Tuesday, 21 February 2012

कोळंबी भात

-----------

साहित्य
१०० ग्रॅ कोळंबी (सोलून आणि शिजवून)

२ लोकांना पुरेल इतका भात थोडं तूप घालून लावून घ्या (कुणाला बासमती आवडतो तर कुणाला ईतर जातीचा) तूप हे मसालेदार पदार्थांचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी.
१ ईंच आले
४ पाकळ्या लसूण
कोथिंबीर
आमचूर पावडर १ टेस्पून
२ चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा घरचा मसाला/गरम मसाला
४ लवंगा
३ वेलची
१ छोटा तुकडा दालचिनी
१ छोटा चमचा शहाजिरे
१ छोटा चमचा मोहोरी
१ दगडफूल
४ काळे मिरे
२ तेजपत्ता
१/४ छोटा चमचा हिंग
१ मोठा कांदा
१ मध्यम टमाटा
चवीपुरते मीठ

कृती
१. कांदा उभा चिरून घ्या आणि टमाटा बारीक.
२. आले किसून घ्या, लसूण बारीक चिरून घ्या.
३. वेलची, काळे मिरे, लवंग, दालचिनी, दगडफूल मसाला थोडासा भरडून घ्या.

४. कढईत तेल तापवा.
५. तेल तापले की हिंग घालून मोहोरी आणि शहाजिरे घाला.
६. लसूण टाकून थोडा तळला गेला की मग भरडलेला गरम मसाला घाला.
५. उभा चिरलेला कांदा घालून चांगला सोनेरी होईपर्यंत परता.

६. कांदा परतला की त्यात टमाटा, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, मसाला, आमचूर पावडर हे सर्व एकत्र करून मग आणखी मंद आचेवर ५-१० मिनिटे परता. आता यात कोळंबी टाकून पुन्हा एकदा थोडा वेळ परता.
७. आता कढईत भात टाका, मीठ घाला आणि चांगलं एकत्र करून ५ मिनिटे वाफवा.
८. कोथिंबीर पेरा आणि हाणा.

--- MIPA

No comments:

Post a Comment