Wednesday 11 April 2012

थ्री जी म्हणजे काय रे भाऊ?




आपल्या देशात सगळ्याच गोष्टी उशिरा येतात, अशी एक ओरड केली जाते. विशेषत: नवनवीन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तर ही ओरड जरा जास्तच केली जाते. आपल्याकडे बरेच दिवस थ्रीजी ही नवीन
 
टेक्नॉलॉजी येणार येणार अशी चर्चा होत होती. त्यात लष्कराच्या परवानग्या, वादावादी, वायफळ चर्चा, महिनाभर चाललेली बोलीची प्रक्रिया या साऱ्या संकटांतून वाट काढत शेवटी एकदा आपल्या देशात थ्रीजी आले. या साऱ्या धर्मसंकटातून बाहेर पडून थ्रीजी सेवा चालू होण्यात दोन वषर्ं गेली आणि तोपर्यंत सारे जग फोरजीच्या मागे लागले. असो. पण सध्या तरी भारतीयांनी थ्रीजीलाच गोड मानून त्याचा स्वीकार केला.
बरेच दिवस थ्रीजी आले आहे अगर लवकरच येत आहे अशा प्रकारच्या जाहिराती पेपरांमधून किंवा दूरचित्रवाणीवरून केलेल्या आपल्याला दिसत आहेत. 


तर ही थ्रीजी भानगड आहे तरी काय, हा मोठा प्रश्न येऊ घातला आहे.

"थ्री जी" म्हणजे खिशातून बाळगता येईल, असे ऑफिस [Work] आणि थिएटर [ Entertainment ].


"थ्री जी'मध्ये इंटरनेट सेवा ३.१ एमबीपीएस (मेगाबाईट प्रति सेकंद = १०,००,००० बिट्‌स प्रति सेकंद) इतक्‍या किंवा त्याहीपेक्षा अधिक वेगाने मिळू शकेल.
आपला पेशन्स पोटातल्या आंत्रपुच्छासारखा कमी-कमी होतोय. त्यामुळे डेटा ट्रान्सफर, मग तो केवळ व्हॉइसडेटाच नव्हे, तर पिक्चर आणि व्हिडिओ डेटाही असेल, कळ दाबल्या दाबल्या अवतरलाच पाहिजे अशी आपल्या मानसिकतेची सक्ती असते. थ्री-जी क्रांतीचा हाच नारा आहे.. फास्टर डेटा ट्रान्सफर! मोबाइल फोनची उपयुक्तता टेलिफोनीच्या कितीतरी पुढे आणि पलीकडे गेलेली आहे. तो आपला ऑर्गनायझर असतो, एंटरटेनर असतो. टीव्ही आणि कंप्युटर यांची सद्दी गेल्या सहा वर्षात मोडून या छोटय़ा धातूच्या वडीनं त्यांना बिच्चारे करून सोडलं. टीव्हीला चपटं आणि मोठं रूप घेऊन अस्तित्व वाचवावं लागतंय. कंप्युटरला लॅपटॉप नामक लघुरूपात शिरावं लागतंय. थ्री-जी फोनचा सुळसुळाट झाल्यानंतर यांचं भविष्य आणखी गडद होऊन जाईल. 
 सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर थ्रीजी या तंत्रज्ञानामुळे आपल्या मोबाइलमध्येच आपल्याला अतिजलद इंटरनेटची सोय उपलब्ध होणार आहे. आजकालच्या युवा पिढीची तर इंटरनेट ही अन्न, वस्त्र, निवारा यांसारखीच एक प्राथमिक गरज बनली आहे, त्यामुळे त्यांना ही थ्रीजीची सेवा अतिशय महत्त्वाची व लाभदायक ठरणार आहे.
या सेवेमुळे आपण काय काय करू शकतो, याची एक झलक आपण पाहू. या सेवेचे ७ मुख्य उपयोग आहेत.
 

