Thursday 23 February 2012

चमचमीत नॉन-वेज



चिकन फिंगर
चिकन बोनलेसचे अंदाजे दोन इंच लांबीचे ८ ते १० तुकडे एका बोलमध्ये घेऊन त्यामध्ये २ अंडी, शेजवान सॉस, मीठ, मैदा, कॉर्नफ्लॉवर, काळीमिरी पावडर, थोडा लाल रंग घालून ते सर्व मिश्रण एकत्र करून १०-१५ मिनिटे ठेवून द्यावे. नंतर उकळत्या तेलात मंद गॅसवर तळावे. अंदाजे ८-१० मिनिटे शिजल्यावर चिकन फिंगर डिशमध्ये सॅलडवर ठेवून खाण्यास द्यावे. बरोबर शेजवान सॉस द्यवा.
टीप : मैदा कॉर्नफ्लॉवरपेक्षा थोडा जास्त टाकणे.
---------------------------------


चिकन क्रिस्पी इन हॉट गार्लिक सॉस
चिकन बोनलेसचे १०-१२ लहान लहान तुकडे एका भांडय़ात घेऊन त्यामध्ये ३ अंडी, शेजवान सॉस, मीठ, काळीमिरी पावडर, मैदा (थोडा जास्त, ३ चमचे कुरकुरीत करण्यासाठी), कॉर्नफ्लॉवर, लाल रंग घालून ते मिश्रण एकत्र करून १०-१५ मिनिटे उकळत्या तेलात मंद आचेवर तळावे.
नंतर कढईमध्ये थोडेसे तेल घालून त्यामध्ये लसूण, मिरची, आले, टोमॅटो सॉस घेऊन हॉट गार्लिक सॉस तयार करावा, त्यामध्ये वरील तळलेले तुकडे घालावेत.
---------------------------------

पनीर ६५ ड्राय/ग्रेव्ही
पनीरचे १० चौकोनी तुकडे घेऊन ते शिजवून घ्यावेत. नंतर एका कढईमध्ये थोडेसे तेल घालून त्यामध्ये मिरची, आले, लसूण, बारीक करून घालावे. शेजवान सॉस, मोहरी, मीठ, चिलीसोया सॉस टाकून ग्रेव्ही तयार करावी त्यात दही व कॉर्नफ्लॉवर २-३ चमचे घालावे व पनीरचे तुकडे सोडावेत.
---------------------------------

चिकन मलेशियन नूडल्स
तीन प्रकारच्या अंडे-मिश्रित नूडल्स आधी तयार करून घ्याव्यात. (शेजवान नूडल्स, सिंगापूर नूडल्स, हाका नूडल्स) त्या एका डिशमध्ये ३ वेगवेगळ्या मुदीमध्ये वाढून घ्याव्यात. त्यावर चार चिकन लॉलिपॉप मांडून वर थोडीशी रेड शेजवान सॉस ग्रेव्ही घालावी. सोबत एका डिशमध्ये शेजवान सॉस ग्रेव्ही व चिकनचे बोनलेस तुकडे वेगळे देणे. ही डिश दोन ते तीन जणांसाठी पुरेशी असते.
---------------------------------

चिकन शेरपा राईस
कढईत थोडेसे तेल तापत ठेऊन मंद गॅसवर दोन फेटलेली अंडी उलथण्याने हलवत राहावे. नंतर त्यामध्ये गाजर व बीन्सचे तुकडे बारीक करून टाकावे. थोडे गरम झाल्यावर एक बोल शिजलेला मोकळा भात टाकून उलथण्याने परतावा व त्यामध्ये मीठ, सोयासॉस, काळीमिरी पावडर, कांद्याची पात व थोडेसे तळलेले नूडल्स टाकून ते परतावे व एका बोलमध्ये काढून घ्यावे नंतर दुसऱ्या कढईत थोडेसे तेल, मीठ, साखर, शेजवान सॉस, रेड चिली सॉस व चिकन बोनलेसचे शिजवलेले तुकडे टाकून घट्ट ग्रेव्ही तयार करून घ्यावी.
नंतर बोलमधील अर्धा भात काढून त्यामध्ये ती ग्रेव्ही टाकावी व वरती पुन्हा उरलेला भात झाकून टाकावा. खरमरीत, कुरकुरीत राईस तयार
टीप : अजिनोमोटो आवश्यक असल्यास वापरावा.
---------------------------------

प्रॉन्स फ्राय
१० ते १५ कोळंब्या एका बोलमध्ये घेऊन त्यांत एक अंडे, शेजवान सॉस, मीठ, मैदा, कॉर्नफ्लॉवर, काळीमिरी पावडर, थोडासा लाल रंग घालून हे सर्व मिश्रण एकत्र करावे. १०-१५ मिनिटे ठेवून द्यावे.
नंतर उकळत्या तेलांत मंद आचेवर ठेवून तळून घ्यावे व शेजवान सॉसबरोबर खाण्यास द्यावे.
टीप : मैदा, कॉर्नफ्लॉवरपेक्षा थोडा जास्त टाकणे.
---------------------------------

चिकन पॅकिंग राईस
प्रथम ३ अंडय़ांची ८-१० इंच लांबीची पातळ गोल पोळी करून घ्यावी. नंतर चार अंडाकृती चिकन कटलेटस (चिकन खीमा) करून ते वुस्टरशायर सॉसमध्ये एकत्र करून चिकन फ्राइड राईस बरोबर अंडय़ाच्या पोळीमध्ये मोठय़ा मुदीच्या आकाराने डिशमध्ये मांडावे. सोबत वुस्टरशायर सॉसची ग्रेव्ही वेगळी द्यावी.
---------------------------------

चिकन साटे
चिकन बोनलेसचे चार इंच लांब तुकडे घेऊन ते बाजारात उपलब्ध असलेल्या ६ इंच लांब साटे स्टिकमध्ये रोवून द्याव्यात. एका बोलमध्ये २ अंडी, शेजवान सॉस, मीठ, काळीमिरी पावडर, लाल रंग घालून एकत्र करावे. हे मिश्रण १०-१५ मिनिटे ठेवून द्यावे. नंतर उकळत्या तेलात, मंद गॅसवर तळून घ्यावेत व एका डिशमध्ये सलॅडवर मांडून त्यावर हॉट गार्लिक सॉस घालावा आणि वाढून घेण्यास तयार ठेवावा.



No comments:

Post a Comment