Wednesday, 1 February 2012

झणझणीत कोल्हापुरी ठसका (चिकन)

पुरी ठसका (चिकन)


साहित्य ; १/२ कि. चिकन ,३ मोठे चमचे दही ,आल-लसून पेस्ट २ चमचे ,२ टोमॅटो बारीक चिरलेले ,१ कांदा चिरलेला ,कोथिंबीर ,तेल /तूप ३ चमचे
वाटणासाठी : खसखस २ चमचे ,१ कांदा उभा चिरलेला , सुक्या खोबर्याचे काप १/२ वाटी, ३ - ४ लाल साबूत मिरच्या (अखंड )
धने १ चमचा ,दालचिनी तुकडा ,लवंग ३-४ ,काळी मीर ३-४ ,१ चमचा शहाजीर ,४-५ काजू
तव्यावर थोड तेल घालून खसखस हलकी भाजून घ्या ,त्याच प्रकारे लाल मिरची ,खोबर्याचे काप ,धने व इतर गरम मसाले हलके भाजून घेणे
हे मिश्रण थंड झाले कि याचे थोडे पाणी घालून वाटण करून घ्या .
कृती : चिकनला दही ,हळद ,मीठ आणि आल लसून पेस्ट चोळून ३० -४० मिनिटासाठी मॅरीनेट करा .
एका कढइत ३ चमचे साजूक तूप / बटर /तेल (तुमच्या आवडीनुसार ) घाला त्यात थोडा कांदा घाला ,कांदा परतला कि टोमॅटो घाला ,
आता आल लसून पेस्ट घाला ,थोड परतून घ्या ,१ चमचा लाल तिखट ,१ चमचा गरम मसाला आणि १ चमचा चिकन मसाला घाला परतून घ्या ,मीठ घाला.
आता त्यात वाटण घाला, एकजीव करून घ्या मसाल्याला तेल सुटू लागल कि त्यात चिकनचे तुकडे घालून ५-६ मिनिट छान परतून घ्या .
चिकन पूर्णपणे मसाल्याने माखल्या नंतर शिजेल इतक पाणी घाला, १०-१५ छान शिजू द्या ,लाल तरी आली कि कोथिंबीर घाला
कोल्हापुरी चिकन भाकरी बरोबर सर्व करा Smile
( तिखटाच प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी - जास्त ठेवा )





MiPa वरून साभार

No comments:

Post a Comment