Wednesday, 22 February 2012

सहजीवन

एकत्र राहण्याचे 'ध्येय' समजून घ्या !
सहजीवन म्हणजेच पती आणि पत्नी यांनी एकत्रित राहून जीवन जगणे होय आणि दोघांमध्ये समजुतदारपणा असेल तर त्याला समृद्ध सहजीवन म्हणता येईल. संसारात सुख-दु:ख, यश- अपयश असे प्रसंग येत असतात.

यासाठी आपण सुरवातीलाच ठरवून घेतले की आपले ध्येय काय आहे, आपण एकत्रित का आलो आहोत? आपण एकत्रित आलो आहोत एकमेकांना आनंद, प्रेम देण्यासाठी. तेव्हा काहीही प्रसंग आले तर ध्येयापासून दूर जायचे नाही. जसे एव्हरेस्ट शिखर सर करताना गिर्यारोहक ज्या ध्येयाने पुढे सरकतात आणि प्रवासातील प्रत्येक कठीण प्रसंगाला आनंदाने पार करतात, त्याप्रमाणे आम्हीही ध्येयाकडे लक्ष देऊन प्रवासाचा आनंद घेत असतो.
दोन व्यक्ती म्हटले की दोन मतप्रवाह हे ओघानेच आले. परंतु जेव्हा दोन मतांतरे असतील, तेव्हा एकमेकांच्या मताचा आदर करायला आम्ही शिकलो. नको तेथे वादविवाद न घालता योग्य समेट आम्ही घडवून आणतो.

घरात व्यसनं आलं की संपूर्ण कुटुंबालाच त्याचा त्रास होतो. पती-पत्नीच्या नात्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. पतीने व्यसन सोडलं तरी हे नातं लगेच सुरळीत होत नाही. एकमेकांना पूर्वीच्या चुकांची आठवण करून देणं, दोषारोप, धमक्‍या, समजून न घेणं अशा अनेक चुका नंतरही होत राहतात.1


भांडणाचे नियम

1) भांडण सुरू असताना भांडण ज्या कारणामुळे सुरू झालं, तो विषय बदलायचा नाही. विशेषतः सासर-माहेरच्या माणसांचा उल्लेख करायचा नाही.
2) भांडणासाठी एक "टाईम-लिमिट' ठरवायचं. ते अर्ध्या तासाचं असेल; तर ती वेळ संपली की दोघांनी गप्प बसायचं.
3) दोघांमधली एक व्यक्ती काही कारणांनी चिडलेली असेल, तर दुसऱ्यानं त्या वेळी थोडं समजून घेऊन शांत राहणं आवश्‍यक आहे, तरंच भांडण वाढणार नाही.
4) "तू नेहमीच असं वागतेस', "तुला काही जमतंच नाही ' अशा प्रकारे "लेबल' लावू नये. त्या वेळच्या वागण्याबद्दल बोलावं.
5) मुलांसमोर किंवा इतर लोकांसमोर वाद न घालण्याचं पथ्य पती-पत्नीनं पाळणं खूप महत्त्वाचं आहे.
6) भांडणाची तीव्रता जास्त असेल, तर समुपदेशकाची किंवा दोघांना मान्य असलेल्या मध्यस्थाची मदत घ्यावी.
सर्वांनीच अशा प्रकारचे काही नियम घालून घेतले, तर भांडणं टोकाला जाणार नाहीत आणि छोटी छोटी भांडणं सहजीवनाची गोडी वाढवतील. या सगळ्या नियमांची माझ्या वैयक्तिक आयुष्यातही, आशिषबरोबरचं सहजीवन समृद्ध होण्यासाठी, मदत झाली. पती-पत्नीमध्ये सुसंवाद असेल तरच सहजीवन यशस्वी होऊ शकतं त्यामुळे विसंवादाचं रूपांतर सुसंवादामध्ये करणं आवश्‍यक आहे.

No comments:

Post a Comment