म राठी ललित साहित्याच्या प्रांगणात स्व: प्रतिभेने प्रकाशमान झालेला,
त्यात आपले अढळ स्थान निर्माण करून अवघे साहित्यविश्व व्यापून टाकणारा,
उजळवून टाकणारा, दलितांमधील पहिला साहित्यतारा म्हणून अण्णाभाऊंची ओळख
आहे. आपल्या साहित्य प्रवासाला १९४४ मध्ये म्हणजे वयाच्या २४ व्यावर्षी
शाहिरीपासून सुरूवात करून पोवाडा, तमाशा, वगनाटय़, नाटक, कथा, कादंबऱ्या
आणि प्रवासवर्णन या प्रकारात गरूड भरारी घेतली.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव इथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील आगळं-वेगळं साहित्यसंचित आहे. लावण्या, पोवाडा, वगनाट्याद्वारे त्यांनी जनजागृतीचे काम केले. १ ऑगस्ट १९२० रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी आण्णांचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची व हलाखाची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णा शाळेत फक्त दोनच दिवस गेले. बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीतच झाले. आम्हीही ही माणसं आहोत, आम्हालाही सुखाने, स्वाभिमानाने व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. या न्याय्य मागणीने अण्णा पेटून उठले.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती.
जन्माने मिळालेली अस्पृशता, त्या अनुषंगाने येणारे पशूतूल्य जीवन, हालअपेष्टा यांचा वाटा वाटेगावलाच सोडून वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, `आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे`.
गावकडच्या तमाशाचा बाज, लावणीचा ठसका, लोकगीतांची लय, बेडरपणा आणि चौकसबुद्धी याचा साज जनमनावर वागवत हा तरुण मुंबईतही गाऊ लागला. ऐकलेल्या कथा, शौर्यकथा खुलवून खुलवून सवंगडय़ांना सांगू लागला. त्यामुळे भरपूर मित्र मिळाले. नोकरीचा प्रश्न सुटल्याने अण्णाभाऊंच्या आयुष्याला स्थिरता आली. आपल्या राहत्या घरातच एक छोटसे ग्रंथालय उभे करून त्यांनी वाचनाचा सपाटा लावला. खलिल जिब्रान, गॉयकाव्हॉस्की, टॉलस्टाय इ. परदेशी लेखकांबरोबरच स्थानिक मानवतावादी लेखकांचे साहित्यही त्यांनी वाचून काढले.
खऱ्या अर्थाने १९४९ पासून त्यांच्या लेखनाने वेग घेतला. विलक्षण प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्यात दबदबा निर्माण केला. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमधून उपेक्षित समाजातून प्रथमच आलेले नवे नायक, नव्या नायिका नव्या जाणिवेने विषमतेविरुद्ध शोषणाविरुद्ध अंगार ओकू लागल्या. जनसामान्यांच्या बोळीतून जातविरहित, वर्गविरहित समाजाची स्वप्ने पेरू लागल्या.
पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक' हा पोवाडा रचला.
संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन, `जग बदल घालूनी घाव, गेले सांगून भिमराव' प्रसिध्द झाले तर `फकिरा' ही कादंबरी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अण्णांनी अर्पण केली होती. अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे त्यांनी उभी केली. ग्रामीण पददलित लाचारीने जगणार्या माणसाचे साहित्य जीवन त्यांनी समाजासमोर उभे केले.
बारबांधा, कंजारी, निखारा, नवती, गुऱ्हाळ, गजाआड यासारखे १३ कथासंग्रह, इनामदार, सुलतान, पेंग्याचं लगीन अशी नाटके, अकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, मूक मिरवणूक, शेटजीचं इलेक्शन यासारखे वगनाटय़, अलगुज, वैजयंता, वारणेचा वाघ, फकिरा यासारख्या कादंबऱ्या आणि प्रवासवर्णन लिहून मराठी साहित्य जगताला नवा तोंडवळा दिला. त्यांच्या वैजयंता, आवडी, माकडीचा माळ, फकिरा, अलगूज, दारणेचा वाघ अशा ७ कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या २७ भाषांमधून भाषांतरीत झाल्या आहेत.
अण्णाभाऊंचं झोपडीवर अतिशय प्रेम होतं. ` जे जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत. ४५ कादंबर्या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले. अण्णाभाऊ माटुंग्याच्या लेबर कँपमध्ये रहायचे. इथेच त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कोणतीही ज्ञानाची शिक्षणाची परंपरा इथे त्यांना लाभली नाही. आज त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी संस्थांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहेत. माटुंग्याच्या लेबर कँपमधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट' होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले.
