Friday 9 March 2012

कोलंबी घस्सी


 
  • सोललेली कोलंबी : ३०० ग्रॅम्स
  • चिरलेला कांदा : २ मध्यम
  • चिरलेला टोमॅटो : १/२ (अर्धा)
  • आले- लसूण पेस्ट : १ टीस्पून
  • हळद : १ टीस्पून
  • लाल मिरच्या : ६ नग
  • धणे : १ टेबलस्पून
  • जिरे : १ टीस्पून
  • काळीमिरी : ८ नग
  • मेथी : १/२ टीस्पून
  • ओवा पावडर : १/४ टीस्पून
  • चिचेंचा कोळ : २ टेबलस्पून
  • खोवलेलं खोबरं : १ कप (१२० ग्रॅम्स )
  • नारळाचा रस : १ कप (२५०मिली)
  • तेल : ४ टेबलस्पून
  • मीठ चवीनुसार

कृती :

१. कोलंबीला मीठ , हळद आणि आले-लसूण पेस्ट लावून १५ मिनिटे मुरवायला ठेवावे.

२. एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून , त्यात लाल मिरच्या , धणे , जिरे , काळीमिरी , मेथी व ओवा भाजून घ्यावे.

३. हा भाजलेला मसाला , खोवलेलं खोबरं , चिरलेला अर्धा कांदा व चिचेंचा कोळ ह्याची बारीक पेस्ट करावी .जरूर वाटल्यास थोडे पाणी घालावे.

४. एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून राहिलेला कांदा लालसर होईपर्यत भाजून घ्यावे. त्यात टोमॅटो घालून मऊ होई पर्यत परतावा.

५. यात खोबरे व मसाल्याची पेस्ट दोन मिनिटं परतून घ्यावी. २ कप पाणी घालून मंद आचेवर २ मिनिटं उकळावी. ह्यात कोलंबी व चवीपुरतं मीठ घालून ५ मिनिटे शिजवावी.

६. चपाती किंवा भाताबरोबर खायला द्यावी. 





No comments:

Post a Comment