मुंबईनजीकच्या काही स्थळांनी आपलं वैशिष्टय़ जपताना पर्यटकांचं आकर्षण
म्हणून नावलौकिक मिळवलाय. हाकेच्या अंतरावरील वज्रेश्वरी-अकलोली ही ठिकाणं
गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रख्यात आहेत. शहरी गजबजाटातही संजय गांधी
राष्ट्रीय उद्यान हे तर पर्यटकांच्या विसाव्याचे ठिकाण आहे. घारापुरी हे
त्रिमूर्तीचे बेट म्हणून जागतिक सांस्कृतिक वारसायादीत समावेश झाल्याने
त्याचं नाव जगभर झालंय.
मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत उपनगरीय मार्गावरील अंबरनाथ मात्र एक लोकल गाडय़ांचं टर्मिनस स्थानक म्हणून सर्वत्र ओळखलं जातं. त्याव्यतिरिक्त काडेपेटय़ांचा कारखाना आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करणाऱ्या कारखान्याचे ठिकाण इतपतच लोकांना परिचित आहे, पण औद्योगिकीकरणात झपाटय़ाने बदलत्या या शहराला प्राचीन इतिहासापासून मानाचं स्थान आहे हे तेथील प्रख्यात शिवमंदिरामुळे. आज शहरीकरणाचा अंगरखा धारण करतानाही अंबरनाथ पूर्वेकडील या मंदिर परिसराचा सारा मोहल्ला आपल्या मूळच्या ग्रामीण खुणा जागोजागी दाखवतोय.. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरुन पडले असावे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस सुमारे दीड कि.मी.वर हे एक हजार वर्षांचे पुरातन मंदिर पाहताक्षणीच एखाद्या परडीमध्ये ठेवलेल्या आकर्षक पुष्पगुच्छासारखे भासते. भारतातील प्रत्येक प्रांतामधील मंदिर स्थापत्य कला ही अजोड कलाकृती असल्याने त्यातील काही मंदिरांनी हजारो वर्षांपासून आपलं स्थान अबाधित ठेवलंय. त्यातील अंबरनाथच्या या शिवमंदिराला आता हजार वर्षांचा काळ लोटला आहे. हेमाडपंती वास्तुकला म्हणून या मंदिराचा लौकिक जनमानसात असला तरी स्थापत्यशास्त्रीय भाषेत ही ‘भूपिज’ शैली म्हणून ओळखली जाते.
‘वालधुनी’ ऊर्फ ‘वढवाण’ नदीच्या एका उपनदीवर तथा ओढय़ावरील काठावर हे मंदिर उभारले आहे. सध्या सांडपाणी वाहून नेणारा हा ओढा मंदिराच्या अनोख्या सौंदर्याशी पूर्णत: विसंगत वाटतो, तसेच सभोवतालच्या गलिच्छपणाने मंदिर परिसराला एक ओंगळ स्वरूप आणून दिलंय. शिलाहारराजा छित्तराजने हे मूळ मंदिर बांधले असले तरी हे बांधकाम पूर्णत्वास नेऊन त्याचा जीर्णोद्धार छित्तराजपुत्र ‘मुम्मुणी’ ऊर्फ ‘ममवानी’ यांनी इ.स. १०६० मध्ये केल्याचा उल्लेख एका शिलालेखात आढळतो. आता मंदिराचा कळस अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी कळसाचे काही भग्नावशेष मिळवण्यात बर्जेस सारखे संशोधक यशस्वी झालेत.

या मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार
पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारेआहेत. प्रमुख
प्रवेशद्वाराशी असलेली नंदीची पाषाणमूर्ती प्रथमत: आपलं लक्ष वेधून घेते.
या मंदिराचे सर्व शिल्पकाम जसे आखीव-रेखीव आहे तसेच ते उभारताना भूमितीसह
वास्तुशास्त्राचा निश्चितच विचार केल्याचे जागोजागी जाणवते. हेमाडपंताच्या
काळाआधीपासून जी ‘भूपिज’ शैलीची मंदिर उभारली गेली या शैलीतील हे पहिले
मंदिर म्हणून गणले जाते.
मंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून तिथपर्यंत जाण्यासाठी आठ फुटी खोलीच्या दगडी पायऱ्यांवरून जावे लागते. लोखंडी कठडा घालून त्याचे आगमन-निर्गमनासाठी दोन भाग करण्यात आले आहेत. येथील प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आहे. या गाभाऱ्याच्या चौफेर भिंती भक्कम असून त्याची उंची २१ मीटर आहे. गाभारा आणि मंदिराला जोडणारे जे दालन आहे. त्यातून आपण मंडपाकडे येतो याला दक्षिण पश्चिमोत्तर अशी तीन मजबूत प्रवेशद्वारे आहेत. मंडपावरील चार खांबावरील शिल्प-नक्षीकाम खूपच आकर्षक आहे, तर मंडपावरचे छतावरील नक्षीकाम देखणे आहे. लोनाड मंदिरातील छताप्रमाणेच अनेक वर्तुळांची गुंफण करून अप्रतिम शिल्पकलेतून सौंदर्य वाढवले आहे.
