर,
• उमरगा,
• लोहारा,
• कळंब,
• भूम,
• वाशी व
• परांडा
कळंब तालुक्यातील गावे
* कसळ, कळंब तालुका
* खडकी, कळंब तालुका
* खेर्डा, कळंब तालुका
* खोदला, कळंब तालुका
* खामसवाडी, कळंब तालुका
* उपळाई, कळंब तालुका
* उमरा, कळंब तालुका
* चोराखळी, कळंब तालुका
* ईटकुर, कळंब तालुका
* घारगांव, कळंब तालुका
* अंदोरा, कळंब तालुका
* सापनाई, कळंब तालुका
* आडसुळवाडी, कळंब तालुका
* आढाळा, कळंब तालुका
* आथर्डी, कळंब तालुका
* आवा शिरपुरा, कळंब तालुका
* संजीतपूर, कळंब तालुका
* सौंदणा अंबा, कळंब तालुका
* सौदना (ढोकी), कळंब तालुका
* सातेफळ, कळंब तालुका
* सात्रा, कळंब तालुका
* सावरगाव -काळे, कळंब तालुका
* एकूरका, कळंब तालुका
* एरंडगाव, कळंब तालुका
* गंभीरवाडी, कळंब तालुका
* गोविंदपूर, कळंब तालुका
* गौर, कळंब तालुका
* गांैरगांव, कळंब तालुका
* कोठाळवाडी, कळंब तालुका
* कोथळा, कळंब तालुका
* कन्हेरवाडी, कळंब तालुका
* करजकल्ला, कळंब तालुका
* कळंब, कळंब तालुका
* ढोराळा, कळंब तालुका
* ताडगांव, कळंब तालुका
* तांदुळवाडी, कळंब तालुका
* देवधानोरा, कळंब तालुका
* देवळाली, कळंब तालुका
* दहिफळ, कळंब तालुका
* दाभा, कळंब तालुका
* दुधाळवाडी, कळंब तालुका
* नागझरवाडी, कळंब तालुका
* नागुलगाव, कळंब तालुका
* नायगांव, कळंब तालुका
* निपाणी, कळंब तालुका
* परतापुर, कळंब तालुका
* पाडोळी, कळंब तालुका
* पाथर्डी, कळंब तालुका
* पानगांव, कळंब तालुका
* पिंपळगाव (टो), कळंब तालुका
* पिपरी शिराढोण, कळंब तालुका
* पिपळगाव डोळा, कळंब तालुका
* बोरगांव (खु), कळंब तालुका
* बोरगांव बु., कळंब तालुका
* बोरगाव (केज), कळंब तालुका
* बोरगाव (ध.), कळंब तालुका
* बोर्डा, कळंब तालुका
* बोरवटी, कळंब तालुका
* बरमाचीवाडी, कळंब तालुका
* बहुला, कळंब तालुका
* बांगरवाडी, कळंब तालुका
* बाभळगाव, कळंब तालुका
* बारातेवाडी, कळंब तालुका
* भोसा, कळंब तालुका
* भोगजी, कळंब तालुका
* भाटसांगवी, कळंब तालुका
* भाटशिरपुरा, कळंब तालुका
* येरमाळा, कळंब तालुका
* मंगरुळ, कळंब तालुका
* मस्सा ख, कळंब तालुका
* मोहा, कळंब तालुका
* मलकापुर, कळंब तालुका
* माळकरजा, कळंब तालुका
* रत्नापुर, कळंब तालुका
* रांजणी, कळंब तालुका
* रायगव्हाण, कळंब तालुका
* लोहटा, कळंब तालुका
* लासरा, कळंब तालुका
* जवळा (खुर्द), कळंब तालुका
* जायफळ, कळंब तालुका
* वडंगाव शि., कळंब तालुका
* वडगाव (जाहागीरी), कळंब तालुका
* वाघोली, कळंब तालुका
* वाठवडा, कळंब तालुका
* वाकडी ई, कळंब तालुका
* वाकडी केज, कळंब तालुका
* वाणेवाडी, कळंब तालुका
* शेलगाव (ज), कळंब तालुका
* शेलगाव दि, कळंब तालुका
* शेळका धानोरा, कळंब तालुका
* शिंगोली, कळंब तालुका
* शिराढोण, कळंब तालुका
* हासेगांव (शि.), कळंब तालुका
* हासेगाव केज, कळंब तालुका
* हाळदगाव, कळंब तालुका
* हावरगाव, कळंब तालुका
* हिगणगाव, कळंब तालुका
प्रिय अतिरेकी....
