Wednesday 7 March 2012

पेस्तनकाका




पहाटे मिरजेच्या स्टेशनात गाडी बदलली आणि आम्ही दोघे बेंगळूरच्या गाडीतला आमचा डबा हुडकायच्या मोहिमेवर निघालो. फार दिवसांनी मीटरगेजचा प्रवास घडत होता.
रेल्वेच्या रिझर्वेशन-चार्टवर आपले नाव आढळले की मला जो काही हर्ष होतो त्याची तुलना फक्त मी मॅट्रिक परीक्षेच्या निकालाच्या वेळी बोर्डावर छापील अक्षरात प्रथम माझे नाव पाहिले त्या वेळी झालेल्या हर्षाशीच होऊ शकेल.
प्रवासात दुसरी धाकधूक म्हणजे सहप्रवासी कोण ही!
आमच्या कंपार्टमेंटमधे आधीच एक वृद्ध पारशी जोडपे येऊन बसले होते. डब्यात भयंकर घाण सुटली होती.
"काय घाण सुटली आहे!" माझी पत्नी म्हणाली. घाण मलाही आली होती. पण एंट्रीलाच हे वाक्य टाकावे असे वाटले नाही.
"अरे ग्‍हारी ष्टार्ट झाली म्हंजे निगून ज्याएल समदा घान. हे तो बद्धा रेल्वे जंक्सनमदली स्पेशल ग्‍हान हाय!" पारशी जोडप्यातले बावाजी उद्‍गारले.
"सकालच्या टाइम हाय--समदा पाशिंजर लोग सुपडा साफ करून घ्येते..."
थोडक्यात म्हणजे ती घाण, घाणीचे कारण आणि निर्मूलन यासंबंधी माहिती देऊन बावाजी मोकळे झाले.
गाडी सुरू झाली. काही वेळाने बावाजीचे नाव पेस्तनजी आहे असे कळले. माझेही नाव मी त्याला सांगितले. पण त्याने एकदा मला ‘भाऊसाहेब’ करून टाकल्यामुळे शेवटपर्यंत तेच नाव मला स्वीकारावे लागले.
"पण खरं सांगा पेस्तनकाका, ह्या तुम्हांला मधूनमधून चिमटा का काढीत होत्या?"
एखादे खट्याळ कार्टे आईची नजर चुकवून तिच्या पुढ्यातल्या डब्यातून लाडू काढताना तिच्याकडे ज्या नजरेने पाहते तसे पेस्तनकाकांनी पेस्तनकाकीकडे पाहिले. पेस्तनकाकी पिशवीतून नॅपकीन, साबण, वगैरे काढण्यात गुंतल्या होत्या.
"अरे भावसाहेब, लय पुरानी वार्ता. पन मला वाटते, मी पन असाच कायतरी तिला जरा इकडेतिकडे हात लावीत होता..."
तेवढ्यात गाडीने थोडा वेग घेतला.
"वा! गाडीनं स्पीड घेतला हां!" मी म्हणालो.
"अरे हे गाडी तीस मैलाचे ऊपर स्पीड नाय घेलं मीटरगेज हाय नी. साला टर्निंग पन लय हाय. समदा डब्बा गुल होऊन ज्याएल गाडीच्या. आनि साला कोलसा पन कुठे मिलते पूर्वीच्या जमान्यासारखा? आता मिलते ते कंडम माल!"
तेवढ्यात पेस्तनकाकी पाचव्यांदा किंवा सहाव्यांदा तोंड धुवून आली. खिडकीबाहेर पाहू लागली. त्यांचे ते पुन्हापुन्हा टॉवेल-साबण घेऊन बाहेर जाणे माझ्या ध्यानात आलेले पाहून, काकी गेल्याची खात्री झाल्यावर पेस्तनकाका मला न विचारताच म्हणाले,
"ते सारखा साबुन लावून तोंड धुते. आदत हाय. तिला वाटते के नाय धुतला तर काली पडेल. ते पन जरा इस्क्रू ढिल्लाच हाय! बट्‍ शी इज ए व्हेरी गुड गर्ल हां भावसाहेब. ज्यरा आपलेवर आवाज्य च्यढवते. डोका ज्यरा गरम हाय. आपुन एकदम रेफ्रिजरेतर... सिक्स्टी इयर्स मॅरिड लाइफ."
धारवाड आले. उतरून घ्यायला ‘संस्थेचे चिटणीस व कार्यकारी मंडळातील काही सदस्य’ आहेत हे आंधळ्यानेही ओळखावे अशी मंडळी आली होती. फुलांचा तुरा वगैरे होता. आम्ही पेस्तनकाका-काकींचा निरोप घेऊन उतरलो. इतक्यात पेस्तनकाकांनी मला हाक मारली.
"भावसाहेब..."
मी बहुधा गाडीत काहीतरी विसरलो असणार म्हणून डब्याकडे वळलो.
"थँक्यू-थँक्यू हां भावसाहेब. अरे तू एवडा मोठा माणस--"
"मी?"
"ते हे समदा लोग हार ने तुरा घेऊन रिसीव करायला येते ते काय असातसाच? तुज्या नाव सांग नी पुन्हा!"
मग मी बावाजींना नाव सांगितलं.
"थँक्यू हां भावसाहेब. कवा पेपरमदी तुजा नाव वाचला तर समदेला सांगेल के भावसाहेब इज माय फ्रेंड... आमी तेचा भजन ऐकला हाय... हंड्रेड पर्सेंट तुकाराम! आपला बी भाव वधारेल."
"पण तुमचं नाव तो जामे जमसेदमदी डेथ कॉलममदी आमच्या पोरेलोग छापेल--‘पेस्तनजी जहांगीर हुबलीवाला काल सकाली हार्ट एटेक हौसनी मेला!’ पर ध्यानमदी थेव, गॉड इज सफरिंग--आमचे बायकूच्या चिमटा असते तसा. ते चिमटा म्हनून दुखते पन, अने बायकूच्या म्हनून मज्जा पन वाटते.. गुड बाय!"

 ---  पू.ल. [ गोळाबेरीज ]

No comments:

Post a Comment