साहित्य : १ किलो चिकन, अर्धा किलो बासमति तांदुळ, एक कांदा व एक नारळ वाटी पेस्ट, ४/५ मोठे चमचे हिरवी मिर्ची-आल-लसुन पेस्ट, १ किलो कांदा, १०० ग्रॅम दही, अख्खा गरम मसाला (५ काळेमिरी, ५ लवंगा, २ तुकडे दालचिनी, तेजपत्ता, १/२ मोठी वेलची), पाव किलो टॉमेटो, ४/५ मोठे चमचे तेल, ३ चमचे मिर्ची पावडर, २ चमचे हळद, २ चमचे गरम मसाला पावडर, २ चमचे धना पावडर, चवीनुसार मीठ़
कृती : एका मोठय़ा टोपात तेल घाला, तेल गरम झाल्यावर त्यात अख्खा गरम मसाला घाला, नंतर उभा बारीक चिरलेला कांदा घाला, कांदा लाल झाला की त्यात हिरवी मिर्ची-आल-लसुन पेस्ट घाला, कांदा व पेस्ट व्यवस्थीत लाल झाली की त्यात मिर्ची पावडर, हळद, धना पावडर घाला थोडावेळ परतवा नंतर त्यात कांदा-नारळाची पेस्ट घाला, ती चांगली तेल
सुटेपर्यंत
परतवा त्यात टोमॅटो बारीक कापून घाला. टॉमेटो चांगला परतवा नंतर हे सर्व
मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात स्वच्छ धुतलेले चिकन घाला. चिकन व्यवस्थीत
परतवा नंतर मिठ घाला. थोडा वेळ झाकण ठेवा. थोडं चिकन शिजल्यानंतर दही
चमच्याने फेटून त्यात घाला. परत १५ ते २० मिनिटे मंद आचेवर ठेवा. चिकन
शिजल्यावर कोथिंबीर बारीक कापून घाला.
एका बाजूला मोठय़ा टोपात पाणी गरम करत ठेवा, त्यात मिठ, तेजपत्ता काळीमिरी घाला. पाण्याला उकळी आली की त्यात धुतलेले तांदुळ घाला. तांदुळ एक कनिचा (अरधकच्चा) होईपर्यंत शिजवा नंतर त्यातले सर्व पाणी गाळून टाका.
एक टोप घ्या, आतुन तळाला तुप लावा व त्यात प्लेन भाताचा एक धर लावा नंतर त्यावर शिजवलेले चिकन ग्रेवीचा एक थर लावा, त्यावर पुन्हा एक थर भाताचा लावा, नंतर दोन उभे बारीक कांदे चिरून तळा, कांदा लाल झाल्यावर कांदा व कोथिंबीर थरावरती घालुन सजवा व गरम गरम सव्र्ह करा.

No comments:
Post a Comment