Monday, 27 February 2012

केरळी फिश करी


केरळी फिश करी 

४ जणांसाठी

साहित्य
माशांचे बोनलेस तुकडे ४०० ग्रॅम (४ बाय ४ इंचाचे तुकडे)
(रावस, सुरमई, पापलेट)
बारीक चिरलेले कांदे २ मध्यम (१५० ग्रॅम)
बारीक चिरलेला टोमॅटो १ मोठा (१०० ग्रॅम)
सुकलेल्या लाल मिरच्या १० नग
आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून
हळद पूड १/२ टीस्पून
लाल तिखट पूड १/२ टीस्पून
धणे १ टीस्पून
जिरे १/२ टीस्पन
खवलेला नारळ १ कप (१३० ग्रॅम)
मेथीचे दाणे १/४ टीस्पून
उभी मधून चिरलेली हिरवी मिरची १ नग
कढीपत्ता ८ पाने
नारळाचे दूध १ कप (२५० मि.ली.)
चिंचेचा कोळ २ टेबलस्पून
मीठ चवीपुरतं
बारीक चिरलेली कोथींबीर २ टेबलस्पून
तेल ४ टेबलस्पून

कृतीः-

१. मीठ, हळद पूड व आले-लसूण पेस्ट माशांच्या तुकडयांना लावून २० मिनिटे बाजूला ठेवावे.

२. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात जिरे, धणे, लाल मिरची व खवलेला नारळ एका मागून एक रंग बदलेपर्यंत परतवून घ्यावे. कढईतून बाहेर काढून त्यात १ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट (मिश्रण) करून बाजूला ठेवावी.

३. कढईत दोन टेबलस्पून तेल घालून त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता व मेथीचे दाणे घालावे व दाणे तडतडल्यावर ह्या फोडणीत कांदा घालून रंग बदलेपर्यंत परतावा. त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यत शिजवावा व वाटलेली पेस्ट, अर्धा कप पाणी, चिंचेचा कोळ व मीठ घालून एक उकळी काढावी.

४. ह्या मिश्रणात माशांचे तुकडे घालून अंदाजे ५ मिनिटे शिजू द्यावे. ह्यात नारळाचं दूध घालून एक उकळी काढावी.

५. कोथींबीरीने सजवून गरम गरम भाताबरोबर वा अप्पम बरोबर खायला द्यावे.  



---------

No comments:

Post a Comment