असा हा विलक्षण प्रतिभेचा लेखक अशा काळात जन्मास आला, जेव्हा एक नवे जग आकारात येऊ घातले होते. नव्या ज्ञानविज्ञानाने, नव्या तत्वज्ञानाने समाजमनाची पकड घेतली होती. रशियात साम्यवादाची क्रांती यशस्वी झाली होती. जगभर तिचा प्रभाव आणि बोलबाला होता. भारतात कामगार, कष्टकऱ्यांच्या शेतकरी, शेतमजुरांच्या चळवळी भरात आल्या होत्या. स्वातंत्र्याच्या चळवळीनेही जोर धरला होता. टिळक विचारांचा प्रभाव नाकारून या चळवळीने अहिंसावादी गांधी विचारांची कास धरली होती. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर दास्याच्या, दैन्याच्या गर्तेत हजारो वर्षांपासून खितपत पडलेल्या दलितांना माणूस म्हणून उभे करण्यासाठी जोरकसपणे लढे देत होते. अशा या चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या काळाचा प्रभाव अण्णाभाऊंच्या संवेदनशील मनावर पडणे स्वाभाविक होते.
जन्माने मिळालेली अस्पृशता, त्या अनुषंगाने येणारे पशूतूल्य जीवन, हालअपेष्टा यांचा वाटा वाटेगावलाच सोडून अण्णाभाऊंचे कुटुंब मुंबईत दाखल झाले. गावकडच्या तमाशाचा बाज, लावणीचा ठसका, लोकगीतांची लय, बेडरपणा आणि चौकसबुद्धी याचा साज जनमनावर वागवत हा तरुण मुंबईतही गाऊ लागला. ऐकलेल्या कथा, शौर्यकथा खुलवून खुलवून सवंगडय़ांना सांगू लागला. त्यामुळे भरपूर मित्र मिळाले. नोकरीचा प्रश्न सुटल्याने अण्णाभाऊंच्या आयुष्याला स्थिरता आली. आपल्या राहत्या घरातच एक छोटसे ग्रंथालय उभे करून त्यांनी वाचनाचा सपाटा लावला. खलिल जिब्रान, गॉयकाव्हॉस्की, टॉलस्टाय इ. परदेशी लेखकांबरोबरच स्थानिक मानवतावादी लेखकांचे साहित्यही त्यांनी वाचून काढले.

फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून सांगतात. `द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला । आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली । काढा नौका । देशाची वादळात शिरली । धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली । काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।`
आजच्या काळातही ही लावणी उपयोगीच ठरते. त्यांचे `इनामदार` हे नाटक त्यात खेड्यातील `सावकारी पाश' शेतकर्यांभोवती कसे आवळले जातात. आणि गुन्हेगारीला प्रवृत्त होतात याचं चित्र स्पष्ट करते. आजही शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्येच्या वेळी हे नाटक आठवून जाते. पण हे नाटक मराठीत फारसं चाललं नाही. हिंदी रुपांतर मात्र लोकांना भावले.
अण्णाभाऊंनी जनतेसाठी लिहिले, लोकोत्थनासाठी लिहिले. असभ्यतेवर घणाघाती घाव घालत लिहिले. अनैतिकेचे बालेकिल्ले उदध्वस्त होतील असे लिहिले. महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या वतीने मुंबई येथे पहिले साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी झाले. त्याच्या उद्घाटकीय भाषणात अण्णाभाऊंनी दलित साहित्य, दलित माणूस, त्याच्या वेदना, कार्य, कर्तृत्व याचा सविस्तर आढावा घेतला. ‘महाराष्ट्रात दलित माणसांचा मोठा वर्ग आहे. त्याचे जीवन वेगळे असून इतर वर्गाशी तो संलग्न आहे. हा वर्ग या देशात अग्रेसर असून त्याच्या न्यायी संघर्षांचे परिणाम सर्व समाजावर होत असतात. तो या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक पाया आहे. परंतु तो पिळला जाणारा नि कष्ट करणारा दलित म्हणून वेगळा आहे. त्याच्या जीवनाचे स्वच्छ प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही. जो काही थोडाफार दिसतो तो तरंगमय तळ्यात पडलेल्या लांबूळकी आणि उगमगणाऱ्या सावली सारखा दिसतो. त्याच्या खडतर कष्टाच्या कर्माची पाश्र्वभूमी जोपर्यंत लेखकाला कळत नाही तोपर्यंत त्याचे, दलितांचे साहित्य निर्माण करू शकत नाही. दलित वर्गाचे अथांग जीवन दिसण्यासाठी लेखकाला एक दिव्यदृष्टी असावी लागते. तो त्या वर्गाशी एकनिष्ठ असावा लागतो.’ असे त्यांनी सांगितले.
