साहित्य
- बोनलेस चिकन : ४०० ग्रॅम्स
- चिरलेला कांदा : ३ मोठे
- चिरलेला टोमॅटो : २ मध्यम
- उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या : २ नग
- आले-लसूण पेस्ट : १ टिस्पून
- लाल मिरच्या : ८ नग
- पुदीना : १ टेबलस्पून
- कोथिंबीरीची पाने : १ टेबलस्पून
- लिंबाचा रस : १ टीस्पून
- मीठ चवीनुसार
- तेल : ६ टेबलस्पून
कृती-
> चिकनच्या तुकडयाना मीठ , आले-लसूण पेस्ट व लिंबाचा रस लावून २० मिनिट मुरवायला ठेवावे.
> एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून लाल मिरच्या परतून घ्याव्यात. बाजूला ठेवावे.
> त्याच तेलात कांदा लालसर रंग होईपर्यत परतून घ्यावा , त्यात टोमॅटो घालून मऊ होई पर्यत शिजवून घ्यावा.त्यातच पुदीना व कोथिंबीरीचे पाने परतून घ्यावी.
> कांदा , टोमॅटो , लाल मिरच्या , पुदीना व कोथिंबीर याची बारीक पेस्ट करावी.
> एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात हिरवी मिरची परतावी , त्यात वाटलेली पेस्ट व चिकनचे तुकडे ५ मिनिट अर्ध कच्चं शिजेपर्यत परतून घ्यावे.
> यात एक कप चिकनचा स्टॉक किंवा पाणी , चवीपुरतं मीठ घालून चिकन शिजेपर्यत व पाणी आटेपर्यत शिजवावं.
> पराठा व चपाती बरोबर खायला द्यावे.
No comments:
Post a Comment