१) मोबाइल टीव्ही
२) मोबाइलवर सिनेमा पाहणे
३) मोबाइलवर गाणी ऐकणे
४) व्हिडीयो कॉल व व्हिडीयो कॉन्फरिन्सग
५) टेलिमेडिसिन
६) लोकेशन बेस्ड सर्विस
७) हाय डेफिनिशन गेमिंग
 


 मोबाइल टीव्ही


तुम्ही कुठेतरी प्रवास करीत आहात आणि भारताची एक महत्त्वाची मॅच चालू आहे. अशा वेळी जर आपल्या हातात टीव्ही असता तर किती बरे झाले असते असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे तंत्रज्ञान तुमच्याचसाठी 
आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण कुठेही असलो तरी आपल्याला लाइव्ह टीव्ही पाहता येणे शक्य आहे. सध्या काही कंपन्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहेच, लवकरच इतर कंपन्या ही सेवा देतीलच. फक्त अट एवढीच की, आपल्याकडे थ्रीजी सुविधा असलेला फोन हवा आणि आपल्या फोनवर थ्रीजी सुविधा कार्यान्वित केलेली असावी. मग आपण कुठेही कधीही टीव्हीचा आस्वाद घेऊ शकता.थ्रीजी तंत्रज्ञानाचा वापर करून एखादा डॉक्टर कोणत्याही रुग्णाशी थेट संवाद साधून त्याचा इलाज करू शकतो. यात वर दिलेल्या व्हिडीयो कॉल या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉक्टर अगदी भारतातल्या सगळ्यात दुर्गम भागातही वैद्यकीय सुविधा पुरवू शकतात.

मोबाइल सिनेमा
थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायला आपल्याला आजकाल अजिबात वेळ नसतो. असलाच तर थिएटरचे अवाढव्य तिकीट दर पाहून डोळे पांढरे होतात. अशा वेळी ही सुविधा आपल्याला खूप उपयोगी पडू शकते. या सुविधेद्वारे आपल्याला कुठेही बसून सिनेमा पाहायचा आनंद घेता येईल.


मोबाइल गाणी
आपल्याला जर एखादे गाणे ऐकायचे असेल, जे आपल्या मोबाइलमध्ये नाहीये तर सध्या आपण काय करतो? घरी जातो, इंटरनेटवरून ते गाणे आपल्या कॉम्प्युटरवर डाऊनलोड करतो व आपल्या मोबाइलमध्ये घेतो अथवा आपल्या मित्रांकडे विचारणा करतो व ते गाणे त्यांच्याकडे असल्यास ब्ल्यू टूथने ते गाणे आपल्या 
मोबाइलमध्ये घेतो. थ्रीजीमुळे हा सारा द्राविडीप्राणायाम वाचणार असून आपण कुठेही बसून आपल्याला हवे ते गाणे ऐकू शकतो अथवा डाऊनलोड करू शकतो.
 

व्हिडीयो कॉल व व्हिडीयो कॉन्फरिन्सग
सध्या आपण फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचा फक्त आवाज ऐकू शकतो, पण थ्रीजी या तंत्रज्ञानामुळे आपल्याला व्हिडीयो कॉल करणे शक्य होईल. म्हणजेच नुसते फोनवर बोलणे नाही तर समोरच्याला आपण त्याच्या मोबाइल स्क्रीनवर दिसू, तसेच ती व्यक्तीही आपल्याला पाहू शकेल. तसेच त्याहीपुढे जाऊन आपण व्हिडीयो कॉन्फरन्सही घेऊ शकतो. म्हणजेच एकाच वेळी आपण दोन व अधिक लोकांशी थेट संवाद साधू शकतो. त्यामुळे नजीकच्या भविष्यात आपल्याला मीटिंग घ्यायला ऑफिसला जाण्याची गरज राहीलच असे नाही. आपण अगदी कोणत्या तरी बीचवर बसूनदेखील ऑफिसची मीटिंग घेऊन कामे संपवू शकतो.