अण्णाभाऊ विचारी पुरूष होते. इतर कम्युनिष्टांसारखा झापडबंद पोथीवाद त्यांना मान्य नव्हता. त्यांची शोधक नजर, तर्कनिष्ठ बुद्धी आणि प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची वृत्ती यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे होते. त्यामुळे त्यांच्यात व इतर कार्यकर्त्यांत मतभेद व्हायला लागले. आंबेडकरी विचारांकडे मोठय़ा प्रमाणात झुकणे, त्या विचारांना प्राधान्य देणे पार्टी सदस्यांना सहन झाले नाही. त्यामुळे अण्णाभाऊ पार्टीपासून दूरावत गेले. आंबेडकर तत्वज्ञानाच्या, अधिकाधिक जवळ गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणनंतर अण्णाभाऊ वैचारिकदृष्टय़ा बाबासाहेबांच्या जवळ गेले. त्यांच्या कृती संभाषणातून, लिखाणातून बाबासाहेबांचा क्रांतीप्रवण विचार अधिक ठळकपणे दिसू लागला. जातींच्या बिमोडाशिवाय, या देशात क्रांती शक्य नाही, जातविरहित समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचा मार्ग योग्य असून त्याला प्राथमिकता दिली पाहिजे. थोडक्यात या देशात फुले-आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद यांच्या एकत्र वज्रमुठीतूनच समतेवर, आधारित शोषणमुक्त समाज व्यवस्था निर्माण होऊ शकेल, या मतांवर अण्णाभाऊ आल्याने कडव्या व धर्माध कम्युनिस्टांपासून ते बाजूला फेकले गेले आणि आंबेडकरवाद्यांनीही त्यांना त्यांच्या विचारांना खुल्या मनाने स्वीकारले नाही. त्यांच्यावर कम्युनिस्टांचा शिक्का कायम ठेवून त्यांना दूर लोटले.
प्रासंगिक, ऐतिहासिक लढय़ांवर अण्णाभाऊंनी अनेक पोवाडे, लोकगीते, लावण्या लिहिल्या. स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, तेलंगणाचा संग्राम, अमळनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्या बाजाराचा पोवाडा इ. अनेक पोवाडे अजरामर आहेत. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि शाहीर अण्णाभाऊ साठे या त्रयीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवून महाराष्ट्र पिंजून काढला.
अण्णाभाऊंचे जीवलग मित्र आणि लढय़ातील साथीदार शाहीर अमर शेख अण्णाभाऊंच्या पोवाडय़ाविषयी मत मांडताना म्हणतात, ‘पोवाडा हे काव्य सहज साध्य नाही. त्यातही कमी अधिक असते. खरा पोवाडा बैठकीशिवाय, अभ्यासाशिवाय, चिंतनाशिवाय जमत नाही. त्याची स्वत:ची एक लय आहे, तंद्री आहे. त्यात शाहिराची प्रतिभा मर्दानगी आणि बाणा आहे. हे सर्व अण्णाभाऊंजवळ आहेच. पण अन्यायाची चीड त्यांच्याकडे होती. गुलामगिरीविरुद्ध लढण्याची खूमखूमी होती. दु:ख, दैन्य, दारिद्रय़, यांचा नाश करू इच्छिणाऱ्या शब्दरूप गोळ्याचं कोठार होतं. मानवतावादाच्या तलवारीला समाजवादाची शास्त्रीय पद्धती चढवलेली धार होती, म्हणूनच त्यांचा पोवाडा जनमानसात नुसता रवंथ करण्यासाठी जात नसे तर ठिणग्या, ठिणग्यांनी रान उठवत असे, पेटवत असे.
अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय आण्णाभाऊंकडेच जाते. १९४८, १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा अखिल महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली.
वाटेगावहून मुंबईत वडिलांच्याबरोबर पायी चालत आलेला आण्णा विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेला तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा' ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिनग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. त्यांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे दर्शन घडविले `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाली. जगातील व भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल' साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत. ते १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.अण्णाभाऊंचं निधन 18 जुलै 1968ला झालं

No comments:
Post a Comment