Wednesday, 28 March 2012

माझा बापूस



मी चवतीन होतो.
सकाली उटलो. आंग धवला. च्या न बटर खाल्ला.
पलत शालन झेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायपुन दिसना.
कसातरी खाली बसलो. हजेरी चाल्लीवती.

"रमेश म्हात्रे.............. " मास्तर वरडलं

"आत्ताच आयलो न" मी

"हं दिसतय मना."

"पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं

"म्हात्र्याच्या !  उट न कालचा धरा वाचुन दाकीव. "

माजे पोटान गोला उटला. चवतीन होतू तरी वाचाला जमत न्हवता. मी उबाच.

"काल कुट श्यान खाया गेलवतास रं भाड्या" मास्तर

"बापासचे बरब खारीवर कोलब्या न चिम्बोर्या पकराला जेलेलो."

"बापासला बलीव उदया नायतं सालंन येवाचा नाय.  क समजला ?"

घरी आलू.

सांचे टायमाला बा आल्याव आय म्हनली "मास्तरनी रम्याला लय झोरला आज. अब्यास करना म्हुन. तुमासनी बलीवलं हाय"

बाचा डोस्का सटाकलं.
" माजे पोराला झोरला ? माजे पोराला झोरला ? क केलाय क त्यान ? क र रम्या ?"

"ग्रिवपाट नाय केलावता." मी लराला लागलू.

"आवरावरशी झोरला क ? बाला तू लरू नको. चीप रव चीप रव. उद्या बगून झेव."

मी बा च्या कुशीत झोपून गेलो.

सकाली मी न बा शालंन.

"क झाला ?" बा शांत.

"तुक्या तुजा रम्या अब्यास करना बग" मास्तर

"मंग " बा शांतच.

"अरे मंग कय मंग ? तेला चिंबोरी पकराला न्हेउ नको . अब्यास कवा करील त्यो ?"

"तेजायला मंग खावाचा क ? तुजी हारां ?" बा सटाकला.

"असा क बोलतस तुक्या ? रम्याचे चांगल्यासटी सांगतय."

"अब्यास करून डंपरवरतीच बसाचा हाय नं. आवरा करुन ठेवलाय त्याजेसाटी. तु सांगाची गरज नाय. "

"अरे अब्यास करा नको ? तेला वाचाय सुदीक येत नाय"

"म्हुन त्याला झोरलास ? म्हुन त्याला झोरलास ? आज तुजे रेमन कीरे भायर काडतो क नाय बग. रम्या पोकल बांबू आन लवकर. बा चितालला.
...
...
...
त्या दिशी पयल्यांदा मास्तरला बा चे पाया परताना बगीतला.



------------------ मिसळपाव  

No comments:

Post a Comment