Friday, 24 February 2012

पच्छताप दग्ध बायको



 अचानक अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळालेला बॅंडू जेव्हा घरी पोचला तेव्हा त्याची बायको सोफ़्यावर पाठमोरी बसुन "सास बहू" पहात होती. तिला "SURPRISE" दयावे हया हेतुने बन्ड्याने तिचे दोन्ही डोळे झाकून हळुच विचारले, "पैचान कौन?".
त्याच्या हातावरुन अंदाज घेत लाजतच तिने ओळ्खले "दूध वाला बाबू"
मुका घ्यायाला पुढे केलेल्या ओठाना गरमागरम इस्त्रीचा चटका बसावा तशी अवस्था झालेल्या बन्ड्यावर जणु आभाळच कोसळले.
तरी तिच्या डोळ्यावरची पकड ढीली न करता त्या ने सेकेंड चांस घ्यायाचा विचार केला. "नाहीच, परत पैचान कौन?".
मघाच्याच उत्साहाने ती उद्गारली " पेपर वाला शिवा".
"नाही पैचान कौन??". फूग्यातली हवा जावी अश्या स्वरात पुन्हा बन्ड्या पिरपीरला.

"केबलवाला रमेश".

"नाही पैचान कौन???".

"मिश्रा वाचमन"  तिच्या आवाजात उत्साह कायम होता.

"नाही पैचान कौन??????".

"इस्त्री वाला.........."


रागाने बेभान झालेल्या बन्ड्याने बायकोला बड़वायला सुरुवात केली. लाथाबुककयांचे तडाखे आणि किन्चाळ्ण्याच्या आवाजाने सोसायटी दणाणुन गेली.

सारेजण धावत पळत त्यांचया प्लॅट वर आले. "काय झाले? काय झाले? " जो तो विचारू लागला.

बन्ड्याच्या तोन्डातुन रागाने शब्द ही फुटत नव्हता.

त्याचया बायकोनेच रडतरडत सारी कर्म कहानी कथन केली.

मग मात्र सारेजन त्याचया बायकोवर तुटुन पडले, तिला तोन्डाला येईल तश्या शब्दात रागावांयास सुरुवात केली. साध्या सरळ बन्ड्याला कसली बायकॉ मिळाली, बन्ड्याचे नशिब फूटके वग़ैरे...

मग मात्र बन्ड्याची बायको गयावया करू लागली. "मला क्षमा करा, मी चूकले" तीने बन्ड्याचे पाय धरले.

मग चर्चे नंतर अखेर सर्वसम्मतीने असे ठरले की, पुढच्या वेळी ती "ती चूक करणार नाही"



जेव्हा जेव्हा बन्ड्या तिचे डोळे झाकेल तेव्हा ती फकत त्याचेच नाव घेईल कुठल्याही परपुरुषाचे नाव घेणार नाही.


आणि ते दोघेही सुखाने नान्दु लागले.


No comments:

Post a Comment