मुलगा ----
नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली |
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली |
कोण होतीस तू, काय झालीस तू |
अग वेडे कशी वाया गेलीस तू | |
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली |
कोण होतीस तू, काय झालीस तू |
अग वेडे कशी वाया गेलीस तू | |
सुंदर रूप तुझे निर्मळ भारी |
होतीस अशी तू पवित्र नारी |
डोईवर पदर, पदरात चेहरा |
डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा |
होती यशोदा तू, होतीस तारा तू |
होतीस अशी तू पवित्र नारी |
डोईवर पदर, पदरात चेहरा |
डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा |
होती यशोदा तू, होतीस तारा तू |
होतीस राधा तू, होतीस मीरा तू
पार्वती ती महान झाली |
राज्य वैभव टाकून आली |
काळ बदलला तूही बदलली |
सा-यांना भुलवीत रसत्याने चालली |
पदराचं भान नाही, अब्रूची जाण नाही |
सडक लैला अशी बदनाम झालीस तू |
तू अशी नारी होती, लाखात भारी होती |
मर्दानी झाशीवाली होउन लढलीस तू ||
कोण होतीस तू, काय झालीस तू
पार्वती ती महान झाली |
राज्य वैभव टाकून आली |
काळ बदलला तूही बदलली |
सा-यांना भुलवीत रसत्याने चालली |
पदराचं भान नाही, अब्रूची जाण नाही |
सडक लैला अशी बदनाम झालीस तू |
तू अशी नारी होती, लाखात भारी होती |
मर्दानी झाशीवाली होउन लढलीस तू ||
कोण होतीस तू, काय झालीस तू
मुलगी ----------
पुरूष जातीची थोरवी या दुनियेने गाइली
अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली
कोण होतास तू काय झालास तू |
अरे वेड्या कसा वाया गेलास तू |
तेजस्वी रूप तुझे, करारी बाणा |
होतास असा तू मर्दाचा राणा |
सिंव्हाची छाती होती, उरात आग होती |
वाघाची झेप होती, डोळ्यांत जाग होती |
होतास राम तू, होतास बुद्ध तू |
होतास कृष्ण तू, विवेकानंद तू |
भगतसिंग तो महान झाला |
देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला |
काळ बदलला, तूही बदलला |
करीत इशारे तू रस्त्याने चालला |
पोरींची छेडाछेडी, लोचट लाडीगोडी |
सडक मजनू असा बदनाम झालास तू |
तू असा शूर होता, लाखात वीर होता |
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू | | | |
पुरूष जातीची थोरवी या दुनियेने गाइली
अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली
कोण होतास तू काय झालास तू |
अरे वेड्या कसा वाया गेलास तू |
तेजस्वी रूप तुझे, करारी बाणा |
होतास असा तू मर्दाचा राणा |
सिंव्हाची छाती होती, उरात आग होती |
वाघाची झेप होती, डोळ्यांत जाग होती |
होतास राम तू, होतास बुद्ध तू |
होतास कृष्ण तू, विवेकानंद तू |
भगतसिंग तो महान झाला |
देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला |
काळ बदलला, तूही बदलला |
करीत इशारे तू रस्त्याने चालला |
पोरींची छेडाछेडी, लोचट लाडीगोडी |
सडक मजनू असा बदनाम झालास तू |
तू असा शूर होता, लाखात वीर होता |
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू | | | |
मुलगा ----
लाजवंती कालची तू चंचल छछोर होई |
बेछुट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही |
बेछुट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही |
कोण होतीस तू, काय झालीस तू |
अग वेडे कशी वाया गेलीस तू |
आखुड केस हे आखुड कपडे |
पाठ ही उघडी, पोट हे उघडे |
कालची सीता आज डॅडींची रीटा झाली |
अग वेडे कशी वाया गेलीस तू |
आखुड केस हे आखुड कपडे |
पाठ ही उघडी, पोट हे उघडे |
कालची सीता आज डॅडींची रीटा झाली |
साडी बिचारी खाली घसरली |
नवा तुझा ढंग हा, बघण्याजोगा |
नवा तुझा ढंग हा, बघण्याजोगा |
पुढून मुलगी मागून मुलगा |
लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू |
लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू |
तू अशी नारी होती लाखात भारी होती |
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू |
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू |
मुलगी ----------
काल तुझ्या हाती तलवार होती |
लढवय्याचा तू वारसा |
लढवय्याचा तू वारसा |
आज तुझ्या हाती कंगवा |
घडीघडी बघसी तू आरसा |
कोण होतास तू काय झालास तू |
अरे वेड्या कसा वाया गेलास तू |
काय तुझी वेषभुषा आता कहर झाला |
काय तुझी वेषभुषा आता कहर झाला |
कालचा हिरो हा आज झिरो झाला |
कमरेला बेलबॉटम अंगात पोलका |
लांबलांब केस हे मिशिला चटका |
तऱ्हा तुझी बायकी, बघण्याजोगी |
पुढून मुलगा हा मागून मुलगी |
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू |
कमरेला बेलबॉटम अंगात पोलका |
लांबलांब केस हे मिशिला चटका |
तऱ्हा तुझी बायकी, बघण्याजोगी |
पुढून मुलगा हा मागून मुलगी |
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू |
तू असा शूर होता लाखात वीर होता |
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू |कोण होतास तू काय झालास तू |
अरे वेड्या कसा वाया गेलास तू |
No comments:
Post a Comment