शनिवारवाड्याचे रहस्य
-१-
रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो. "वेस्ट्-एन्ड" टॉकीजपासून मी निघालो. मी राहतो रास्ता पेठेत जाताना मला वाटले की थोडे वाकड्या वाटेने घरी जावे. म्हणून मी पॉवर हाऊसमार्गे के.ई.एम. हॉस्पिटलच्या समोरुन जायला निघालो. अचानक माझे लक्ष हॉस्पिटलच्या दरवाज्याकडे गेले. एक व्यक्ती धडपडत माझ्या दिशेने येताना दिसली. मला काहीच कल्पना नव्हती, अचानक तो माणूस माझ्या अंगावर जवळ जवळ कोसळलाच. त्याने लगेच माझ्या हातात एक कागदाचा बोळा कोंबला. प्रकाशात मला दिसले की त्याच्या पाठीत सुरा खुपसलेला होता. मी धोका ओळखला व बाजूच्या भिंतीकडे जाऊन एका झाडामागे लपलो. भीतीने माझी गाळणच उडाली होती. तरी मी धाडस करुन एक दगड उचलला आणि रस्त्यावरचा सार्वजनिक दिवा फोडून टाकला. तेवढ्या भागापुरता तरी अंधार पसरलेला होता. माझ्या हातात कागदाचा बोळा कोंबून धडपडत पुढे पळालेला गृहस्थ आता अंगातील त्राण संपल्यामुळे जमिनीवर निपचित पडलेला होता. तेवढ्यात एक माणूस के.ई.एम्.च्या आतून पळत आला व रस्त्यावर पडलेल्या माणसाची तपासणी करु लागला. पुढे हा काय करतो? हे पाहण्यापूर्वीच मी तेथून पलायन केले. न जाणो आपण याच्या हाती सापडलो तर? मी जवळ जवळ घर येईपर्यंत पळतच होतो. घरापाशी आल्यावरच मी थांबलो. घरी येऊन कपडेही न बदलता मी झोपून गेलो एवढा मी घाबरलो होतो.....

-२-
दुसर्या दिवशी मी उशीरा उठलो. रविवार असल्याने आईनेही मला नेहमीप्रमाणे उठवले नाही. उठल्यावर मला जाणवले की काल रात्री कपडे न बदलताच झोपलो होतो. लगेच काल रात्रीचा सर्व प्रसंग मला आठवला. आपसूकच अंगावर शहारा आला. नकळतच माझा हात खिशात गेला. त्या माणसाने माझ्या हातात दिलेला कागदाचा बोळा तसाच अजून खिशात होता. तो मी उलगडला, एका बाजूवर शनिवारवाड्यासंदर्भात काहितरी लिहीले होते व दुसर्या बाजूला एका नकाशावर काही चिन्हे होती. नंतर नीट पाहू असे ठरवून मी उठलो. सर्व आवरुन मी शनिवारवाड्यावर जाऊन बसलो. म्हटले ज्या वास्तूचा उल्लेख कागदावर आहे त्याच ठिकाणी जाऊन पाहिलेले बरे असा विचार करुनच मी शनिवारवाडा गाठला होता.

शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच एक माडी आहे, ती माझी आवडती जागा
आहे. तिथेच एका कोपर्यात बसून तो कागद मी वाचत होतो. त्या कागदाच्या
पहिल्या पानावर (बहुतेक त्या माणसाने...) लिहिले होते की, "सन ११७६ मध्ये
घडवलेली नटराजाची रत्नजडीत मूर्ती शनिवारवाड्यासमोरील बाजीरावाच्या
पुतळ्याखाली आहे." मी बायनॉक्युलर (दूरदर्शी) आणला होता. त्यातून मी
बाजीरावाच्या पुतळ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. बाजीरावाची घॉड्यावरची
मर्दानी मूर्ती पाहताच अस्सल मराठी माणसाच्या नसा फुगल्याशिवाय रहात नाही.
बाजीराव खूप पराक्रमी होता यात काही संशय नाही. पण दुर्दैवाने पहिला
बाजीराव हा त्याच्या पराक्रमापेक्षा मस्तानी नावाच्या यवनी नायकिणीच्या
प्रेमासाठीच लोकांनी लक्षात ठेवला. शत्रू हातातून सुटू नये म्हणून उभ्या
घोड्यावरच हातावर हुरडा भरडून पोट भरुन परत लढाईला कूच करणार्या पहिल्या
बाजीरावाच्या या कथा केवळ दंतकथा म्हणूनच आता ओळखल्या जातात. बाकी ही
मस्तानी होती खूप सुंदर म्हणूनच बाजीरावासारखा रांगडा गडी तिच्यावर भाळला
की काय न कळे. पण मस्तानीचेही बाजीरावावर तेवढेच प्रेम होते हेही तितकेच
खरे. असो, तर मी माडीवरच्या कोपर्यातून बाजीरावाच्या पुतळ्याकडे पाहिले पण
तेथे मूर्ती काही दिसली नाही. थोडे डॉके चालवल्यावर कळाले की एवढी
मूल्यवान मूर्ती उघड्यावर कोणी ठेवणार नाही. ती बरोबर पुतळ्याच्याच जागी
जमिनीखाली असणार. मी पुढे वाचू लागलो -
" ही मूर्ती देशाची मालमत्ता आहे. त्यामुळे मी ही अनमोल मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा विचार करतोय. मूर्तीकडे जाण्याचा नकाशा मागे दिला आहे. मी तर ही मूर्ती काढणे अशक्यच आहे, म्हणून कोणातरी विश्वासू व्यक्तीलाच ही माहिती देण्याचा मनसुबा आहे."
- वीरेन्द्र प्रताप सातव
१२ ऑगस्ट १९९२.

