उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे.
जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.
- तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते है्दराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे.
- कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
- परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.
- इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, परांदा किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर.
तसेच तेर (ता. उस्मानाबाद) येथील पुराण वस्तू संग्राहलय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट
राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 - हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 - गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो
उस्मानाबाद शहर रेल्वे ने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड,परभणी, परळी वैजनाथ, अकोला नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत
उस्मानाबाद जिह्यात एस. टी. ची उत्तम वाहतूक आहे. उस्मानाबाद च्या मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत. उस्मानाबाद बसस्थानका वरून धावणारी तुळजापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस हि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते उस्मानाबाद येथून अन्य राज्यातील मुख्यालये आणि प्रमुख शहरे पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैदराबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत
महत्त्वाची स्थळे : उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावी झालेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून ग्रीक व रोमन संस्कृतींशी या भागाचा संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. सुप्रसिद्ध संत गोरा कुंभार इथलाच रहिवासी. कुंथलगिरीची जैन लेणी तसेच उस्मानाबाद शहरीजवळील चांभारलेणी व धाराशिवलेणी यांमधील शिल्पे येथील प्राचीन कलेची साक्ष देतात. परांडा, नळदुर्ग, औसा व उदगीर येथील किल्ले उल्लेखनीय आहेत. उस्मानाबाद व निलंगा येथील दर्गे, परांडा व औसा येथील मशिदी तसेच निलंगा येथील नीलकंठेश्वर व माणकेश्वर येथील महादेव यांची मनोहर शिल्पकाम असलेली मंदिरे, समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी यांचा डोमगांव येथील मठ आणि महाराष्ट्राचे एक प्रमुख कुलदैवत असलेल्या भवानीमातेचे क्षेत्र तुळजापूर यांसाठी जिल्हा प्रसिद्ध आहे.
Wikipedia वरून साभार
No comments:
Post a Comment