Wednesday, 22 February 2012

पत्नीच्या झोपेवर जीवनाचे सौख्य अवलंबून







अमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठाच्या स्कूल आॅफ मेडिसिनच्या मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले आहे की, जर पत्नीला नीट झोप येत नसेल तर दुसºया दिवशी सारखी चिडचिड करत राहते, नको त्या गोष्टींवर खुसपट काढून वाद घालत बसते. त्यामुळे वैवाहिक जीवनातील सौख्यच नाहीसे होण्याचा धोका अधिक असतो. याउलट पुरुषाला जर निद्रानाशाचा आजार असेल तर वैवाहिक जीवनातील सौख्यावर फार काही फरक पडत नाही.  या संशोधन पथकाच्या प्रमुख प्रा. डॉ. वेन्डी ट्रॉक्सेल म्हणाल्या, ज्या बायका रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्या दुसºया दिवशीच्या कौटुंबिक जबाबदाºया पार पाडण्यात कमालीच्या उदासीन असतात. त्याचा परिणाम त्यांच्या पतीच्या कामावरही पडतो. 
यापूर्वीच्या संशोधनात असे आढळून आले होते की, जोडीदार किंवा पती बिछान्यात असेल तर महिला जास्त वेळ निवांत झोपतात. मात्र मेनीपॉलिस येथे प्रोफेशनल स्लीप सोसायटीच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या संशोधनात डॉ. ट्रॉक्सेल यांनी झोपेचा कालावधी आणि कौटुंबिक जीवनातील दैनंदिन संवादाशी संबंध असल्याचे निष्कर्ष सांगितले.
डॉ. ट्रॉक्सेल यांच्या पथकाने ३५ विवाहित सुदृढ जोडप्यांचा अभ्यास केला. ३० वर्षे वयोगटातील या जोडप्यांना कोणतीही शारीरिक अथवा मानसिक व्याधी नव्हती. त्यांना झोप येण्यासाठी किती वेळ लागतो आणि ते किती वेळ झोपतात याचा शोध घेण्यासाठी अ‍ॅक्टिग्राफ नावाच्या यंत्राने  सलग १० रात्री त्यांच्या नासिक हालचाली नोंदविण्यात आल्या. त्यानंतर या जोडप्यांना दुसºया दिवशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराने प्रोत्साहन दिल्यावर कितपत सकारात्मक संवाद झाला आणि जोडीदाराने टीका अथवा दुर्लक्ष केल्यावर नकारात्मक संवाद किती झाला याच्या नोंदी डायरीत करण्यास सांगण्यात आले होते. संबंध ताणले गेल्यावर बायकांना झोपायला उशीर लागतो, मात्र पतीच्या झोपेचा त्याच्या  कुटुंबावर परिणाम होत नाही.

प्रतिकूल परिणाम

एखाद्याच्या निद्रानाशाचा त्याच्या व्यक्तिगत जीवनावर जेवढा प्रतिकूल परिणाम होतो, त्यापेक्षा जास्त दुष्परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवर होतात,असे संशोधनाचे निष्कर्ष सांगतात.








No comments:

Post a Comment