आत्ता नेहमीचेच झालाय तुझे येणे,
नेहमीच्याच सराईतपणे बॉम्ब लपवणे आणि जाणे
येण
आमच्या सार्या सुरक्षा यंत्रणा फेल होतात रे!
तुझी हुशारी, तुझे प्रावीण्य पाहून!
आत्ता ते चिट्ठ्या टाकतात,
श्रेय कुणाला द्यायचे या वरुन |
लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय
लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण होय. हृदय विकार, उच्च रक्तदाब आदी आजार लठ्ठपणासोबतच येतात. तुमचे वजन तुमच्या उंचीशी साजेसेच असले पाहिजे. साधारण 5 फूट उंची असेल तर 45.5 किलो वजन अपेक्षित आहे. लठ्ठपणा म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत अधिक वजन असणे होय. लठ्ठपणामुळे संपूर्ण शरीर थुलथुलीत होते. मांसपेशीदेखील ढिल्या होतात. कुल्ले आणि पाठीवर चरबी वाढते. ढेरी पुढे येते. हात आणि मांड्यांच्या ठिकाणीही चरबी साठून राहते.
भारतीय महिलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण ६०: ४० असं आहे.
• तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.
तसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते.
• खाणंपिणं बंद करून शरीरावर अत्याचार करू नका. कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. अधिक कॅलरीयुक्त आहार बंद करून कमी कॅलरीयुक्त खाण्याची निवड तुम्ही करत असाल. यामुळे वजन कमी होईल, पण त्याचबरोबर तुम्ही अशक्तही व्हाल, हे लक्षात ठेवलेलं बरं! शरीराला आवश्यक असतं, त्यापेक्षा कमी कॅलरीज आहारातून शरीराला मिळाल्यास तुम्ही शरीराला कुपोषित करता आहात, हे लक्षात घ्या. यामुळे शरीरातील फॅट्स नाही, तर पाणी आणि स्नायूंचा बळकटपणा तुम्ही गमावून बसाल. वजन कमी होईल, पण फॅट्स तसेच राहतील. यामुळे आळशीपणा, अशक्तपणा, डोकुदुखी, मन एकाग्र करायला न जमणं, थकवा अशा समस्या जाणवू लागतात. म्हणूनच खूप कॅलरी किंवा कमी कॅलरीयुक्त अशा दोन्ही प्रकारचं खाणं टाळा. कोणत्याही परिस्थितीत उपवास करु नये. ठरलेल्या वेळी ठरलेला पदार्थ खावा, खाण्याची वेळ चुकवू नये या उलट योग्य आणि समतोल आहार घ्या.
• पोट पूर्ण भरणार नाही एवढेच भोजन 3 वेळा (न्याहरी, दुपारचे व रात्रीचे) घ्यावे.
• काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास पाणी प्या. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. रोज सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.
• नियमीत व्यायाम आणि योगासने करा. शारीरिक श्रम करा.
• पालेभाज्या अधिक प्रमाणात खा.
• रोज फळे खा. रस प्या.
• दिवसभरात किमान 3 लिटर पाणी प्या.
• भोजनात मीठ कमी वापरा..
• आठवडयातून एखादे जेवण टाळावे.
• मधून मधून खाण्याची सवय सोडावी.
• एकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.
• जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते. पोटभर खाण्याऐवजी पोट थोडे रिकामे ठेवून उठावे.
• दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
• निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
- जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
• ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
• कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
• समतोल आहार : कमी कॅलरी आणि अधिक फायबर असणारं खाणं घ्या. सलाडस आणि ताजी फळं नियमितपणे खायला हवीत. सलाड ड्रेसिंग करणं टाळा. कडधान्य, भाज्यांचे सूप्स भरपूर घ्या. बीफ, पोर्क, हॅम, सॉसेज असं रेड मीट आणि ऑर्गन मीट (कलेजी, भेजा) आणि अंड्याचा बलक खाऊ नका, मांसाहार वर्ज्य करावे. यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. सॅच्युरेटेड फॅट्स, तेलकट आणि गोड पदार्थ, आइस्क्रीम, चॉकलेट्स न खाल्लेलंच बरं! मोड आलेली कडधान्यं खा. यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.
• चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान ३ ते ४ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, सतत वाहन वापराने ही चांगली सवय सुटते. तसेच काम करताना बैठे करण्यापेक्षा उभ्याने केलेले उर्जा वापरासाठी जास्त चांगले असते.
• हवेशीर दमसासाचे व्यायाम आणि डोंगर चढण्यासारखे गुरुत्वाकर्षणविरोधी व्यायाम वजन लवकर घटवतात. पण चरबी जळण्याची पाळी व्यायामाच्या तिसाव्या मिनिटानंतरच होते. दररोज अर्धा तास व्यायाम करावा. यामुळे अनावश्यक जमा झालेली कॅलरी घटवता येते.
• रोज नियमित दमण्याचा व्यायाम करावा. जलद चालणे, दुडक्या चालीने पळणे, जिने किंवा डोंगर चढणे, सायकल चालवणे, पोहणे हे सर्व दमसासाचे व्यायाम आहेत.
• उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला चटकन घाम येतो. व त्याचाच फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.
• डोंगर दऱ्यांमध्ये उपाशी-तापाशी भटकणे ही गोष्ट मधून मधून अवश्य करावी. निसर्ग आपल्याला दुरुस्त करतो. पूर्वीच्या काळी पायी चारधाम यात्रेत तब्येत दुरुस्त होत असे.
• आठवड्यातून एखाद-दुसरे जेवण सोडून द्यावे. याने वजनावर नियंत्रण राहते.
• आपल्या आहारावर लक्ष ठेवा. चपाती, भाकरी, भात, साखर, बटाटे आणि मिठाई थोडी कमीच घ्या. याउलट भाजीपाला, फळभाज्या, फळे आणि प्रथिनयुक्त पदार्थ जास्त चांगले. गव्हाच्या पीठात सोयापीठ मिसळून प्रथिनांचे प्रमाण वाढवता येते.
• दररोज 10 ते 15 मिनिटे हसले पाहिजे. यामुळे 280 कॅलरी उपयोगात येईल आणि तुम्ही तणावमुक्त राहाल. वजन वाढण्याच्या इतर कारणांमध्ये तणाव हे एक कारण आहे. कारण अशा स्थितीत रुग्ण जास्त खाण्यासाठी प्रेरित होऊ शकतो.
• दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
• सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशा सोडू नका. कितीही उपाय केले, तरी वजन कमी होत नाही हे पाहून निराश होण्याची अजिबात गरज नाही. संतुलित आहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून वजन नक्कीच कमी करता येईल. वजन कमी होत आहे की जास्त याकडे फारसे लक्ष देऊ नये. तुम्हाला उत्साही आणि आरोग्यपूर्ण वाटत असेल तर तुमचे ठीक चालले आहे. रोज रोज वजन केल्याने केवळ वजन व भोजन या दोनच गोष्टी मनाचा ताबा घेतात.
• • • • वजन कमी करायचंय.....मग आधी तसे मनात आणा....आणि एकदा मनात असा विचार आणलात की त्यासाठी पुढे जे काही करावे लागेल ते इमाने इतबारे एखाद्या व्रताप्रमाणे करा....पाहा तुमचा भार हलका होतो की नाही ते.... तर मग आता लागा तयारीला....
अरे हो, एक सांगायचेच राहिले...मंडळी हा उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे....तसेही थोडीशी हालचाल केली की घाम हा येतोच...तेव्हा व्यायाम करा आणि जास्त घाम गाळा...पाणी भरपूर प्या मात्र खाणं कमी करा.......
इतकं केलंत की तुम्ही हलके झालात म्हणून समजा!!!
Subscribe to:
Posts (Atom)