मूळच्या सुमारे १८ खांबांच्या भव्य मंडपात प्रवेश केल्यावर सध्या त्यातील चारच खांब स्पष्टपणे दिसताहेत. उर्वरित खांबाचे अस्तित्व फारसे जाणवत नाही. वेरूळच्या विश्वविख्यात शिल्पाकृतीप्रमाणे जराही जागा न सोडता प्रत्येक खांब नक्षीकामांनी सुशोभित करून मंदिराचे सौंदर्य खुलवण्यात येथील अज्ञात कलाकार यशस्वी झालेत. सभामंडपाचे छत आणि कळसाचा भाग यामधील भाग पोकळ आहे. हा सभामंडप आणि गाभाऱ्याची बाह्य बाजू अनेक कोनांनी सुशोभित करताना भूमितीशास्त्राचा उपयोग केल्याचे जाणवते. त्यामुळेच मंदिरात दिवसभरात छाया -प्रकाशाचा खेळ अनुभवता येतो.
मंदिराच्या बाहेरील भिंतींवर अनेक देव-देवतांच्या शिल्पांचे दर्शन घडते. हजारो वर्षांची नैसर्गिक स्थित्यंतरे आणि मानवनिर्मित प्रदूषणांनी यातील काही शिल्पांचे अस्पष्ट दर्शन घडते. या शिवमंदिराला अनेक हत्तींच्या कोरीव कामाची पाश्र्वभूमी आहे. जणू काही अनेक हत्तींच्या पाठीवरच या मंदिराचा डोलारा आहे.
मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपणासह बाह्य़ांगावरील अनोखी शिल्पाकृती आपलं लक्ष वेधून घेतात. यात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती, त्रिशूलधारी शिवमूर्ती, लक्ष्मीमाता यांचे दर्शन घडते. विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या कलाकृतीतून शिल्पकारांना मानवी जीवनाला आवश्यक असा संदेश द्यायचा आहे, असाच जणू त्यापाठीमागे गर्भित अर्थ आहे.
हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आढळते. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ. स. १०६० चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशदारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत. मंडपाचे छत व कळस यामझे पोकळी आहे.कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे.
मंदिराच्या उत्तरद्वारानजीक एक छोटेखानी कक्ष आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. हे बांधकाम मूळच्या मंदिरानंतरचे असावे. मंदिरासहीत साऱ्या परिसराचे दगडी बांधकाम असल्याने स्वच्छतेसह वातावरणात गारवाही आहे. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे.
शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. त्यात उत्पत्ती, स्थिती, आणि लय या शिवाच्या तीनही भावांचे दर्शन घडविणारी त्रिमूर्ती आहे. तर एका शिल्पात शिवपार्वती विवाह सोहळ्याचे दर्शनही घडते. याशिवाय आरसाधारी तरुण स्त्री, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, महिशासूर मर्दिनी, गणपती यांच्या मूर्ती शिल्पकाराने रेखीवपणे निर्माण केल्या आहेत. या साऱ्या मूर्तीतून त्यांच्या सहजपणामुळे त्या सजीव वाटतात. आणि या मूर्तीशी संबंधित त्या काळची वस्त्र, आभूषणे आणि वेशभूषेचीही कल्पना येते. मंदिराच्या बाहेरील बाजूवर आपल्या दृष्टीक्षेपात येईल अशी एक पट्टी कोरलेली आहे. त्या लहानशा जागेतून अनेक शृंगारिक शिल्पाकृती आपल्या नजरेत भरतात.

सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पाय-या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे. आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे.
अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या
प्रदेशावर शिलाहारांची राजसत्ता होती. त्याकाळी बांधले गेले. आपल्या
प्रदीर्घ राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची
शिवमंदिरं बांधली. त्यातील हे अंबरनाथचे एकमेव शिवमंदिर आजही आपलं असित्व
टिकवून आहे. येथील असामान्य कलाकृतीच्या पाषाणमूर्तीतून त्यांचे भावप्रकट
करताना त्यातून तत्त्वज्ञान-संदेश देण्याची किमया वाखाणण्यासारखी आहे. या
शिल्पातून मानवी जीवनाला पूरक असा जो संदेश दिला आहे. त्यातून भारतभूमीचे
तत्त्वज्ञान आणि संस्कृती सांगण्याचाच जणू प्रयत्न आहे.. कोणतीही लिखित
भाषा तथा शब्दाविना हे मंदिरशिल्प खूप काही सांगून जाते.
-------------- लोकसत्ता
No comments:
Post a Comment