अफगाणी चिकन कबाब
१ मोठी चिकन, ३ कांदे, अर्धा चमचा काळीमिरी, अर्धा चमचा दालचिनी, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार, अर्धा वाटी वाइन किंवा बीअर.
एका
भांड्यात चिकनचे छोटे तुकडे, कांदे उभे कापलेले आणि सर्व साहित्य मिक्स
करून फ्रिजमध्ये १ दिवस अगोदर मॅरिनेट करून ठेवावं. हे मीट सळीवर लावून
कोळशावर भाजावेत किंवा एका ट्रेमध्ये ठेवून ओव्हनमध्ये भाजून घ्यावेत. हे
कबाब वेगळे आहेत पण चवीला छान लागतात.
अफगाणिस्तानात हळदीला खूप
महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक जेवणात हळद ही असलीच पाहिजे.
दररोज सकाळी १ चमचा हळद दुधातून घेतली असता रक्तशुद्धी होते.
------------------------------------------------
खीमा कबाब
साहित्य :
अर्धा किलो मटण खीमा,
५० ग्रॅम चना डाळ,
अख्खा गरम मसाला
(२ काळेमिरी, २ लवंगा, १ वेलची, २ दालचिनी),
१ अंड, २ हिरव्या मिच्र्या, ५ पाकळ्या लसून,
२ चमचे मिर्ची पावडर, १ कांदा, ४ चमचे तेल, एक तुकडा आलं, चवीपुरते मीठ.
कृती : खीमा धुऊन त्यात मीठ, हळद, मिर्ची पावडर, लसून पाकळ्या, अख्खा गरम मसाला, भिजवलेली चनाडाळ. हे मिश्रण एका टोपात घेऊन शिजत ठेवा, मिश्रण सुके होईपर्यंत शिजवा. हे मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटल्यावर त्यात अंड फोडून घाला व हिरव्या मिच्र्या, कांदा, आल, कोथिंबीर बारीक कापून त्यात एकत्र करा. तळहाताला तेल लावा, मिश्रणाच्या गोल-चपटय़ा आकाराच्या वडय़ा बनवा. तव्यावर थोडेसे तेल घाला व त्या वडय़ा लालसर होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. तयार झालेले कबाब सॉस किंवा पुदीना चटणी बरोबर छान लागतात.
------------------------------------------------
झटपट (मटण) खीमा समोसा
साहित्य : अर्धा किलो मटण खीमा,
६ ते ७ हिरव्या मिच्र्या, एक छोटा तुकडा आलं,
१० ते १२ पाकळ्या लसून,
२-३ कांदे बारीक चिरून पेपरवर पसरवा. पाणी निघून गेल्यानंतर ते खिम्यामध्ये कच्चेच मिक्स करा
अर्धा चमचा हळद,
दोन वाटय़ा गव्हाचे पीठ,
पाव किलो तेल, चवीपुरते मीठ.
कृती : प्रथम खीमा स्वच्छ धुऊन घ्या, त्यात आल, लसुन व हिरव्या मिच्र्याची पेस्ट, हळद, मीठ घाला. मिश्रण मंद गॅसवर शिजत ठेवा, ते मिश्रण सुखे होईपर्यंत शिजवा. मिश्रण थंड झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घाला व ते एकत्र करा. गव्हाचे पीठ मळा, दोन छोटे छोटे गोळे करा व एक चपाती बनवा. ती हलकीशी शेका. शेकल्यानंतर त्या दोन वेगवेगळ्या करा, अशा ७ ते ८ चपात्या बनवा नंतर त्याचे सुरीने उभे ४ भाग करा. एका छोटय़ाशा भांडय़ामध्ये गव्हाचे पीठ व पाणी घालून उकळी काढा ती पेस्ट समोसे चिकटवण्यासाठी उपयोगी येते. चपातीच्या केलेल्या भागामधला एक तुकडा घेऊन त्यात एक चमचा खीम्याचे मिश्रण घालून समोसाच्या आकाराचे बनवून व पेस्ट लावून समोसा बंद करा. नंतर कढईमध्ये मंद आचेवर डीप फ्राय करा.
------------------------------------------------
खिमा टिक्की
साहित्य : खिमा- २०० ग्रॅम,
कांदा (बारीक चिरून)
१ चमचा, आलं-लसूण पेस्ट- १ चमचा,
लाल तिखट- १ चमचा, गरम मसाला- १ चमचा,
मीठ- चवीप्रमाणे,
लिंबू रस- १ चमचा, बटाटे (उकडलेले)- ४,
कॉर्न फ्लॉवर- ३ चमचे,
तेल- तळण्यासाठी.