टेलिमेडिसिन
ही भारतातील चिकित्सा क्षेत्रातील भविष्यातील सगळ्यात मोठी क्रांती ठरूशकते. या तंत्रज्ञानाचा वापर करून एखादा डॉक्टर कोणत्याही रुग्णाशी थेट संवाद साधून त्याचा इलाज करू शकतो. यात वर दिलेल्या व्हिडीयो कॉल या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉक्टर अगदी भारतातल्या सगळ्यात दुर्गम भागातही वैद्यकीय सुविधा पुरवू शकतात. त्यामुळे सध्या दुर्गम भागात जाऊ न इच्छिणाऱ्या डॉक्टरांचे प्रश्न निकाली निघू शकतात. यात अशीही एक सुविधा करण्यात येणार आहे, ज्यामुळे डॉक्टरांना आपल्या ठरावीक रुग्णांचे ब्लडप्रेशर, ब्लड शुगर आणि हार्टबीटवर नजर ठेवता येऊ शकेल. डॉक्टरांना जर काही गडबड जाणवली तर त्वरित मोबाइलद्वारे संदेश पाठवून इलाज करता येऊ शकेल.
लोकेशन बेस्ड सव्‍‌र्हिसेस
हा थ्रीजीमुळे एक नवीन प्रकार येऊ घातला आहे. यामुळे आपण जिथे कुठे असाल तिथल्या भागाची, तापमानाची, ट्रॅफिकची माहिती त्वरित आपल्या मोबाइलवर मिळू शकेल. तसेच छोटय़ा उद्योगांना व 
व्यावसायिकांना कमी पैशात जाहिराती करणेही शक्य होईल. उदाहरणार्थ, तुम्ही एका नवीन गावात गेलात तर तिकडचा मोबाइल टॉवर तुम्ही बाहेरचे आहात हे त्वरित ओळखून तुमचे स्वागत करण्याचा संदेश पाठवेल. लगेच तिथले तापमान व मुख्य रस्त्यांवरील ट्रॅफिकची स्थिती तुम्हाला पाठवली जाईल. त्यापाठोपाठ तिकडील स्थानिक दुकाने तुम्हाला आमच्या दुकानात अमुक गोष्टींवर अमुक टक्के सूट मिळेल असले संदेश व त्याबरोबर त्यांचा पत्ता पाठवतील. हा झाला या लोकेशन बेस्ड सव्‍‌र्हिसेसचा एक भाग. दुसरा भाग म्हणजे त्यात आपण आपल्याला हवे ते ठिकाण आपल्या मोबाइलवर शोधू शकू. उदाहरणार्थ, तुम्हाला जर एखाद्या नवीन गावात तुमच्या बँकेची शाखा शोधायची असेल तर तुम्हाला इतरांना विचारत बसायची गरज पडणार नाही. तुमच्या बँकेचे नाव फक्त एंटर केले की मोबाइल तुम्हाला तिथे कसे जायचे, किती वेळ लागेल, याउपर रिक्षा अथवा टॅक्सीचे भाडे किती होईल इथपर्यंतची इत्थंभूत माहिती देईल. याहीपुढे जाऊन लोकेशन बेस्ड सव्‍‌र्हिसेसचा आणखी एक फायदा म्हणजे त्याच्या मदतीने आपण आपल्या कोणत्याही मित्राला तो कुठेही असला तरी ट्रॅक करू शकतो. फक्त तो तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असला की झाले.
हाय डेफिनिशन गेमिंग
आपल्या मोबाइलवर तर गेम्स असतातच, पण खेळायला मजा येत नाही. याचे एक कारण म्हणजे दृश्यांची सुमार गुणवत्ता व एकटेच किती वेळ खेळत बसणार. याउलट जर हाय डेफिनिशन ग्राफिक्सचा खेळ तुमच्यासमोर असेल आणि जोडीला खेळायला मित्र असतील तर मजाच काही और येईल. थ्रीजीमुळे हे शक्य होईल. आपण आपल्या थ्रीजी फोनवर जगात कुठेही असलेल्या आपल्या मित्राला आमंत्रण देऊन त्याच्याबरोबर तोच गेम खेळू शकतो.
एकूणच थ्रीजी या तंत्रज्ञानामुळे आपले जग हे मार्शल मॅकल्युहनने म्हटल्याप्रमाणे ग्लोबल व्हिलेज अर्थात वैश्विक खेडे होणार आहे. अर्थात हे सारे तंत्रज्ञान अगदी लगेच आपल्या देशात येईलच असे नाही. थोडा वेळ 
द्यावा लागेल आणि थोडा धीर धरावा लागेल.

