विक्रोळीच्या संपतला मी म्हटले
तु रूळावर काय शी करायला बसतोस?
अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून?
तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस?
अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे
तशी संपत म्हणाला --
साहेब, शी काय म्हंता? सरळ हागाय बसतो म्हणाना !
म्हणजे किती मराठी वाटतं, पोट कसं साफ झाल्यासारखं वाटतं.......
मी त्याला म्हटलं अरे दादरसारख्या ठिकाणी आता किती सुंदर, देखणी, सुलभ शौलालयं निघालीत
तिथे जावं..........
मग मी सरकारकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला
शौचालयाचा वार्षिक पास दिला मोफत
आता ते सर्वजण गाडीने दादरला येतात - सुलभ शौचालयात !
...... आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो,
च्यायला सरकारनं जगायची नाय, जगायची नाय
हागायची तर सोय केली!!!
No comments:
Post a Comment