मी विचार करु लागलो, ज्याअर्थी हे पत्र अशा पद्धतीने लिहिले आहे
त्याअर्थी खून झालेली व्यक्ती दुसरीच असावी. मी लगेच खाली गेलो व तेथे
बसलेल्या विक्रेत्याकडून "सकाळ" व "केसरी" ही पुण्यातील दोन अग्रणी
वर्तमानपत्रे विकत घेऊन आलो.मी एवढ्या घाईत घरुन निघालो होतो की न्यूजपेपर
वरुन नजर फिरवायची देखील सवड मिळाली नव्हती. पेपर घेऊन मी शनिवारवाड्याच्या
माडीवर परत आलो. अगदी पहिल्याच पानावर खुनाची सविस्तर बातमी आलेली होती.
मी मन लावून ती सर्व बातमी वाचून काढली. ज्याचा खून झाला होता त्या
व्यक्तीचे नाव होते रामदास जाधव. खून करणारा त्याचा भाऊच होता - सीताराम.
एका गुप्त आणि प्राचीन मूर्तीची माहिती असलेला नकाशा रामदासकडे होता,
म्हणून सीतारामने हा खून केला होता. आपला लहान भाऊ मेला आहे हे कळाल्यावर
सीताराम स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. त्यामुळे पोलिसांचे काम
संपल्यात जमा होते. पण माझे काम संपले नव्हते, कारण त्या नकाशाचे
उत्तरदायित्व आता माझ्याकडे होते. मला ती मूर्ती शोधून काढून सुखरुपपणे
पुरातत्त्व खात्याकडे सुपुर्त करायची होती. खूनाचा साक्षिदार म्हणून मी
जाणारच नव्हतो, आणि आता तशी गरजही नव्हती. मी घड्याळात पाहिले. नऊ वाजून
चाळीस मिनिटे झाली होती. मी खाली उतरलो व शनिवारवाड्याच्या शेवटच्या बाजूस
असणार्या बंद असलेल्या भुयाराच्या दरवाजाच्या जवळ जाऊन बसलो.
-३-
बरोबर दहा वाजता एक माणूस आला व भुयारात जाणार्या लोखंडी दरवाज्याचे कुलुप काढून आत गेला. तसे होणार हे मला माहित होते. कारण कॉलेज मधे असताना कॉलेजचे रटाळ तास बुडवुन आम्ही सगळे मित्र इथे शनिवारवाड्यातच येऊन अभ्यास करायचो. तेव्हा दररोज सकाळी १० वाजता एक माणूस भुयारातील पाण्याची मशीन चालू करायला यायचा. या माहितीचा आज अशा वेळी उपयोग होईन अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तर नेहमीप्रमाणेच आजही तो माणूस आला व भुयाराच्या जाळीच्या दरवाजाचे कुलुप उघडून आत गेला. आजूबाजूला पहात मी भुयाराजवळ आलो. कोणी आपल्याकडे पहात नाही याची खात्री करुन मी भुयाराच्या दारातून प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक असे दोन फाटे फुटतात. मशीन सुरु करायला तो माणूस डावीकडे वळाला होता. मला बाजीरावाच्या पुतळ्याखाली जायचे असल्यामुळे मला उजवीकडेच जायचे होते त्याप्रमाणे मी उजवीकडे वळालो. शनिवारवाड्याच्या भुयारांबद्दल एक आख्यायिका आहे. शनिवार वाड्यातून एक भुयार थेट पर्वतीपर्यंत जाते आणि दुसरे भुयार रास्ता पेठेतील रास्तेवाड्यात उघडते. सध्या रास्तेवाड्यात शाळा चालू आहे, तरी शाळेच्या पायर्यांपाशीच एक खूप मोठे लोखंडी दार आहे जे कायम कुलुपबंद असते. पर्वतीवरही कायम कुलुपबंद असलेले एक दार आहे. आज या दंतकथेवरील पडदा उघडणार का? असे अनेक विचार मनात येत होते. पुढे खूप अंधार होता. खालच्या बाजूला उतरत जाताना पुढे काय घडणार? हा प्रश्न माझ्या मनात उत्कंठाही निर्माण करत होता आणि भीती देखील.