 
आतापर्यंत ‘बीएसएनएल’ आणि ‘एमटीएनएल’ या दोन सरकारी कंपन्यांची ‘थ्री-जी’ स्पेक्ट्रम वर मक्तेदारी होती. म्हणजे त्या कंपन्यांच्या ग्राहकांना ‘थ्री-जी’ मोबाइल वापरता येत होते. पण त्यांची मक्तेदारी अर्थातच संपुष्टात येईल. कारण या घडीला ‘भारती एअरटेल’, ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’, ‘व्होडाफोन एस्सार‘, ‘आयडिया सेल्युलर’, ‘टाटा टेलिसर्विसेस’ आणि ‘एअरसेल’ या कंपन्यांमध्ये देशभर थ्री-जी सेवा जाळे उभारण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. गुजरात, मुंबई आणि दिल्ली ही ‘हॉट मार्केट्स’ आहेत. सेवाक्षेत्रे किंवा सेल पुरवण्याचं काम लिलावाद्वारे केलं जातं. आपले डोळे ‘आयपीएल’मधील लिलावांमुळे विस्फारले होते. कारण सर्वसामान्यांना इतकी कोटीच्या कोटी उड्डाणे पाहण्याची किंवा ऐकण्याची सवय नसते. पण ‘थ्री-जी’ सेवेसाठी गेल्या नऊ एप्रिलपासून सुरू झालेल्या लिलावातील आकडे ऐकले की श्वास अडकतो. ‘थ्री-जी’ आणि ‘वायरलेस ब्रॉडबँड अ‍ॅक्सेस’ सेवांसाठी परवानगी देताना सरकारी तिजोरीत 35 ते 40 हजार कोटी रुपयांची भर पडेल. 
15 एप्रिलपर्यंतच एकूण बेस प्राइसपेक्षा 38 टक्के अधिक रकमेची हमी मोबाइल कंपन्या देऊ लागल्या होत्या. एकदा का हा लिलाव पूर्ण झाला, की सर्वाधिक बोली लावणा-या कंपनीने मोजलेल्या रकमेइतकी हमी सरकारी कंपन्यांनाही (बीएसएनएल आणि एमटीएनएल) द्यावी लागेल. तरच त्यांना विनासायास देशभर सेवा पुरवता येईल. पण सरकारी मदतीमुळे दोन्ही कंपन्यांसाठी ते फार मोठे आव्हान ठरू नये.

केवळ उच्चमायाविभूषितांसाठीच थ्री-जी सेवा परवडण्याजोगी आणि फायदेशीर राहील हा गैरसमज आहे. एखादं न्यूज चॅनेल लाइव्ह मिळेल, एखादा सिनेमा किंवा व्हिडिओ ऑन डिमांड मिळेल. पण त्याचबरोबर दूरवरच्या एखाद्या पेशंटला आणीबाणीच्या परिस्थितीत डॉक्टरचा सल्ला मिळू
शकेल. किंवा ग्रामपंचायत सदस्यांना तालुक्याच्या गावी असलेल्या पंचायत समितीत, नाहीतर जिल्हा परिषदेत गावातूनच ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ करता येईल. ‘ऑनलाइन स्ट्रीमिंग डिलिव्हरी’ हा ‘थ्री-जी’ टेलिफोनीचा सर्वात मोठा फायदा आहे. वरील सर्व उदाहरणांमध्ये त्याचा उपयोग निव्वळ चंगळवादी आहे असं म्हणता येत नाही.


सध्याच्या पिढीला सुपरफास्ट नेट सर्फिगची नशा इतर कोणत्याही नशेपेक्षा अधिक असते! सध्या उपलब्ध असलेल्या अनेक हँडसेट्समध्ये सर्फिग करता येतंच, पण तिस-या पिढीतली मोबाइल टेलिफोनी वापरून नेट स्पीड अधिक समाधानकारक मिळेल. सोशल नेटवर्किंगची चटक
लागलेल्यांना तर अमृतकुंभ मिळाल्याचं सुख लाभेल! सुरुवातीला सेवा काहीशी महाग जरूर राहील. पण भारतात जगातील कोणत्याही वस्तूच्या किमती जमिनीवर येतात हा अनुभव आहे. सगळी फीचर्स आहेत म्हणून अगदी गेल्या वर्षी 12 ते 15 हजारांमध्ये हँडसेट्स घेतलेली मंडळी, आज तीच फीचर्स पाच ते सहा हजारांमध्ये मिळतात ते पाहून उसासे टाकतात. मोटारी, हँडसेट्स, कंप्युटर, लॅपटॉप या ‘चैनीच्या’ गोष्टी भारतात ‘गरजेच्या’ बनल्या, तसंच काहीतरी ‘थ्री-जी’ सेवेबाबत घडून येईलच. भारतात धंद्याची गंमत किमतीत नाही, संख्येत आहे हे राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ओळखलंय. इथं वस्तू महागडी वस्त्रे लेवून येतात नि इथल्या मार्केटमध्ये ती वस्त्रं गळून पडतात. कनेक्टिव्हिटी हे प्रगतीचं लक्षण मानलं जातं. भारतात कनेक्टिव्हिटीचं जाळं वेगानं फोफावू लागलंय. सध्याच्या स्पेक्ट्रम लिलावात जम्मू-काश्मीर, ओरिसा आणि आसाम या राज्यांसाठी मोबाइल कंपन्या पुढे येत नाहीयेत. पण त्यांच्यासाठी केव्हाही सरकारी कंपन्यांचा आधार आहेच. ब्रॉडबँडच्या वेगानं नेट स्पीड देणारी ही क्रांती त्यामुळेच भारताच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल. रेल्वे आणि रस्ते यांच्याप्रमाणेच थ्री-जी हाही प्रगतीचा महामार्ग ठरेल.
 