कृती : प्रथम उकडलेले बटाटे किसून त्यामध्ये मीठ, लाल तिखट व कॉर्न-फ्लॉवर घालून मळून घेणे. थोडे मीठ घालून खिमा शिजवून घ्यावा. त्यानंतर कढईत तेल गरम करून कांदा परतून घेणे. कांदा लालसर झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी. नंतर खिमा घालावा. लाल तिखट, गरम मसाला व कोथिंबीर घालून कोरडे होईपर्यंत परतवावे. कोरडा झाल्यावर खिमा गार होऊ द्यावा. त्यानंतर बटाटय़ाच्या लगद्याची छोटी वाटी तयार करून त्यामध्ये खिमा भरावा. घट्ट दाबून त्याला गोल व चपटय़ा अशा टिक्कीचा आकार द्यावा. फ्राइंग पॅनमध्ये मंद आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत श्ॉलो फ्राय करावे. पुदिना, चटणी व ब्रेड बरोबर गरमागरम सव्र्ह करावे.
------------------------------------------------
मिक्स व्हेज रोल
साहित्य : उकडलेले बटाटे- २,
उकडलेले मटार- ३ चमचे,
उकडलेले स्वीट कॉर्न- ३ चमचे,
किसलेला गाजर- ३ चमचे, किसलेला कोबी- ३ चमचे,
ब्रेड स्लाईस- २, ब्रेड क्रम्स्- १/२ वाटी,
कॉन-फ्लॉवर- २ चमचे,
मीठ- चवीप्रमाणे, लाल तिखट- १ चमचा,
कांदा-लसूण मसाला- १ चमचा,
तेल- तळण्यासाठी.
कृती : उकडलेले बटाटे कुसकरून घेऊन त्यात गाजर कोबी घट्ट पिळून घालणे. वरील सर्व मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर वाटून त्यात मटार व स्वीट कॉर्न घालावेत. नंतर मीठ, हळद, लाल तिखट व कांदा लसूण मसाला घालून व ब्रेड स्लाईस घालून एकत्र करावे. कॉर्न फ्लॉवरमध्ये पाणी घालून भाज्यांचे मिश्रणाचे छोटे लांबट असे रोल करून ते कॉर्न फ्लॉवरच्या मिश्रणात बुडवून नंतर ब्रेड क्रम्स्मध्ये घोळवावे. हे रोल गरम तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावेत गरम गरम मिक्स व्हेज रोल सॉस किंवा चटणीबरोबर सव्र्ह करावे.
------------------------------------------------
झटपट पौष्टिक थालीपीठ
साहित्य : ज्वारी पीठ- १ वाटी, बेसन पीठ- १/४ वाटी,
तांदूळ पीठ- १/४ वाटी,
कांदा (किसून)- २ चमचे,
मीठ- चवीप्रमाणे, लाल तिखट- २ चमचे,
जिरे पूड- १ चमचा, हळद, हिंग- १/४ चमचा,
तेल.
कृती : प्रथम ज्वारीच्या पिठामध्ये बेसन व तांदूळ पीठ घालावे. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, हिंग व जिरे पूड घालावी. नंतर कांद्याची पेस्ट, ओले खोबरे व बारीक चिरलेले कोथिंबीर घालून घट्ट मळून घ्यावे. मध्यम आकाराचे गोळे करून प्लास्टिकच्या पिशवीवर तेल लावून जाडसर थापून घेणे. त्यावर २-३ छिद्र करावीत. तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यावे. लोणी किंवा बटर लावून दही व शेंगदाणा चटणी बरोबर खाण्यास देणे.

स्वीट कॉर्न बटाटावडा
साहित्य : बटाटे (उकडलेले)- ४,
स्वीट कॉर्न- १ वाटी,
आलं-लसूण पेस्ट- १ चमचा,
हिरवी मिरची- ४-५,
कोिथबीर- १/२ वाटी,
बेसन- १ वाटी, मीठ- चवीप्रमाणे,
तेल- तळण्यासाठी.
कृती : प्रथम बटाटे उकडून कुसकरून घ्यावेत. त्याचप्रमाणे स्वीट कॉर्न उकडून जाडसर वाटून घेणे. हे मिश्रण एकत्र करून त्यात हिरवी मिरची व कोथिंबीर वाटून घालावी. त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट व मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे. बेसन पिठामध्ये थोडे मीठ, हळद व लाल तिखट घालून जाडसर भिजवावे. बटाटय़ाचे छोटे छोटे गोळे करून बेसन पिठात बुडवून मंद आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यावे. सॉसबरोबर खाण्यास द्यावे.

No comments:
Post a Comment