मी नेहमी एक छोटासा कि-चेन टॉर्च जवळ बाळगायचो, कधीतरी उपयोगी पडेल
म्हणून. आज तो छोटासा टॉर्च उपयोगाला आला होता. सुरुवातीचे अंतर मी दबकत
दबकत टॉर्च न पेटवता चालत होतो कारण मशीन चालू करायला आलेल्या त्या माणसाला
टॉर्च चा प्रकाश दिसण्याचा संभव होता. काही अंतर गेल्यावर मला थोड्या
ओबडधोबड पायर्या पायाला लागल्या. तोल जाईन म्हणून मी टॉर्च पेटवला.
पायर्या एकूण पाच होत्या. खाली उतरल्यावर एकदम माझ्या पायांना थंडगार
पाण्याचा स्पर्श झाला. माझे दीड हजार रुपये किंमतीचे बूट पूर्णपणे बुडुन
पाणी माझ्या घोट्याला लागले होते. मी टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फेकत पुढे
निघालो. अधून मधून नकाशाही पहात होतो. नकाशात असलेल्या खुणा टॉर्चच्या
प्रकाशात शोधणं म्हणजे दिव्यच होतं. पहिली मुख्य खूण शनिवारवाड्याच्या
दरवाज्यापाशी होती. त्यामुळे मला खूप पुढे जावे लागले. बर्याच वेळाने मला
असे वाटले की मी आता शनिवारवाड्याच्या प्रासिद्ध पोलादी दरवाज्याखाली आहे.
पहिली खूण सूर्याची होती.... " "
अशी. टॉर्चच्या प्रकाशात मला ती खूण सापडायला थोडे कष्टच पडले. कारण ती
खूण नेमकी माझ्या डोक्यावर होती व मी आजूबाजूला शोधत होतो. पुढे भुयाराने
डावीकडे वळण घेतले होते.
पुढची खूण होती चंद्राची.. "".
या दोन्ही खुणा शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या आहेत हे मला
त्यावेळी आठवले.मी हळू हळू पुढे जात होतो. एकेक खुणा सापडत होत्या. हा
नकाशा नसता तर शनिवारवाड्याच्या पोटात असलेल्या भुयारांच्या भुलभुलैय्यात
मी कुठे हरवलो असतो कोण जाणे.
-४-
भुयारांतून वळणे घेत घेत मी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. नकाशात एक खूण होती "". ही खूण दगडात अवघड जागी कोरलेली मला सापडली. नकाशातला रस्ता डावीकडे वळायचा संकेत देत होता व प्रत्यक्षात भुयाराचा मार्ग उजवीकडे जात होता. माझे डोके खजिना शोधाच्या साहसकथा वाचून बरेच सुपीक झाले होते त्यामुळे मी लगेच ओळखले की येथे गुप्त द्वार आहे. मी खुणेचे टॉर्चच्या अंधुक प्रकाशात नीट निरीक्षण केले व खुणेतील गोलाकार फुगीर असल्याचे जाणवले. तो फुगीर गोल भाग दाबताच समोरची भिंत आवाज करत मधोमध दुभंगली व माझ्यासाठी डाव्या बाजूने जायचा मार्ग मोकळा झाला. मी आत पहात हळूच प्रवेश केला. एव्हाना पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले होते व माझी आवडती डेनिमची पॅन्टदेखील खराब झाली होती. मी आत प्रवेश केल्याकेल्या एक रिकामा चौथरा माझ्या दृष्टीस पडला. त्यावर मूर्ती नव्हती. आपल्याला यायला उशीर झाला की काय असे वाटून मी निराश झालो. कोणी घेतली असेन याचा विचार करत मी खिन्न होऊन बसलो होतो. मी एकदम माझ्या घड्याळाच्या आवडत्या ट्यूनने भानावर आलो. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्या चौथर्याची तपासणी करु लागलो. तपासणी करताना कोणती कळ दाबली गेली न कळे पण चौथर्याची फरशी आपोआप बाजूला झाली. त्या चौथर्याच्या आत टॉर्चचा प्रकाश न टाकताही ती रत्नजडीत मूर्ती मला लगेच दिसली कारण मूर्तीची सर्व रत्ने खूप चमकत होती. बहुतेक ते सर्व हिरे असावेत असे वाटले, कारण रत्न ओळखण्याइतपत ज्ञान मला नव्हते. फक्त हिरा अंधारात चमकतो एवढेच मला माहित होते. मी माझ्या पाठीवरची सॅक काढली. मी पोहायला चाललो आहे असे आईला सांगून बाहेर पडलो होतो. त्यामुळे सॅक मधे टॉवेलदेखील आणलेला होता मी. तर सोबतच्या टॉवेलात इतिहासातील तो अनमोल रत्नजडीत मूर्तीचा ठेवा काळजीपूर्वक गुंडाळला. मूर्ती सॅकमधे ठेवून मी घड्याळाकडे एक नजर टाकली. माझ्या घड्याळाचे रेडीयमचे काटे अंधारात ११.०५ ही वेळ दाखवत होते. मूर्ती जड होती व त्यात मला पाण्यातून चालायाचे असल्यामुळे थोडा त्रास झाला. पण मी सुखरुपपणे भुयाराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो .

