Tuesday 6 March 2012

मासवडी



या वडय़ांचा आकार माशासारखा असतो म्हणून माशाच्या आकाराची वडी ती अपभ्रंश होऊन मासवडी झाली. या मासवडय़ा त्यातील तीळामुळे पोटाला उष्ण असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात ही खाण्याची पद्धत आहे. पारंपरिक पद्धतीने जेवतानाही ह्या मासवडय़ा कालवणात किंवा वाटणाच्या रश्श्यात घालून खाल्ल्या जातात.
साहित्य : १ वाटी पांढरे तीळ, दीड वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, पाव वाटी लसूण पाकळ्या, तीन मोठे कांदे, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा मिरची पावडर, दोन हिरव्या मिरच्या, हळद, हिंग, दोन चमचे खसखस, तेल, चवीपुररते मीठ.
कृती : प्रथम सारण तयार करण्यासाठी तीळ, सुकं खोबरं, व खसखस भाजून घ्यावी. कांदा बारीक कापून गुलाबी होईपर्यंत परतावा. मग त्यात दोन हिरव्या मिरच्या, पाव वाटी लसूण घालून परतावे. नंतर वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे.
नंतर एका भांडय़ात तेल गरम करून त्यात थोडं हिंग, हळद घालून त्यात मिरची, जिरं, लसूण पेस्ट (२ चमचे) घालून परतून घ्यावे. मग त्यात दोन वाटय़ा पाणी घालावे. पाण्याला उकळी आल्यावर गॅस मंद करून त्यात थोडे थोडे बेसन घालून घोटून घ्यावे. बेसनाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. पीठही शिजलं पाहिजे. मग लगेचच पोळपाटावर ओला रुमाल पसरवून त्यावर पीठाचा गोळा थापून घ्यावा. (थालिपीठाप्रमाणे) मग त्यावर सारण सगळीकडे सारखे पसरावे. मग कपडय़ासकट या पिठाची वळकटी करावी. त्याला माशासारखा आकार द्यावा. नंतर रुमाल हळूच काढून घ्यावा. मग त्याच्या जाडसर वडय़ा कापाव्यात.
नाश्त्याला किंवा जेवताना रश्श्यात वडा-उसळीप्रमाणेही या वडय़ा खाता येतात



No comments:

Post a Comment