मालवणी फिश करी
साहित्यःपापलेट स्वच्छ करून तुकडे करणे
१ वाटी खोवलेले खोबरे
१ मध्यम कांदा बारीक चिरून
२-३ लसुण पाकळ्या
३-४ आमसुलं
१ टेस्पून धणे
५-६ बेडगी किंवा संखेश्वरी मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
मीठ चवीनुसार
१ टीस्पून गरम मसाला (ऐच्छिक)
तेल
६-७ तिरफळं , आतील काळी बी काढुन टाकावी , तिरफळं पाण्यात भिजवावी, मग ठेचुन त्याच पाण्यात घालावी. (हे ऐच्छिक आहे)
पाकृ:
पापलेटच्या तुकड्यांना थोडी हळद व थोडे मीठ लावून ठेवावे.
धणे व मिरच्या १/२ तास गरम पाण्यात भिजवून ठेवणे.
नंतर ओले खोबरे, लसुण, धणे, मिरच्या व कांदा एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घेणे. (कांद्यातील १ टेस्पून कांदा बाजुला काढून ठेवणे.)
वाटलेला तयार मसाला.
जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून १ टेस्पून कांदा गुलाबीसर परतून घ्यावा.
त्यात वाटलेला मसाला घालून चांगले परता.
कालवणासाठी लागेल तसे पाणी घालून उकळी आणा.
त्यात माश्यांचे तुकडे, मीठ, गरम मसाला व आमसुलं घाला , सुमारे १० मिनिटे शिजवावे.
तिरफळाचे पाणी गाळून कालवणात घालावे व ४-५ मिनिटांनी शिजवून गॅस बंद करावा
चिरलेली कोथिंबीर घालावी व चपाती, भाताबरोबर सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment