महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभल्याने सागरी संपत्तीही अमाप आहे. कोकण, गोवा या भागातील लोकांचे मासे हेच प्रमुख अन्न आहे. मासेप्रेमी लोकांसाठी माशांच्या या चविष्ट पाककृती.
सुरमईचा बालचाव
साहित्य : पाव किलो सुरमई, दोन मध्यम आकाराचे कांदे, दोन टोमॅटो, दोन चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, मीठ, तेल
वाटायचा मसाला - दोन लवंगा, चार काळी मिरी, एक इंच दालचिनी, एक चमचा जिरे, सहा लसूण पाकळ्या. हा मसाला कच्चाच वाटून घ्यावा.
कृती :
* मिक्सरमध्ये टोमॅटोच्या फोडी घालून रस काढून घ्यावा.
* सुरमईचे तुकडे स्वच्छ करून धुवून घ्यावेत.
* तुकड्यांना मिरची पावडर, हळद, मीठ न लावता तव्यावर तेल सोडून अर्धवट तळून घ्यावेत.
* पातेल्यात तेल घालून कांदा चिरून घालावा.
* बदामी रंगावर आल्यावर वाटलेला मसाला घालून चांगले परतून घ्यावे.
* सुरमईचे तुकडे, मीठ, हळद, मिरची पावडर घालावी.
* टोमॅटोचा रस घालून दोन चार उकळ्या काढाव्यात.
वेर्ल्याचे हुम्मण
साहित्य : वेर्ल्या हे मासे अगदी बोटभर लांबीचे पांढरेशुभ्र असतात. पंधरा- वीस वेर्ल्या, एक हिरवी मिरची उभी चिरून, एक कांदा बारीक चिरून, मीठ, मुळ्याच्या फोडी (गोव्यातील मुळे अगदी छोटे असतात.)
वाटायचा मसाला : दीड वाटी ओले खोबरे, सहा-सात लाल सुक्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, सुपारीएवढी चिंच. हा मसाला बारीक वाटून घ्यावा.
कृती :
* वेर्ल्याची डोकी व शेपटी काढून टाकावी.
* पोटाच्या भागाकडून चिरून आतून स्वच्छ करून घ्यावे.
* या माशांना खवले असतात, त्यामुळे विळीवर वेर्ल्या उलट-सुलट फिरवून खवले काढून स्वच्छ धुवावेत.
* एका पातेलीत मिरची, कांदा, अर्धी वाटी मुळ्याच्या फोडी, पाणी घालून शिजत ठेवावे.
* मुळा शिजल्यावर वाटलेला मसाला घालावा.
* उकळू लागल्यावर वेर्ल्या सोडाव्यात व मीठ घालावे.
* चांगले उकळल्यावर खाली काढावे.
तंदुरी फिश
साहित्य : अर्धा किलो पापलेट, एक चमचा आले-लसूण पेस्ट, एक दही, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, एक चमचा जिऱ्याची पूड, मीठ, ब्रेडचा चुरा, तेल.
कृती :
* पॉपलेटचे डोके व शेपटी काढावी.
* पोटाकडील भाग कापून आतून स्वच्छ करून धुवून घ्यावा.
* पापलेटला आडव्या दोन-तीन चीरा द्याव्यात व मीठ - लिंबाचा रस लावून ठेवावा.
* दह्यात मिरची पावडर, हळद, मीठ, आले, लसूण पेस्ट, जिऱ्याची पूड एकत्र करून आतून बाहेरून लावून घ्यावे.
* ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून गॅस तंदूर अगर ओव्हनमध्ये ठेवून भाजून घ्यावे.
* टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

कोलंबी + अंबाडे हुम्मण
साहित्य : एक वाटी स्वच्छ केलेली कोलंबी, चार अंबाडे साल काढून, दोन वाटी ओले खोबरे, सात-आठ सुक्या लाल मिरच्या, हळकुंडाचा लहान तुकडा, पाच-सहा काळे मिरे, एक कांदा बारीक चिरून, मीठ.
कृती :
* खोबरे, मिरची, हळकुंड, मिरे एकत्र करून मिक्सरवर वाटून घ्यावे.
* कोलंबी व कांदे पाणी घालून शिजत ठेवावे.
* कोलंबी शिजल्यावर अंबाडे घालावे.
* वाटलेला मसाला व मीठ घालून शिजवावे.
* हवे तेवढे पातळ किंवा घट्ट करावे.
बांगड्याचे लोणचे
साहित्य ः सहा बांगडे, तीन चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मेथी, चार-पाच काळे मिरे, एका मोठ्या लिंबाएवढा चिंचेचा कोळ, चार-पाच लसूण पाकळ्या, एक चमचा तेल, मोहरी, मीठ.
कृती ः
* बांगडे स्वच्छ करून त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यावे.
* त्यांना मीठ एक चमचा मिरची पावडर, हळद, मीठ लावून ठेवावे.
* एक चमचा तेलात हिंग, मेथी, मिरे परतून घेऊन त्याची पावडर करावी.
* पातेल्यात तेल घालून मोहरी घालावी.
* मोहरी तडकल्यावर हिंग, लसूण ठेचून घालावा.
* चिंचेचा कोळ, हिंग, मेथी मिऱ्याची पावडर, मीठ, दोन चमचे मिरची पावडर, हळद घालावी.
* मग त्यात बांगड्याचे तुकडे घालावेत.
* हे सर्व मंद आचेवर शिजून द्यावे.
* या लोणच्याचा रस जाडसर असावा. हे लोणचे पाच दिवस टिकते.
जवळा भात
साहित्य : सुका जवळा, बारिक चिरलेला कांदा व टोमॅटो, आलं -लसूण पेस्ट, कढीपत्ता. लाल तिखट, हळद, शिजवलेला भात, तेल, मीठ, कोथिंबीर, कोकम.
कृती : कढईत तेल गरम करावे. तेलावर कढीपत्ता व कांदा टाकावा. कांदा चांगला भाजला गेला की त्यात आलं लसूण पेस्ट टाकून परतून घ्यावे. नंतर त्यावर बारिक चिरलेला टोमॅटो टाकावा. टोमॅटो थोडा शिजल्यावर आवडीनुसार लाल तिखट टाकावे. हळद, मीठ टाकावे. त्यावर सुका जवळा व दोन तीन कोकम टाकावे व थोडं पाणी टाकून जवळा शिजवून घ्यावा. जवळा नीट शिजला की त्यावर शिजवलेला भात कुस्करून टाकावा. भात मसाल्यात व्यवस्थित परतावा. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भात शिजू द्यावा. थोड्यावेळाने त्यावर बारिक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
जवळा-भात तुम्ही रात्रीच्या उरलेल्या शिळ्या भाताचाही करू शकता. तो अधिक चांगला लागतो.
तळलेले सुके बोंबिल
साहित्य: सुके बोंबिल, तेल, तांदळाचे पीठ, लाल तिखट, मीठ, हळद, भिजवलेले कोकम, मीठ
कृती : बोंबलाचे एका आकाराचे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे व्यवस्थित धुवावे. धुवून झाल्यावर त्यावर भिजवलेले कोकम कुस्करून लावावे. त्यावर मीठ, मसाला, हळद लावून थोडा वेळ मुरवत ठेवावे. फ्राईंग पॅन गरम झाल्यावर बोंबिल तांदळाच्या पिठात घोळवून तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. कुरकुरीत भाजावे. भात व तिखट आमटीसोबत खायला चांगले लागतात. कुरकुरीत असल्यामुळे लहान मुलंदेखील आवडीने खातात.
सोडे भात
साहित्य: सोडे, तांदूळ, बारिक चिरलेला कांदा, कांदा-सुक्या खोबर्याचं वाटण, लाल तिखट, बटाटा, कोथिंबीर, तेल
कृती: सोडे भिजत घालून थोडे ठेचून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात कांदा टाकावा. कांदा शिजल्यावर त्यावर बारिक बटाट्याचे काप टाकावे. नंतर त्यात कांदा-खोबर्याचं वाटण, लाल तिखट, हळद टाकावी. व्यवस्थित परतून घ्यावे. त्यामध्ये धुवून ठेचलेले सोडे घालावेत. नंतर त्यावर तांदूळ धुवून टाकावे. तांदूळ चांगले परतल्यावर त्यात पाणी टाकावे. भात व सोडे व्यवस्थित शिजू द्यावे. शिजल्यावर त्यात बारिक चिरलेली कोथिंबीर टाकावी. सोडे व्यवस्थित शिजू द्यावे. भात खूप छान लागतो.

---- सामना
No comments:
Post a Comment