आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या
अस्तित्वाला खरच कधी आम्ही समजून घेतलं आहे का? वडिलांना महत्व असूनही
त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही,लिहिलं जात नाही.कोणताही व्याख्याता
आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो.संत महात्म्यानीही आईचाच महत्व अधिक
सांगितला आहे.काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट,व्यसनी,मारझोड
करणारा.समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही पण चांगल्या वडिलांचे काय?
आईकडे अश्रुंचे पाट असतात,पण बापाकडे संयमाचे घाट असतात.आई रडून मोकळी होते,पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं,आणी रडनार्यांपेक्षा सांत्वन करणारांवरच जास्त ताण पडतो.कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमीच ज्योतीला मिळत राहत! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते,पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो नाही? आई रडते,वडिलांना रडता येत नाही.स्वतःचा बाप वारला तरीही रडता येत नाही,कारण छोट्या भावंडाना जपायचा असत.पत्नी आयुष्यात अर्ध्यावरच सोडून गेली तरी पोरांसती अश्रुना आवर घालावा लागतो.
जिजाबाईंनी शिवाजी घडवला असा अवश्य म्हणाव,पण त्याचवेळेस शहाजीराजांची ओढताण सुद्धा लक्षात घ्यावी.देवकीचं,यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा.राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगात तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.वडिलांच्या टाचा झिझ्लेल्या चपलांकडे पाहिलं कि त्यांचा प्रेम कळतं.त्यांची फाटकी बनियान पहिली की कळत '' आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत '' त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.
मुलीला गाऊन घेतील.मुलाला लुंगी घेतील पण स्वतः मात्र जुनी प्यांट वापरायला काढतील.मुलगा सलून मध्ये वीस-पंचवीस रुपये खर्च करतो पण, त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो.अनेकदा तो नुसते पाणी लावून दाढी करतो.बाप आजारी पडला तरी पटकिणी दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही,पण डॉक्टर एखाद महिना आराम करायला लावतील याचीच त्याला भीती वाटते.कारण पोरीचा शिक्षण बाकी असत.घरात उत्पनाच दुसरं साधन नसतं.ऐपत नसते तरीही मुलांना मेडिकलला,एन्जेनीअरिन्ग्ला प्रवेश मिळवून दिला जातो ओढताण सहन करून त्यांना दरमहिन्याला पैसे पाठवले जातात.पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे पैसे येताच मित्रांना पार्ट्या देतात आणी ज्या बापानी पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात.एकमेकांच्या बापाच्या नावानी एकमेकाला हाका मारतात.
ज्या घरात बाप असतो त्या घराकडे कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही,कारण घरातला करता जिवंत असतो.तो जरी काहीही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणी घरच्यांचे कर्म बघत असतो,सांभाळत असतो.कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही,पण बाप होणं टाळता येत.पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही.आईच्या असण्याला अथवा आईच्या होण्याला बापामुळे अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते,कारण ती जवळ घेते,कवटाळते,कौतुक करते,पण गुपचूप जाऊन पेढांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच कसा लक्षात येत नाही? पहलीत कर्णीच (बाळअंतीच) खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बापाची दखल कोणीच घेत नाही.
चटका बसला,ठेच लागली,फटका बसला तर ''आई ग'' हाच शब्द बाहेर पडतो,पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्रक जवळ येऊन अचानक ब्रेंक लावतो तेवाह मात्र ''बाप रे'' हेच शब्द बाहेर पडतात.कारण छोट्या संकटात आई चालते पण मोठ्या वादळांना पेलताना बापच आठवतो .......काय पटतय्ना?
कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात.पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावा लागतं.कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो.पण गरीब मुलीच्या घरी उभ्या-उभ्याने का होईना चक्कर मारतो.तरुण मुलगा उशीरा घरी येतो तेहवा त्याची आई नाही तर बापच जागा असतो.मुलाच्या नोकरीसाठी लाचार होणारा बाप,मुलीच्या स्थळासाठी उंबरठा झिजवणारा बाप.घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपावणारा बाप....खरच किती ग्रेअत असतो ना?
वडिलांचं महत्व कोणाला कळत?.......लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदारया खूपच लवकर पेलाव्या लागतात,त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं.वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी.सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदलेला आवाज एका क्षणात कळतो.मग ती अनेक प्रश्न विचारते.कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेहवा विवाहाच्या बोहल्यावर चढते.मुलगी बापाला जाणते,जपते.इतरान्हीही आपल्याला जाणावं हीच बापाची किमान अपेक्षा असते.

No comments:
Post a Comment