-५-
दाराला परत कुलूप लागलेले होते. मला यायला थोडासा उशीर झाला होता. नेहमीप्रमाणे तो माणूस ११ वाजता कुलूप लावून निघून गेला होता. खिशातून काही मिळते का ते मी पाहू लागलो. हेरगिरीच्या व साहसे करण्याच्या स्वभावापायी मी अनेक वस्तू जमवून ठेवल्या होत्या त्यात अनेक चाव्यापण होत्या. खिशात काही नाही मिळाले पण माझ्या सॅकमधे हा चाव्यांचा जुडगा होता. दरवाजा जाळीचाच होता. त्यामुळे बाहेर हात घालून कुलुप उघडण्याचा प्रयत्न करणे सहज शक्य होते. मी कुलुपाचे निरिक्षण केले. ते छोटेसे व साधेच कुलूप होते. माझ्याकडच्या चाव्यांपैकी एका चावीने ते छोटेसे कुलूप जास्त कष्ट न करता माझ्या सुदैवाने सहजपणे उघडले गेले. बाहेर जाताना मुख्य दरवाजावरील कर्मचारी विचित्र व हेटाळणीच्या नजरेने पहात होता. बरोबर होते त्याचे. गुढग्यापर्यंत पॅन्ट पूर्णपणे भिजलेली, अंगावर असलेली माती, असा माझा अवतार पाहून कोणीही असेच पाहिले असते. तर मी शनिवारवाड्याबाहेर जाताच पहिल्यांदा पब्लिक टेलिफोन बूथ गाठला. सुदैवाने सुटी नाणी होती माझ्याकडे. मी सर्वप्रथम पुण्याच्या महापौरांना फोन केला व थोडक्यात माझा हा उद्योग कळवला आणि पुरातत्त्व खात्याच्या इमारतीत यायची विनंती केली.

मी भांडारकर रस्त्यावरील पुरातत्व खात्याच्या इमारतीत पोहोचेपर्यंत
महापौरदेखील आलेले होते. मी येताच महापौरांनी मला जवळ घेऊन माझे खूप कौतुक
केले. मूर्तीची माहिती समजताच सर्व वर्तमानपत्रांचे वार्ताहरही आलेले होते.
ती रत्नजडीत मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा सोहळा निर्विघ्नपणे पार
पडला. मी शांतपणे घरी परतलो. घरी येई पर्यंत संध्याकाळ झालेली होती. खूप
थकलो असल्याने मी रात्री लवकर झोपलो...
दुसर्या दिवशी सकाळी पेपर मध्ये पहिल्या पानावर माझ्या पराक्रमाची
सविस्तर हकिकत आलेली होती. अगदी ती रत्नजडीत मूर्ती व महापौर यांच्यासोबत
काढलेल्या फोटोसकट. पेपर पाहूनच आईने मला साखरझोपेतून उठवले व म्हणाली-
कार्ट्या असे उद्योग करायला उलथला होतास होय? पण गुणाचं ते माझं पोर"...
म्हणून आईने मला जवळ घेतलं ...
एका रात्रीत मी सार्या पुण्यात फेमस झालो होतो. मला मात्र एका मोठ्या रहस्यावरचा पडदा उघडल्यावर सहजच एक डायलॉग आठवला. माय नेम इस बॉन्ड ... जेम्स बॉन्ड... हा हा...

-------सागर
No comments:
Post a Comment