Friday, 16 March 2012

चिंबोरी स्पेशल




चिंबोरी मसाला

साहित्य : 

  • चार मध्यम आकाराचे खेकडे ,  
  • आठ काश्मिरी मिरच्या ,  
  • तीन चमचे धणे पावडर , 
  • तीन लवंगा ,  
  • चार काळी मिरी ,  
  • एक इंच दालचिनी ,  
  • तीन वेलच्या ,  
  • पाच कांदे , 
  • तीन टोमॅटो ,  
  • एक चमचा हळदी पावडर ,  
  • अर्धी वाटी ताजा खवलेला नारळ ,  
  • चवीपुरतं मीठ , 
  • 100 ग्रॅम तेल.

कृती : प्रथम खेकडे स्वच्छ करून धुऊन घ्यावेत. त्यानंतर प्रत्येक खेकड्याचे दोन याप्रमाणे चार खेकड्यांचे आठ तुकडे करावेत. खेडक्याच्या डांगा वेगळ्या कराव्यात. त्यांना मीठ लावून ठेवावं.

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा (तीन कांदे) लाल होईपर्यंत परतावा. टोमॅटोचे बारीक तुकडे , धणे पावडर , लवंग , काळी मिरी , काश्मिरी मिरच्या , दालचिनी व किसलेला नारळ व हळद घालून परतावा. हे मिश्रण चांगलं गरम झालं की मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करावी.

त्यानंतर कढईत तेल गरम करावं. त्यात चिरलेले दोन बारीक कांदे घालून ते लाल होईपर्यंत परतावं. त्यात वर उल्लेखलेलं वाटण घालावं. गरम झालं की त्यात खेकडे सोडावेत. जरुरीपुरतं पाणी घालून शिजवावं. हा कोळी पद्धतीचा चिंबोरी मसाला भाकरीबरोबर फारच रुचकर लागतो. 

-------------------------------



भरलेली चिंबोरी

साहित्य : 

  • दहा मध्यम आकाराच्या चिंबोऱ्या, 
  • चार ताजे पातकांदे, 
  • एक टोमॅटो, 
  • प्रत्येकी अर्धा चमचा हळद पावडर व मिरची पावडर, 
  • चवीपुरतं मीठ, 
  • अर्धी जुडी कोथिंबीर, 
  • 25 ग्रॅम चीज, 
  • 25 ग्रॅम गोडंतेल.

कृती : प्रथम चिंबोऱ्या स्वच्छ धुवून उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर चिंबोऱ्याचं मांस काढून घ्यावं. एका पॅनमध्ये तेल गरम करावं. त्यात पातीसह कांदा बारीक चिरून तो लाल होईपर्यंत परतावा. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालावं. कांदा व टोमॅटो एकजीव झालं की त्यात हळद, मिरची पावडर घालावी. नंतर त्यात चिंबोरीचं मांस घालून थोडं परतावं. सर्व मांस शिजत आलं की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण बाजूला ठेवावं. चार चिंबोऱ्यांचं कवच घेऊन त्यात वरील मिश्रण भरावं. वरून चीज किसून घालावं. अशी ही भरलेली चिंबोरी फोडण्याची कटकट नसल्याने मुलांना फार आवडते. चिंबोरीचं नुसतं मांस खायला मजा येते.
 
 


 

1 comment:

  1. सोपी आणि चवदार रेसिपी

    ReplyDelete