थ्रीजी सेवा कार्यान्वित करण्यासाठी सध्यातरी ज्यादा पैसे मोजावे लागत नाहीत. बहुतांश कंपन्यांनी सवलत दिलेली आहे. तसेच ही सेवा घेतल्यानंतर व्हाइस कॉल आणि एसएमएससाठीही अधिक चार्ज द्यावा लागत नाही. परंतु, व्हिडिओ कॉल, इंटरनेट इत्यादी सुविधांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

रिलायन्स कम्युनिकेशन्सने थ्रीजी सेवा सुरू केली आहे. त्यामध्ये '२५एमबी, वन डे पॅक' केवळ २० रुपयांत उपलब्ध केले आहे.

एअरटेलने 'मीडियम युझर्स'साठी मासिक २०० ते ७५० रुपयांचे मासिक पॅकेज तयार केले आहे. अधिक वापर असणाऱ्या 'हेवी युझर्स'साठी १.२५ जीबीचे मासिक पॅकेज ६७५ रुपयांनी सुरू करण्यात आले आहे.

सरकारी मालकीच्या बीएसएनएल आणि एमटीएनएलने थ्रीजी सेवा यापूवीर्च सुरू केलेली आहे. या दोन्ही कंपन्यांचे प्लॅन तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त आहेत. बीएसएनएलने १३५९ रुपयांत आणि एमटीएनएलने २५०० रुपयांत अमर्याद डाटा ट्रान्सफर योजना जाहीर केलेल्या आहेत. अशा प्रकारे थ्रीजीद्वारे अनेक अत्याधुनिक सुविधा मोबाइल हँडसेटवर मिळत असतात. त्यात हायस्पीड इंटरनेट अॅक्सेस (टूजीपेक्षा २० ते ३० पटीने अधिक) व्हिडिओ, लाइव्ह टीव्ही, व्हिडिओ कॉल आणि इतर मल्टिमीडिया सुविधांचा त्यात समावेश आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही वेळेची मर्यादा असलेला प्लॅन घेऊ शकता. त्यामुळे तुमचे बिलही मर्यादित राहते. किंवा फ्लेक्झिबल प्लॅनही घेऊ शकतात. त्यामध्ये बिलिंग मर्यादित किंवा अर्मादित स्वरूपाचे राहते. परंतु, यामध्ये व्हाइस कॉल आणि एसएमएसचा समावेश नसतो. त्यांचे बिलिंग सध्याच्या 'टूजी प्लॅन'नुसारच आकारण्यात येते.  
 

जगातील प्रगत बाजारपेठांमध्ये आता ‘थ्री-जी’ नंतरच्या ‘फोर-जी’नं म्हणजे चौथ्या पिढीतील मोबाइल टेलिफोनीनं शिरकाव केलाय. ‘टू-जी’ आणि ‘थ्री-जी’ यांच्यात दिसतो तितका क्रांतिकारी फरक फोर-जीमध्ये नाही. पण इंटरनेट टेलिफोनीला आणखी वरच्या पातळीवर घेऊन जाण्याची क्षमता ‘फोर-जी’मध्ये आहे. तूर्तास ‘थ्री-जी’चं स्वागत करूया!

 

 ----------- म टा

No comments:

Post a Comment